Dnamarathi.com

Maharashtra News: धनगर समाजामध्ये आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी राज्य सरकारने महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील ढवळपूरी येते सुरू होणारे लोकर प्रक्रिया केंद्र हे रोजगारासाठीचे मुख्य केंद्र ठरेल असा विश्वास माजी खा. विकास महात्मे यांनी व्यक्त केला.

अहिल्यानगर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्याने डॉ. महात्मे यांनी धनगर समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधत  मार्गदर्शन केले. 

माध्यमांशी बोलताना डॉ. महात्मे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आदिवासी समाजाप्रमाणेच धनगर समाजालाही सर्व सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल. या पुर्वी केवळ आश्वासनाची खैरात धनगर समजाचाला वाटत त्यांची फसवणूक केली.  

डॉ. महात्मे म्हाडा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवली त्या वेळेसही धनगर समाजाला मोठ मोठी आश्वासने दिली होती.  राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी लेखी आश्वासन देवूनही समाजाच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीने समाजासाठी काय केले हा प्रश्न कायम आहे. 

याउलट राज्यातील महायुती सरकारने नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर असा नामविस्तार केला, सोलापूर विद्यापिठालाही अहिल्यादेवींचे नाव दिले. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देताना स्वयंयोजनेचा लाभ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील ढवळपूरी येथे लोकर प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय हा समाजातील युवकांसाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. यामुळे या जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते सक्रियपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले. 

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले याच्या जाहीर सभेचे आयोजन नगर शहरातील मंगलगेट येथे शुक्रवार 10 मे रोजी करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे नेते सुनील साळवी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *