DNA मराठी

Shevgaon Police

tukaram munde

Shevgao Police: शेगावात पोलिसांचा मोठा दणका; 70 लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Shevgao Police: पवित्र तीर्थक्षेत्र शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, यादव बेकरी समोर (वरवट बकाल रोड) रात्रीच्या सुमारास तब्बल ७० लाख १३ हजार ९२० रुपयांचा अवैध व प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे. आज सकाळ पर्यंत हि कारवाई सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री २२:१० वाजताच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किंता वसावे (अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा) हे पोलीस कर्मचाऱ्यांसह खाजगी वाहनाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी वरवट बकाल रोडवरील यादव बेकरी समोर संशयास्पद वाटणारा एक अशोक लेलँड ट्रक (क्र. MH-40-GT-2965) अडवून त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत शासकीय आदेशांचे उल्लंघन करून विक्री व वाहतुकीसाठी नेला जाणारा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित साठा आढळला. यामध्ये बाजीराव गोल्ड पानमसाला: ५० पोते, मस्तानी तंबाखू ११ पोते, नजर १००० पानमसाला व N-05 प्रीमियम तंबाखू: एकूण ५० पोते, प्रीमियम नजर पोते, अशोक लेलँड ट्रूक असा एकूण जप्त मुद्देमाल: ७०,१३,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी सुरुर अहम्मद नूर अहमद (वय ३७, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) या ट्रक चालकला अटक करण्यात आली.तर M/S Shree Siddheshwar Tobacco Prod. PVT. LTD. (पांढुर्णा, छिंदवाडा, म.प्र.) चे मालक/भागीदार संचालक.या दोघांविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shevgao Police: शेगावात पोलिसांचा मोठा दणका; 70 लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त Read More »

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक

Stock Market Scam: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना बारा तासाच्या आता अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख सिताराम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी क्लासिक ब्रीज वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक करण्यात आली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात तपास करत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुन्ह्यातील आरोपी संदीप मधुकर थोरात (वय-35 रा.पाईपलाईन रोड अहिल्यानगर, दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय-35 रा.घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर) यांची गुप्त माहीती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचे पथके तयार करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपी संदीप मधुकर थोरात याला त्याचे रहाते घरी जात असताना अटक केली तर आरोपी दिलीप तात्याभाऊ कोरडे याला सुपा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. वरील आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केले आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक Read More »

शेवगाव पोलिसांची धमाकेदार कारवाई, अफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या आरोपीला अटक

Ahilyanagar News: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत अफुच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. तसेच 11 लाख 43 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. गणेश नवनाथ घोरतळे, (22 वर्षे रा. मारुती वस्ती बोधेगाव ता. शेवगाव) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज्यात लागवडीस बंदी घातलेले अफुच्या झाडाची बोधेगाव शिवारात गणेश नवनाथ घोरतळे याने त्याच्या शेतामध्ये बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरोधात एन डी पी एस कायदा सन 1985 ते कलम 8(b), 18 प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शेवगाव पोलिसांनी दिली आहे.

शेवगाव पोलिसांची धमाकेदार कारवाई, अफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या आरोपीला अटक Read More »

Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Police : शेवगाव पोलीसांनी मोठी कारवाई करत अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेवुन आरोपीस 24 तासाचे आत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा आप्पासाहेब काजळे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांचे पती आप्पासाहेब भानुदास काजळे यांना 18 डिसेंबर रोजी दोन ते तीन इसमांनी बोधेगाव येथुन बळजबरीने वाहनात टाकुन पळवुन नेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळी तीन पोलीस पथके तयार करुन जि.सांगली, जि.बीड तसेच तिसरे पथक ता.पैठण हद्दीत रवाना केली. तपासाच्या सहाय्याने जि.बीड येथे गेलेल्या तपास पथकाला माहिती मिळाली की शिरुर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबुन ठेवले आहे. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना तसेच अपहरित व्यक्तीस ताब्यात घेतले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सोमनाथ बाबुश्या जाधव (रा. औरंगपुर ता.शिरुर कासार जि.बीड) असं आहे. तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेऊन नमूद गुन्ह्यात लवकरात लवकर अटक करणार आहोत.

Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई Read More »