DNA मराठी

Uday Samant

uday samant

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय

Uday Samant : अहिल्यानगर जिल्ह्याची शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून विद्यमान जिल्हाप्रमुखांना प्रभारी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे थंडावलेले काम पाहता सामंत यांनी हे बदल केले असून येणाऱ्या काळात पक्ष मजबुती व बळकटीकरणासाठी पावले उचलले जातील असं सामंत म्हणाले. मंत्री उदय सामंत हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बनवतात मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह नगर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाची सुरू असलेली शिथिल वाटचाल यावर मंत्री सामंत यांनी नाराजी व्यक्त करत अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षाची कार्यकारणी बरखास्त करून केवळ जिल्हाप्रमुख नितीन अवताडे हे प्रभारी म्हणून काम पाहतील असे स्पष्ट आदेश दिले आहे. नव्याने संघटन बांधणी होईपर्यंत अवतडे हेच काम पाहतील दरम्यान आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठे राजकीय बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Uday Samant : अहिल्यानगर शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त; मंत्री सामंतांचा मोठा निर्णय Read More »

Uday Samant 1024x562

मोठी बातमी! शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची

Uday Samant : शहीद संदीप गायकर यांच्या ब्राम्हणवाडा गावी त्यांच्या कुटुंबीयांची उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शहीद संदीप गायकर कुटुंबाला रोख पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर तसेच त्यांच्या माता-पित्यांकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, पदाधिकारी राम रेपाळे, बाजीराव दराडे, एकनाथ यादव तसेच ब्राम्हणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आदी उपस्थित होते. शहीदाच्या कुटुंबाशी संवाद साधताना डॉ. उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत गायकर कुटुंबाला मानसिक आधार दिला. “शहीदाचे बलिदान देश विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे राज्य शासन नेहमीच उभी राहील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मोठी बातमी! शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची Read More »