DNA मराठी

US Tariffs on India

share market

Share Market Today : ट्रम्प टॅरिफमुळे बाजार कोसळला, 4.14 लाख कोटी बुडाले

Share Market Today : गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर आज शेअर बाजारात पुन्हा एका मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेने २७ ऑगस्टपासून २५% अतिरिक्त टॅरिफ लादण्याच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच भारतीय बाजारात परिणाम दिसून येत आहे. सकाळी ९.१५ वाजता बाजार उघडताच, ट्रम्प कर आकारणीचा परिणाम दिसून आला आणि सेन्सेक्स २५० अंकांच्या घसरणीसह व्यवहार सुरू झाला, तर सकाळी ९.३७ वाजता बीएसई ६५० अंकांपेक्षा जास्त घसरणीसह ८०,१०८.४१ अंकांवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी ५० उघडताच १२४ अंकांनी घसरला आणि २४५७७ अंकांवर उघडला. निफ्टी बँक ५४००३ अंकांवर उघडला, ४४०.३० अंकांनी घसरला. या शेअर्सवर सर्वाधिक परिणाम सेन्सेक्सच्या शेअर्सवर आज सर्वाधिक दबाव एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, बीईएल, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी यांच्यावर दिसून आला. दुसरीकडे, इटरनल, एचयूएल, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, टायटन आणि एल अँड टी यांचे शेअर्स वधारले. ट्रम्प टॅरिफमुळे बाजार कोसळला अमेरिकेने बुधवारपासून भारतीय उत्पादनांवर २५% अतिरिक्त टॅरिफ लादला आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम कापड, रत्ने आणि दागिने, कार्पेट, फर्निचर आणि कोळंबी उद्योगावर होण्याची अपेक्षा आहे. ४.१४ लाख कोटी रुपयांचे शेअर्स बुडाले सत्रात बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक १% पेक्षा जास्त घसरले. जोरदार विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४.१४ लाख कोटी रुपयांची घट झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रात ४४९ लाख कोटी रुपयांवरून सुमारे ४४५ लाख कोटी रुपयांवर आले.

Share Market Today : ट्रम्प टॅरिफमुळे बाजार कोसळला, 4.14 लाख कोटी बुडाले Read More »

cancel trade talks with india

अमेरिकेने भारताबरोबरचे व्यापार चर्चा रद्द; भारताची तीव्र नाराजी

नवी दिल्ली : भारत-अमेरिका संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण करणारा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. नवी दिल्ली येथे २५ ते २९ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय व्यापार चर्चांना अमेरिकेने अचानक रद्द केले. हा निर्णय २७ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या अमेरिकेच्या नवीन कस्टम शुल्कांशी थेट संबंधित आहे. या शुल्कांमुळे भारतीय वस्तूंवर २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. पोलाद, अॅल्युमिनियम, औषधे, कपडे आणि कृषी उत्पादनांवर याचा गंभीर परिणाम होईल. निर्यातदारांमध्ये चिंता असून अमेरिकेतील ग्राहकांनाही महागाईचा फटका बसेल. भारताने या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेचे हे पाऊल अन्यायकारक असून, याचा दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. भारताने हे प्रकरण जागतिक व्यापार संघटना (WTO) समोर नेण्याची तयारी दर्शवली आहे. व्यापार चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत डिजिटल व्यापार, सेवा क्षेत्रातील सहकार्य, औषधनिर्मिती उद्योगातील निर्यात, उच्च तंत्रज्ञान गुंतवणूक आणि कृषी क्षेत्रातील व्यापार सवलतीवर चर्चा होणार होती. मात्र चर्चांचा रद्द केल्यामुळे तोडगा काढण्याची प्रक्रिया थांबली आहे. तज्ञांच्या मते, अमेरिकेच्या स्थानिक उद्योगांना संरक्षण देणे आणि निवडणूकपूर्व राजकारण हा या निर्णयामागचा प्रमुख हेतू आहे. तथापि, भारताने राजनैतिक मार्ग खुले ठेवत संवाद साधण्याचे संकेत दिले आहेत.अमेरिका आणि भारतामध्ये गेल्या काही वर्षांत व्यापारी मुद्द्यांवर मतभेद झाले आहेत. आता चर्चांचा रद्द आणि शुल्कवाढीमुळे हा तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या परिस्थितीवर दोन्ही देश कसा मार्ग काढतात, याकडे जागतिक बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेने भारताबरोबरचे व्यापार चर्चा रद्द; भारताची तीव्र नाराजी Read More »