DNA मराठी

Sawedi plot case

sawedi land scam the then board officer and then talathi were suspended, what's next, what's the matter.

Sawedi land scam – तत्कालीन मंडळाधिकारी व तत्कालीन तलाठी निलंबित, पुढे काय, काय आहे प्रकरण.

Sawedi land scam – अहिल्यानगर, २२ सप्टेंबर २०२५ –  सावेडी (गट क्रमांक २४५) येथील जमीन फेरफार प्रकरणातील गंभीर अनियमितता आढळल्यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पारनेर तालुक्यात कार्यरत मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना व तत्कालीन तलाठी प्रमोद दत्तात्रय गायकवाड यांनाही तातडीने शासनसेवेपासून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर भाग यांच्या पत्रावरून आणि त्यानुसार तयार झालेल्या तपास अहवालाच्या आधारे लागू करण्यात आले आहेत. अहवालात दिलेल्या निष्कर्षानुसार १९९१ मध्ये नोंद झालेल्या खरेदी दस्तावेजांमध्ये फेरफार करताना कोणत्याही सक्षम न्यायालयाचा आदेश न घेता व कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता ३४ वर्षांनंतर नोंदी करण्यात आल्या आहेत. ही कृती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८ या नियमांचे उल्लंघन ठरते, असे अहवालात नमूद आहे. अहवालातील मुख्य ठळक निष्कर्षः मुद्दे – सावेडी जमीन घोटाळा प्रकरण या निष्कर्षांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या कलमान्वये शिस्तभंगविषयक कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तलाठी प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्धही लेखी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. नागरिकांची प्रतिक्रिया व मागणीस्थानिक नागरिकांमध्ये या घटनेनंतर नाराजी लक्षात येत आहे. अनेक नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की अशा प्रकारच्या चुका सामान्य माणसाच्या आयुष्याला उध्वस्त करण्याची हिंमत करतात; त्यामुळे केवळ निलंबनापुरते मर्यादित न राहता कठोर प्रशासनिक आणि कायदेशीर कारवाई व्हायला हवी. काही नागरिकांनी प्रशासकीय निष्क्रियतेविरुद्ध आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी व्यक्त केली आहे. शासनाची दिशा आणि पुढील पावले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चालू तपास व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निलंबनात्मक आदेश लागू राहतील. परंतु अधिकार्यांच्या निलंबनानंतर पुढील अभ्यास व नोंदींचा आराखडा कसा असेल, ही बाब प्रशासनाच्या अंतर्गत निर्णयांवर अवलंबून राहील. काही वर्तुळांत असेही मत आहे की प्रशासकीय तपास संपल्यानंतर सहा–सात महिन्यांनी फेरविचार करून अधिकार्‍यांना कामावर परत आणण्याचे पर्यायही विचारात घेतले जाऊ शकतात, मात्र या अधिकाऱ्यांच्या चुकी मुले अनेक वर्ष हे प्रकरण न्यायलयात चालणार यात शंका नाही,

Sawedi land scam – तत्कालीन मंडळाधिकारी व तत्कालीन तलाठी निलंबित, पुढे काय, काय आहे प्रकरण. Read More »

sawedi land scam – documents missing, investigation continues, yet the buying and selling game continues; muhurat tomorrow

Sawedi land scam – दस्तावेज गायब, चौकशी सुरूच, तरीही खरेदी विक्रीचे खेळ सुरू; उद्या मुहूर्त

Sawedi land scam – अहिल्यानगर – सावेडी येथील गट क्रमांक 245 ब/1 मधील तब्बल बहात्तर गुंठे जमिनीच्या मालकीबाबत गंभीर गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या जमिनीवर अद्याप सातबारा उताऱ्यावर साजिद डायाभाई व अजिज डायाभाई यांचीच नावे आहेत. नुकतीच त्यांच्या वारसांनी वारस नोंदणीसाठी अर्ज दाखल केला असतानाच, त्याची नोंद पूर्ण होण्याआधीच खरेदी-विक्रीचे प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याच प्रकरणाशी संबंधित सूची क्रमांक 2 वरून खरेदीचे डावपेच रचले जात असल्याचे समोर येत असून, सर्वे नंबर 245 ब/2 संदर्भातील सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. यामध्ये प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयाने काही महत्त्वाचे दस्तावेज गायब असल्याचे लेखी मान्य केले असतानाही त्याबाबत कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही. तरीदेखील या संशयित जमिनीच्या खरेदी-विक्रीचे प्रयत्न सुरू असल्याने निबंधक कार्यालयाच्या भूमिकेवर संशय अधिकच गडद झाला आहे. सावेडीतील सर्वे नंबर 245 ब/1 (72 गुंठे) आणि 245 ब/2 (63 गुंठे) या दोन गटांबाबत अद्याप कोणताही प्लॅन मंजूर नाही. तरी 72 गुंठ्याची विक्री करण्याचे प्रयत्न सुरू असून, 63 गुंठ्याची जागा ॲमेनिटी व ओपन स्पेस म्हणून दाखवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. एवढ्या मोठ्या भूखंडाच्या व्यवहारावर सुनावणी सुरू असतानाही विक्रीची घाई का, असा सरळसरळ प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक वेळ काढूनपणा करून संशयास्पद खरेदीखताला वैधतेची छत्रछाया मिळवून देण्याचे डावपेच रचले, अशी चर्चा परिसरात आहे. विशेष म्हणजे 1990 ते 1993 या कालावधीतले महत्त्वाचे दस्तावेज रेकॉर्ड रूममधून गायब झाल्याचेही पुढे येत असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणात निबंधक कार्यालयाचा संशयास्पद कारभार उघड झाला असून, त्यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, हा प्रश्न शेतकरी व नागरिक विचारत आहेत. याबाबत सखोल चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तीव्र स्वरूपात केली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या जमिनीवरील संशयास्पद व्यवहार रोखले नाहीत, तर सावेडीतील भूखंड प्रकरण हा नगर जिल्ह्याचा आणखी एक गाजणारा घोटाळा ठरेल, यात शंका नाही. आणि याचा परिणाम येणाऱ्या कळात अहिल्यानगर मधील इतर जागेंचा विषय गंभीर होणारा आहे.

