Dnamarathi.com

Ahmednagar Crime : 14 महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अभिजीत राजेंद्र सांबरे (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र त्यांच्या मृत्यु संशयास्पद झाला असल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात येत होता. 

 सदर संशयास्प्द मुत्यू त्याचे सोबत असणारा मित्र प्रमोद जालींदर रणमाळे याने घडवुन आणला असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येत होता. 

 या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हेशाखा, युनिट क. 2 कडिल पोहवा/मनोहर शिंदे यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने 

आरोपी प्रमोद जालींदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, यांनी शिताफिने ताब्यात घेतले. 

आरोपीची वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अ.मू.चे पेपर अवलोकन, तांत्रीक विश्लेषण वापरून विचारपुस केली असता आर्थिक व्यवहारातून हत्या केल्याची कबुली दिली.

 मयत अभिजीत सांबरे हा आरोपीचा मित्र होता. त्यांचे यापुर्वीपासुन पैश्यांचे व्यवहार होते व त्यातुन त्यांचा वाद विकोपास गेला होता. त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत इसम अभिजीत सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता. 

27 जुन 2023 रोजी आर्थीक व्यवहाराकरीता यातील मयत हा येवला जि, नाशिक येथे जाणार होता. त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते. संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेवुन रात्री 9.00 वाचे सुमारास त्यास दारूमधुन ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरीक्त मात्रेमध्ये गोळया मिसळुन त्यास दारू पाजली. त्यातुन मयत अभिजीत सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असतांना त्यास त्याचे बुलेट गाडीवर मागे बसुन येवला येथुन संभाजीनगर कडे जाणा-या रस्त्याने वैजापुर गावाजवळुन कोपरगाव रस्त्याने घेवुन गेला. 

मयत इसम अभिजीत सांबरे याची शुध्द हरपल्याचा अंदाज घेवुन गाडी थांबवुन त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकुन देवुन पोबारा केला होता. 

या प्रकरणात कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे भादंविक 302 प्रमाणे दाखल झाला असुन त्यास पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *