DNA मराठी

Sujay Vikhe

IMG 20240206 WA0006

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता निश्चितच ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण असल्याचे  प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सुजय विखे पाटील यांनी केले. निळवंडे उजव्या कालव्यामुळे शेतकरी नक्कीच सुखावेल असा विश्वास व्यक्त करून  राज्यातील महायुती सरकारमुळे धरणाच्या दोन्ही कालव्याच्या कामाला गती मिळून पाणी सोडण्याच्या निर्णय शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे तांभेरे,कानडगाव, निंभेरे, तुळापूर, तांदूळनेर,वडनेर,कनगर,चिंचविहरे ,गुहायेथे  जलपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. धनश्री विखे यांनी सांगितले की जिल्ह्याच्या विकासासाठी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ सुजय विखे पाटील  सदैव प्रयत्नशील आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे स्पष्ट करून, निळवंडे कालवा व्हावा ना. विखे पाटील यांचा पाठपुरवा महत्वपूर्ण ठरला असल्याचे सौ.विखे म्हणाल्या. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे,रवींद्र म्हसे, भिमराज हारदे, नानासाहेब गागरे,डॉ बापूसाहेब मुसमाडे, सरपंच निशा गागरे,उत्तम राव मुसमाडे,संदीप गीते,मारुती नालकर,सर्जेराव गाडगे, संदिप गाडगे ,आणा पाटील बलमे, बबनराव कोळसे,विजय बलमे, यांच्या सह सर्व व पदाधिकारी ,अधिकारी व ग्रामस्थ उपस्तीत होते.

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील Read More »

IMG 20240206 WA0005

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

Ahmednagar News:  आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या 618 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले. एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील 618 एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता.  उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.  खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे. या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध  होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग 1 करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी Read More »

MP Sujay Vikhe

Sujay Vikhe : खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश! ‘या’ योजनांना प्रशासकीय मान्यता..

Sujay Vikhe : अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या सुमारे १५ को.प. बंधारे आणि गे.सी. बंधारे योजनांना महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आज त्या प्रयत्नांना आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद वाटत असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.    या योजनांच्या कामासाठी भरीव निधी मंजूर झाला असून मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित कामाप्रित्यर्थ सुमारे ८.५ कोटी रुपये व अनुषंगिक खर्चासाठी ६५ लक्ष रुपये अशा एकूण अंदाजित ९.५ कोटी रुपयांच्या किमतीस मान्यता प्रदान करण्यात आली आहे.  तसेच सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता ५३०.२८ स.घ.मी. असून नियोजित एकूण सिंचन क्षमता १९६ हेक्टर इतकी असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.  या योजनेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून यापैकी नगर तालुक्यात दोन, पाथर्डी-५, पारनेर-२, श्रीगोंदा-३ आणि शेवगाव, जामखेड आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एका जागेची अशा एकूण १५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान खासदार विखेंनी सदरील भरीव रकमेस मान्यता मिळवून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Sujay Vikhe : खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश! ‘या’ योजनांना प्रशासकीय मान्यता.. Read More »

IMG 20240120 WA0012

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित..

Sujay Vikhe News: आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. उन्मेष पाटील यांच्या वतीने चाळीसगाव येथे व्यास भागवत कथेचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता प्रदिपजी मिश्रा यांचा प्रभू श्रीराम शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरील भव्य कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातही व्हावा या अनुषंगाने सदर ठिकाणी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत सुजय विखेंनी प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिव महापुराण कथा विमोचनकर पंडित प्रदीप मिश्रा यांचा ‘प्रवचन सोहळा’ पूर्ण श्रध्देने आणि सुव्यवस्था राखून यशस्वी करणार असल्याचा निर्धार यावेळी सुजय विखे यांनी बोलून दाखविला.

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित.. Read More »

IMG 20240119 WA0005

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

Ahmednagar News: खा.सुजय विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा.सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ, शिरा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.  त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिरा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खा.विखे यांनी अण्णांना दिली.  किट मध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत. अण्णांना सदर किट यावेळी प्रदान करण्यात आले. आण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखर-डाळ शिरा भेट देत आहे, आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खा.विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली. तसेच किटमध्ये काय-काय वस्तू आहेत त्याची उत्सुकतेने पाहणी केली. या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला  समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले.  तसेच खा.सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी  काशिनाथ दाते सर, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट Read More »

IMG 20240118 WA0002

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार…

Ahmednagar News:  जामखेड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले, विखे पाटील परिवार कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता नेहमी समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आत्तापर्यंत खूप उपक्रम या अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील परिवाराने राबवले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, महिलांसाठी शनिशिंगणापूर शिर्डी तसेच पंढरपूर तुळजापूर अशा भक्तीपिठांची यात्रा आयोजित करून महिलांना दर्शन घडवून आणले. यासोबतच 22 जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकाने दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करावी या हेतूने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण नगर दक्षिणमध्ये साखर वाटप देखील करत आहोत असे सांगून या उपक्रमाचा हेतू म्हणजे सदरील सोहळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात पुन्हा दिवाळी साजरी केली जाईल असेही डॉ. सुजय विखेंनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी सांगितले की, जामखेड तालुक्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू न देता प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले आहे. याचेच फलित म्हणजे विकास कामांचा ओघ हा वाढतच आहे. आज प्रत्येक गावामध्ये जात असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा निधी देऊन त्या गावातील विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि ही वाटचाल यापुढेही सुरूच राहील असेही त्यांनी संगितले.  विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेपूर निधी हा जनसामान्यांना उपलब्ध होत असतो. त्यामुळे सदरील विकासकामे वेगाने मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. दरम्यान आज खासदार सुजय विखेंनी जवळा, खर्डा, शिवूर, मोहा, जामखेड शहरांमध्ये आज चार किलो साखर व चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार… Read More »

IMG 20240117 WA0002

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश…

Maharashtra News: कुकडी प्रकल्पाचे मागील १५ डिसेंबर पासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही २१ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली.  याप्रश्नी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूर धरणार पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दिल्याने ना.विखे आणि आ.पाचपुते यांची शिष्टाई कामी आल्याची माहिती दिली.    डाॅ. विखे यांनी बोलताना विसापुरच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी आहे. पाणी सोडण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते हे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या वेळोवेळी संपर्कात होते. विसापूर धरणात पाणी सोडण्याबाबत दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली.  त्यानुसार उपमुखमंत्री पवार यांनी येत्या २१ जानेवारीपासून कुकडीच्या सुरु असणाऱ्या आवर्तनातून विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिले. २१ ते २३ जानेवारी दरम्यान ३०० दशलक्षघनफूट पाणी विसापुरमध्ये सोडण्यात येणार असून त्यानंतर ते लाभधारकांना आवर्तनाद्वारे देण्यात येईल.  त्यामुळे त्याभागातील शेतीचा पाणी प्रश्नही मिटण्यास मदत होणार असल्याचे सांगत विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी , शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश… Read More »