DNA मराठी

Uddhav Thackeray news

uddhav thackeray

Uddhav Thackeray: ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांना मदत करा; उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड,, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती. पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी , चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. अतिशय तुटपुंजी मदत दिली. शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला ही सरकार शेतकऱ्यांना देतंय पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत आहेत एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला सापत्न वागणूक देताय. साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सीएम आणि DCM ना वेळ नाही. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे आणि टेबल न्यूज तयार करणे सुरू आहे. कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता. जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार? केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावे शेतकऱ्यांच्या बाबतीतही पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. पहिल्यांदा छान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या. ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या.

Uddhav Thackeray: ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांना मदत करा; उद्धव ठाकरे Read More »

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्टोक अन् शिंदेंना इशारा, भास्कर जाधव होणार विरोधी पक्षनेते!

Bhaskar Jadhav : 03 मार्चपासून महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात विरोधकांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून शिवसेना नेते भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. विरोधकांकडून विरोधीपक्ष नेतेसाठी पुरेशी संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पदासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती मात्र आता या पदावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची निवड करण्यात येणार आहे. तर विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेसाठी काँग्रेस दावा करणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गट विधानसभा सदस्यांची बैठक पार पाडली. याबैठकीत विरोधी पक्ष नेता ठरवण्याचा पूर्ण अधिकार आमदारांनी ठाकरे यांना दिले होते. त्याप्रमाणे आज ठाकरे शिवसेनेतून विधानसभा अध्यक्षांना भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कोण आहे भास्कर जाधव?भास्कर जाधव यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. त्यानंतर त्यांनी विधानसभेत एंट्री केली. जाधव सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधिमंडळ कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव त्याना आहे. 2009 ते 2014 कालावधीत ते राज्यमंत्री पद भूषविले होते. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या आक्रमकतेचा फायदा पक्षाला होऊ शकतो. शिवसेना फुटीनंतर  झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेला कोकणात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. कोकणात सर्व जागा ठाकरे शिवसेनाच्या हातून गेल्यानंतर गुहागर मधील जागा भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आपल्यकडे राखण्यात ठाकरे शिवसेनेला यश आले आहे. उद्धव ठाकरे यांची खेळीकोकण विभागातून एकमेव निवडून आलेल्या भास्कर जाधव यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद देऊन ठाकरे शिवसेना नवीन डाव टाकला आहे. कोकणात शिंदे शिवसेनेला शह देणे,आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणत कोकणी मतदार आहे, त्यातल्या त्यात पूर्व मुंबईत कोकणी मतदार  आपल्यकडे वाळविण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी उचललेले पाऊल बोलले जात आहे.

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्टोक अन् शिंदेंना इशारा, भास्कर जाधव होणार विरोधी पक्षनेते! Read More »

Eknath Shinde: ठाकरेंना धक्का अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल

Eknath Shinde: उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. उबाठा गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना शिंदे यांनी हे मत व्यक्त केले. उबाठा गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्याना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात नवी मुंबईतील उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेविका मेघाली राऊत, शिवसेना उबाठा गटाचे कोपरखैरणेचे विभागप्रमुख मधुकर राऊत आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नवी मुंबईतील या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिल्याने त्याना हा मोठा धक्का मानला जातो आहे. दुसरीकडे पालघरमधूनही अनेक पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेची वाट धरली.यात उबाठा गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, उबाठा शहरप्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवासेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांनी आज पक्षप्रवेश केला. तर धुळे जिल्ह्यातून माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संदीप चव्हाण, चंद्रकांत मस्के, मनीषा शिरोळे, आधार हाके आदी पदाधिकारी, तर धुळे शहरातील माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, पुरुषोत्तम जाधव, शेखर दुधाने, धुळे ग्रामीण मधील संजय माळी, सुधाकर पाटील, किशोर माळी, किशोर देवरे, साक्री शहरातील महावीर जैन, नितीन गायकवाड, महेश खैरनार, हर्षल माळी तसेच धुळे शहरातील युवासेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गातील नागरिकांनी शिवसेनेची भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीत आपल्या पक्षाचे 57 आणि 3 सहयोगी पक्षाचे असे 60 उमेदवार निवडून आले. त्यामुळे जनतेने शिवसेनेची साथ दिली असून, खरी शिवसेना कुणाची आहे हेदेखील दाखवून दिले असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांचे आता पक्षप्रवेश होत असून ही संख्या वाढत जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Eknath Shinde: ठाकरेंना धक्का अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल Read More »

