2024 Maruti Suzuki Dzire: जर तुम्ही देखील नवीन डिझायर खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
माहितीनुसार, मारूती सुझुकी आपली नवीन कार 2024 Maruti Suzuki Dzire 4 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे.
2024 Dezire ला 6-स्लॅट ग्रिल, हेडलॅम्प आणि LED DRLs, नवीन डिझाइन केलेले बंपर आणि बरेच काही असलेला नवीन फेस मिळेल. हे हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर देखील तयार करण्यात आले असून नवीन के-सिरीज इंजिन नवीन कारमध्ये उपलब्ध होणार आहे.
केबिनमध्ये मोठे बदल होणार
नवीन मारुती सुझुकी डिझायरमध्ये फुल एलईडी लाइटिंग, ORVM वरील कॅमेरा, 360 डिग्री कॅमेरा सेटअप यासारखी फीचर्स मिळू शकतात. केबिनचा फोटो अजून समोर आलेला नाही पण बदललेला डॅशबोर्ड, अपडेटेड टचस्क्रीन सिस्टीम, वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स यात असणार अशी चर्चा आहे.
याशिवाय, कंपनी नवीन Dezire सह लेव्हल 2 ADAS, मानक 6 एअरबॅग्ज, हाय बीम असिस्ट, ओम्नी-डायरेक्शनल कॅमेरा, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प यांसारखी फीचर्स मिळवू शकतात.
किंमत किती असू शकते?
या कारमध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आढळू शकते जे 81 bhp पॉवर आणि 108 Nm पीक टॉर्क बनवते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असेल आणि यावेळी कंपनी ग्राहकांना ऑटोमॅटिक किंवा सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्यायही देऊ शकते. असा अंदाज वर्तवला जात आहे की ती 6.50 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते.