tridha choudhury

Tridha Choudhury : ‘आश्रम’मधील बोल्ड सीन ठरले ब्रेकअपचे कारण? अभिनेत्री त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा

Tridha Choudhury : अभिनेता बॉबी देओलच्या गाजलेल्या ‘आश्रम’ वेब सीरिजमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री त्रिधा चौधरी हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. या मालिकेतील बोल्ड आणि इंटिमेट दृश्यांमुळे तिच्या प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि अखेर ब्रेकअप झाल्याचे तिने सांगितले आहे. एका मुलाखतीत त्रिधाने सांगितले की, ‘आश्रम’मधील भूमिका तिच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली. मात्र, मालिकेतील इंटिमेट दृश्यांमुळे तिचा तत्कालीन प्रियकर अस्वस्थ झाला. अभिनय आणि वास्तव यातला फरक तो स्वीकारू शकला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले आणि नात्यात तणाव वाढत गेला. त्रिधा म्हणाली की, त्या काळात तिला स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण करण्यात आली. मात्र आता ती त्या कठीण काळातून पूर्णपणे बाहेर पडली असून, मागे वळून पाहताना त्या निर्णयाबद्दल कोणतीही खंत वाटत नाही. अभिनय हा तिचा व्यवसाय असून, प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाला तिने अधिक महत्त्व दिल्याचेही तिने स्पष्ट केले. प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये त्रिधाने ‘बबिता’ची भूमिका साकारली होती. बॉबी देओलसोबतच्या तिच्या काही बोल्ड दृश्यांची त्या काळात मोठी चर्चा झाली होती. या भूमिकेमुळे त्रिधाला देशभरात मोठी ओळख मिळाली असून, ‘आश्रम’च्या पुढील पर्वाचीही प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Tridha Choudhury : ‘आश्रम’मधील बोल्ड सीन ठरले ब्रेकअपचे कारण? अभिनेत्री त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा Read More »