Uddhav Thackeray : ‘मला भाजपमुक्त राम हवाय, उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे मात्र त्याआधी सर्व राजकीय पक्षांकडून जोरात तयारी सुरू झाली आहे. यातच शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजपवर जोरदार टीका केली आहे.  उध्दव ठाकरे म्हणाले की, ‘मी कोणाच्याही विरोधात नाही. भाजपच्या लोकांनी माझे निवडणूक चिन्ह चोरले आहे. 15 लाख देण्याचे बोलले, 15 लाख कुठे गेले? ‘भाऊ-बहिण म्हणणारे कुठे आहेत? आता दिसत नाही. मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जातात. सर्व गोष्टी गुजरातला जात आहेत. इतर भिकारी आहेत, पण आम्ही भिकारी नाही. ते आम्हाला ‘लाडली बहीण योजने’ अंतर्गत फक्त 1500 रुपये देत आहेत, पण एवढ्यानेही काय होणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपमुक्त रामाची इच्छा उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आदर्श घोटाळा झाला आहे, पण त्यात कोणाचा हात आहे ते कोणी सांगेल का? राम मंदिर बांधण्यासाठी लोकांनी आपले रक्त दिले आहे. सामान्य लोक जय श्री राम म्हणतील आणि तुम्ही फक्त केम छो म्हणतील, पण मला भाजपमुक्त राम हवा आहे, तुम्ही काही महिने थांबा. मी याआधीही सांगितले आहे की तुम्ही किंवा मी पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम सर्व आमच्यासोबत आहे. ठाकरे म्हणाले की, ‘नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याचं ऐकलं आहे, त्यामुळे ते 4 महिन्यांसाठी फक्त 1500 रुपये देत आहेत. भाजपला संपूर्ण महाराष्ट्र 1500 रुपयांना विकत घ्यायचा आहे का? ही एक योजना आहे, जे तुमचे पैसे आहेत आणि तुम्ही ते घेतलेच पाहिजे.

Uddhav Thackeray : ‘मला भाजपमुक्त राम हवाय, उद्धव ठाकरेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल Read More »

Uddhav Thackeray On Modi : अन् उद्धव ठाकरे यांनी दिला भाजपला आव्हान, म्हणाले- ‘हिंमत असेल तर…’

Uddhav Thackeray On Modi : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर टीका करत भाजपला खुला आव्हान दिला आहे.  दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात इंडिया अलायन्सने दिल्लीच्या रामलीला मैदानावर मेगा रॅलीचे  आयोजन केले होते.  या रॅलीमध्ये शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.  यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही (कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल) काळजी करू नका, फक्त आम्हीच नाही तर संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे… काही दिवस पूर्वी भीती होती की आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय का? पण आता ही भीती नसून वास्तव आहे… अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक करून लोक घाबरतील असे भाजपला वाटत असावे, पण त्यांनी आपल्या देशवासीयांना कधीच ओळखले नाही.” भाजपवर निशाणा साधत ठाकरे म्हणाले, निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक करून भाजपमध्ये दाखल झालेल्या गुंडांवरील खटले मागे घेण्यात आले, ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ धुतले गेले. उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुले आव्हान दिले असून तुमच्यात (भाजप) हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा आणि ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे भाजपचे तीन मित्र पक्ष असल्याचे दाखवा. अरविंद केजरीवाल यांना आरोपी करून तुरुंगात टाकले, हेमंत सोरेन यांना आरोपी करून तुरुंगात टाकले. हा कोणता कायदा आहे? रामलीला मैदानावरील मेगा सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांचे (भाजपचे) स्वप्न 400 (जागा) पार करण्याचे आहे… आता वेळ आली आहे की एका पक्षाचे आणि एका व्यक्तीचे सरकार उखडून टाकावे लागेल. आम्ही इथे निवडणूक प्रचारासाठी आलो नाही, लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहोत…ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना सोबत घेतले…भ्रष्टाचाऱ्यांनी भरलेला पक्ष सरकार कसे चालवू शकतो?…