Sawedi land scam – दस्तावेज गायब, चौकशी सुरूच, तरीही खरेदी विक्रीचे खेळ सुरू; उद्या मुहूर्त Read More »

img 20250913 wa0000

Sawedi Land Scam: सावेडी भूखंड प्रकरणात अखेर वारस दाखल; कासम अजीज यांनी लेख दुरुस्ती संदर्भात शंका अर्ज केला

Sawedi Land Scam : सावेडी परिसरातील भूखंड प्रकरण अनेक दिवसापासून नगर जिल्ह्यात गाजत होता. या प्रकरणात आतापर्यंत एकही वारस समोर आलेला नव्हता. मात्र, या प्रकरणातील जमिनीत अखेर वंशावळ दाखल करत नाव नोंदणीसाठी अर्ज केला आहे, अखेर या प्रकरणात नाही म्हणता म्हणता वारस समोर आल्याने अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात कासम डायाभाई अजीज यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज सादर करून गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या अर्जानुसार, सर्व्हे नं. २४५/ब/१ या जमिनीवरील लेख दुरुस्ती अपर तहसीलदार यांच्याकडे दाखल केला आहे मात्र त्या दस्तावर साक्षीदार म्हणून सही घेण्यात आलेली आहे त्या सही वर त्यांनी शंका उपस्थित करून त्यांची सही बनवत असल्याची शंका व्यक्त केली आहे. कासम यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, त्यांनी कधीही अशा प्रकारची लेख दुरुस्ती केलेली नाही. या संदर्भात प्रशासनात चौकशी सुरु असून, संबंधित दस्तऐवजांवरही विविध आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. शैलाह रफिक आणि शमिरा डायाभाई या सख्ख्या बहिणी असून त्यांचा वडील डायाभाई वेलजी मयत आहेत. डायाभाई यांना चार मुले होती – शैलाह, शमिरा, शाजीद व अजिज. मात्र, शाजीद २०२० तर अजिज २०२५ मयत झालाय. अजिज मयत झाल्यानंतरच या प्रकरणात संशयित खरेदीखत एक महिन्यांनी दाखल करण्यात आले होते यावरही शंका उपस्थित झाली होती, कासम यांना फेरफार क्रमांक १४२०६ प्रमाणे वेगळ्या जमिनीचा (सर्व्हे नं. २४६/अ) वाटप करण्यात आले असून, सर्व्हे नं. २४५/ब/१ या जमिनीशी त्यांचा कोणताही संबंध नाही, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदार शैलाह व शमिरा हे वडील डायाभाई यांचे एकमेव वारस असल्याचे सांगितले आहे. मौजे सावेडी, ता. नगर, जि. अहिल्यानगर येथील सावेडी नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. २४५/ब/१, क्षेत्रफळ ७२.०० हेक्टर आणि आकारफळ १४३.५७ चौ.मी. या मिळकतीवर कातडे, हाडे व साल कारखाना असून अहमदनगर महानगरपालिकेचा लायसन्स क्रमांक – १९७अ आहे. सदर जमिनीवर त्यांच्या नावांची वारस नोंद करण्यात यावी. संबंधित अर्ज दिल्याचे समजते, या प्रकरणांमध्ये यापूर्वी वारस जिवंत नसल्याचे दावे प्रति दावे करण्यात आले होते परंतु आत्ता वारस आल्याने या प्रकरणांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत.

Sawedi Land Scam: सावेडी भूखंड प्रकरणात अखेर वारस दाखल; कासम अजीज यांनी लेख दुरुस्ती संदर्भात शंका अर्ज केला Read More »