DNA मराठी

Sujay Vikhe Patil News

IMG 20240117 WA0002

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश…

Maharashtra News: कुकडी प्रकल्पाचे मागील १५ डिसेंबर पासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही २१ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली.  याप्रश्नी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूर धरणार पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दिल्याने ना.विखे आणि आ.पाचपुते यांची शिष्टाई कामी आल्याची माहिती दिली.    डाॅ. विखे यांनी बोलताना विसापुरच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी आहे. पाणी सोडण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते हे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या वेळोवेळी संपर्कात होते. विसापूर धरणात पाणी सोडण्याबाबत दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली.  त्यानुसार उपमुखमंत्री पवार यांनी येत्या २१ जानेवारीपासून कुकडीच्या सुरु असणाऱ्या आवर्तनातून विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिले. २१ ते २३ जानेवारी दरम्यान ३०० दशलक्षघनफूट पाणी विसापुरमध्ये सोडण्यात येणार असून त्यानंतर ते लाभधारकांना आवर्तनाद्वारे देण्यात येईल.  त्यामुळे त्याभागातील शेतीचा पाणी प्रश्नही मिटण्यास मदत होणार असल्याचे सांगत विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी , शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश… Read More »

IMG 20231220 WA0009

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता

Sujay Vikhe Patil : अहमदनगर मध्ये रोजगाराची उपलब्धता वाढवण्याकरिता मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरीता शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहती करिता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्री मंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता.  काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता येथील 600 एकर म्हणजेच सुमारे 225 हेक्टर आर जमीन फेज 2 साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.  विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खाजगी जमीन मालकाची जमीन संपादित केली गेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते. या विस्ताराकरिता जागा उपलब्ध होणे जरूरीचे होते. मात्र राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली आणि राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरिता वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरिता खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. सुजय विखेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता Read More »

IMG 20231216 WA0007

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil :  खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे साखर वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज, बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन सकल मराठा समाज बाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी निवेदन दिले. खासदार विखेंनी त्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वीही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत. पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून आजवर कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिलेला नाही व इथून पुढेही निरनिराळ्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे मत मांडून आपण माझ्यावर जो विश्वास दाखवून मतदान केलं, या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.  विशेष म्हणजे याची प्रचिती आपल्याला विविध विकासकामांच्या माध्यमातून वेळोवेळी आलीच आहे असे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले. आज बोधेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.  खासदार विखे पुढे म्हणाले, बोधेगाव गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. यापुढे देखील भरीव निधी उपलब्ध करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट केले. दरम्यान २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटपाचे नियोजन चालू आहे असे सांगून २२ जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत असे मत मांडले.  सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत असे देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी उपस्थितांना केले. यावेळी ताराभाऊ लोंढे, बापूसो पाटेकर, नितीन भाऊ काकडे, रजाक शेख, बाबा सावळेकर, बाळासो कोळगे, महादेव घोरतळे, मयूर हुंडेकरी, बाळासाहेब कोळगे, संजय खेडकर, भगवान मिसाळ, बाळासाहेब डोंगरे, रामकाका केसभर, अमोल सागडे आदी मान्यवरांसह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील Read More »