DNA मराठी

Sunil Tatkare

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार

Sunil Tatkare : महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी मंत्र्यांसह पूरग्रस्त जिल्हयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत शिवाय नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले. दरम्यान शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य जनतेच्या दु:खाच्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगतानाच आगामी काळात आणखीही मदत व दिलासा देणार्‍या उपाययोजना जाहीर करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार Read More »

controversial decision of ncp ajit pawar group to give suraj chavan a chance as state general secretary

सूरज चव्हाण यांना ‘प्रदेश सरचिटणीस’पदी संधी; एनसीपी (अजित पवार गट)चा वादग्रस्त निर्णय

Ajit Pawar – Sunil Tatkare – Suraj Chavan मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) NCP मध्ये अलीकडेच युवक प्रदेशाध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आलेल्या सूरज चव्हाण ( Suraj Chavan) यांना पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. अल्पावधीतच त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूरज चव्हाण यांना काही दिवसांपूर्वीच पक्षशिस्तभंगाच्या कारणास्तव पदावरून दूर करण्यात आले होते. परंतु, अचानक झालेल्या या नियुक्तीमुळे पक्षातील गटबाजी आणि नेतृत्वातील निर्णयप्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटात निष्ठा आणि संघटन कौशल्य याला महत्त्व देण्यात येते, असे सांगत समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, विरोधकांनी या संधीला “निलंबनाचे नाटक” असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युवकांमध्ये चव्हाण यांचा ठसा उमटलेला असला तरी त्यांच्या नेमणुकीवरून विरोधकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. “एका बाजूला शिस्तभंगाच्या नावाखाली शिक्षा आणि दुसऱ्याच बाजूला बढती, हा दुहेरी मापदंड” असा सूर व्यक्त होत आहे. काही कार्यकर्त्यांनीही आतल्या गोटात नाराजी दाखवली असल्याची माहिती मिळते. दरम्यान, अजित पवारांनी मात्र या नेमणुकीला संघटन मजबुतीसाठी आवश्यक पाऊल असे सांगत निर्णयाचे समर्थन केले आहे. महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात सूरज चव्हाण यांना अधिक सक्रीय भूमिका मिळणार असल्याचे संकेत या नियुक्तीतून मिळत आहेत. नेमकं काय घडलं होतं? तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, त्या नंतर लातूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दौऱ्यावर लातूरमध्ये होते. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पत्रकार परिषदेत पत्ते फेकत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तटकरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले, परंतु यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या घटनेनंतर सामाजिक व राजकीय स्तरावर तीव्र टीका झाली. परिणामी, अजित पवारांनी चव्हाण यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली होती. मात्र, काही महिन्यांतच सुरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. निलंबनानंतर मिळालेली ही बढती नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर झाली, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणात अजित पवार गटाचा हा निर्णय पक्षासाठी फायदेशीर ठरेल की नवे वाद निर्माण करेल, हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.

सूरज चव्हाण यांना ‘प्रदेश सरचिटणीस’पदी संधी; एनसीपी (अजित पवार गट)चा वादग्रस्त निर्णय Read More »

Sunil Tatkare : संघटन बांधणी…धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचा कोअर ग्रुप

Sunil Tatkare : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संघटन बांधणी,धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. पक्षांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आदींचा समावेश आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,पक्षसंघटनेची बांधणी,त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भात महत्त्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Sunil Tatkare : संघटन बांधणी…धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचा कोअर ग्रुप Read More »