DNA मराठी

West Indies

team india

IND vs WI : संजू सॅमसनची सुपर इनिंग अन् भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल; वेस्ट इंडिजवर मात

IND vs WI: आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. या शानदार विजयासह भारतीय संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर मोठी धावसंख्या उभारली होती.मात्र भारताकडून संजू सॅमसनने संयम आणि आक्रमकतेचे उत्तम मिश्रण दाखवले. या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला, जिथे आता इंग्लंड आव्हान देईल. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोस्टन चेस आणि शाई होप यांच्या भागीदारीने वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. दोघांनी 68 धावा जोडल्या. होप 32 धावांवर बाद झाला. बुमराहने एकाच षटकात दोन विकेट घेतले. पॉवेल आणि होल्डरने आक्रमक फलंदाजी केली. अर्शदीपने एका षटकात 24 धावा दिल्या. वेस्ट इंडिजने 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या. तर दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पॉवरप्लेमध्ये 53 धावा केल्या पण दोन विकेट गमावले. अभिषेक शर्मा 10 आणि इशान किशन 10 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. तिलक वर्माने 27 धावांची उपयुक्त खेळी केली. यानंतर संजू सॅमसनने जबाबदारी सांभाळली. त्याने नाबाद 97 धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने 17 धावा केल्या. सॅमसनमुळे भारताने 19.2 षटकात 5 बाद 199 धावा करून विजय मिळवला. हा विश्वचषकातील भारताचा सर्वात मोठा पाठलाग होता. उपांत्य फेरीची तयारी या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. आता त्यांचा सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी होईल.

IND vs WI : संजू सॅमसनची सुपर इनिंग अन् भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल; वेस्ट इंडिजवर मात Read More »

aus vs wi

ऑस्ट्रेलियाचा कहर, वेस्ट इंडिज फक्त 27 धावांवर ऑल आऊट; स्टार्क ठरला हिरो

Aus Vs WI : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा दुसरा डाव फक्त 27 धावांवर रोखला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ फक्त 27 धावांवर सर्वबाद झाला. कसोटी क्रिकेटमधील हा दुसरा सर्वात कमी धावसंख्या आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य होते. परंतु वेस्ट इंडिज संघ फक्त 27 धावांवर गारद झाले. कसोटी क्रिकेटमधील हा 70 वर्षातील सर्वात कमी धावसंख्या आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यातील हा सर्वात कमी धावसंख्या आहे. या सामन्यात एकूण सात फलंदाज शून्यावर बाद झाले. 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या मिचेल स्टार्कने कहर केला. दुसऱ्या डावात पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने तीन विकेट घेतले. तर या डावात सहा विकेट घेतले. तर स्कॉट बोलँडने हॅटट्रिक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी स्कोअर 26 – न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, ऑकलंड – 1955 27 – वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, किंग्स्टन, 2025 30 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, ग्वेबेर्हा, 1986 30 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, 1924 यासह स्टार्कने त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यात 400 बळी पूर्ण केले आणि बोलँड कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा 10 वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलियाचा कहर, वेस्ट इंडिज फक्त 27 धावांवर ऑल आऊट; स्टार्क ठरला हिरो Read More »