iPhone 16 Price : भारतीय बाजारासह संपूर्ण जगात iPhone 16, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max कंपनीकडून लॉन्च करण्यात आले आहे.
Apple ने iPhone 16 Plus स्मार्टफोन देखील लॉन्च केले आहेत. कंपनीने प्रो व्हेरियंटला शक्तिशाली कॅमेरा, मोठा डिस्प्ले आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसरने सुसज्ज केले आहे. A18 Pro चिपसेट दोन्ही डिवाइसमध्ये उपलब्ध आहे. iPhone 16 Pro, iPhone 16 pro max ला देखील Apple Intelligence फीचर्स देण्यात आले आहे.
Apple iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max: किंमत
iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत $999 आहे, तर iPhone 16 Pro Max ची किंमत $1,119 आहे. शुक्रवारपासून प्रीऑर्डर सुरू होतील. हँडसेटची शिपिंग 20 सप्टेंबरपासून सुरू होईल. भारतीय वापरकर्त्यांसाठी, iPhone 16 Pro ची किंमत 1,19,900 रुपये असेल तर iPhone 16 Pro Max ची किंमत 1,44,900 रुपयांपासून सुरू होईल. हे iPhones 20 सप्टेंबरपासून खरेदी केले जाऊ शकतात.
A18 Pro चिपसेट मिळेल
अगदी नवीन A18 Pro चिपसेट iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये उपलब्ध असेल. कंपनीच्या मते, A18 Pro मध्ये 16 कोर CPU आहे, तर नवीन GPU गेममध्ये 2x वेगवान रे ट्रेसिंग देते. कंपनीचे म्हणणे आहे की चिप गेल्या वर्षीच्या मॉडेलपेक्षा अधिक पावर कार्यक्षम आहे आणि पूर्वीपेक्षा वेगवान यूएसबी डेटा ट्रान्सफर गती देते.
डिस्प्ले आणि डिझाइन
Apple iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले आहे तर iPhone 16 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले आहे. डिस्प्ले 3,000 nits पर्यंतच्या कमाल ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. दोन्ही फोनमध्ये gen AI फीचर
देखील आहेत. प्रो मॉडेलवर नवीन ‘कॅमेरा कंट्रोल’ बटण देखील उपलब्ध आहे.
प्रो आणि प्रो मॅक्समध्ये पावरफुल कॅमेऱ्यांसह लेन्स आहेत
Apple iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये 48 MP मेन कॅमेरा, 48 MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5x टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 12 एमपी फ्रंट लेन्स आहे.