Uddhav Thackeray On Modi : अन् उद्धव ठाकरे यांनी दिला भाजपला आव्हान, म्हणाले- ‘हिंमत असेल तर…’ Read More »

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण

Uddhav Thackeray : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.  यातच आता उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का लागला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या निकटवर्तीयांना ईडीने समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बोभाटे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. सीबीआयने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.  सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेबाबत गुन्हा दाखल केला होता. बोभटे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी या आठवड्यात हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. एजन्सीच्या एका सूत्राने सोमवारी संध्याकाळी याची पुष्टी केली. बोभाटे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावरही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की या जोडप्याने 2.58 कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, जी त्यांच्या उत्पन्नाच्या उघड स्त्रोतांपेक्षा 36 टक्क्यांनी जास्त आहे. बोभटे यांनी यापूर्वी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ सहाय्यक पदावर काम केले आहे. सीबीआय प्रकरणानुसार, बोभटे यांनी 2014 ते 2023 या कालावधीत विमा कंपनीत काम केले. या काळात त्यांनी निर्माण केलेली संपत्ती त्यांच्या घोषित उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त आहे.  बोभटे यांची संपत्ती मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि जंगम आणि जंगम मालमत्तांच्या स्वरूपात आहे. या प्रकरणी दिनेश बोभाटे यांना समोरासमोर विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असे एजन्सीचे म्हणणे आहे. आज उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्याआधी ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांच्या सहकाऱ्याला समन्स बजावल्याने चिंता वाढली आहे. बोभटे यांच्या बँक खात्यातही अनियमितता झाल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.  सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ‘आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी असे दिसते की दिनेश बोभटे यांनी कर्मचारी म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला आणि त्यातून संपत्ती कमावली. त्याची संपत्ती दाखवलेल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा कितीतरी जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोभटे यांना अनेक मुदत ठेवी, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि निधी मिळाला होता. मित्र आणि मुलाकडून आर्थिक मदतीच्या नावावर त्यांनी ही रक्कम घेतली होती. यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. याशिवाय त्यांच्या खात्यात अनेक प्रकारची रक्कम जमा करण्यात आली होती, ज्याबद्दल दाम्पत्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही.  सीबीआयच्या तपासादरम्यान, ईडीने फेब्रुवारी 2024 मध्ये या प्रकरणी गुन्हाही नोंदवला होता. ईडी या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगच्या कोनातून तपास करत आहे.

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण Read More »

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक

Maharashtra News : राज्याच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर सायंकाळी 5 वाजता जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. तर उद्या (26 मार्च) उद्धव गटाच्या 15 किंवा 16 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्याआधी या बैठकीत ज्या जागांवर दोन गटात वाद आहे, त्यावर चर्चा होणार आहे.  तर दुसरीकडे 2014 आणि 2019 ची परिस्थिती आता राहिलेली नाही, असे स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाला काँग्रेसकडून सांगण्यात आले. काँग्रेस पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. अशा स्थितीत ठाकरे सेनेने जास्त जागांची अपेक्षा करू नये. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे सेना अतिआत्मविश्वासात आहे. ठाकरे आणि पवार यांनी युतीकडे अधिक जागांची मागणी केली असली तरी बुलढाणा आणि वर्धासारख्या जागांसाठी त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत. शिवसेनेची कट्टर हिंदू व्होट बँक (यूबीटी) त्यांच्याकडे जाईल की नाही, अशी काँग्रेसला चिंता आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका कधी होणार? लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 8 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांवर, चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 11 जागांवर आणि पाचव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक Read More »