Dnamarathi.com

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी असलेल्या महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांची बालमटाकळी येथे असणाऱ्या गट नंबर १३५ मधील दीड एकर शेतीमध्ये कपाशी व तूर पिकाची लागवड केली होती.

हे पीक मोठी झाल्याने सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख हे दोघे शनिवार दिनांक २९ जुलै रोजी दुपारी आपल्या शेतात खुरपण करत होते. तेव्हा  अचानक सोफिया शेख यांची भावजाई हुमेरा युनुस शेख राहणार अहमदनगर यांनी सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख यांना 

 शेतामध्ये येऊन शिवीगाळ करत दीड एकर शेतीमधील उभे असलेले कपाशी व तुरीचे पीक हे आमच्या डोळ्यादेखत उपटून फेकून दिले. त्यामुळे फिर्यादीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

याबाबत हुमेरा युनूस शेख यांना आम्ही आमची कपाशी व तुर पीक का उपटले अशी विचारणा केली असता त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

 याबाबत महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुमेरा युनुस शेख यांचे विरोधात शेवगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास व आमच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *