दिवस तुझा, वेळही तुझी, पण उत्तर आमचंच…, Imtiaz Jaleel यांचा संजय गायकवाडांना प्रत्युत्तर
Imtiaz Jaleel : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत “मारण्याची भाषा” केली होती. त्यावर आता इम्तियाज जलील यांनी बुलढाणा दौऱ्यात प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाण्यात एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले असताना जलील यांनी संजय गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटलं की, “गरीबांवर हात उचलणं मर्दानगी नसते. पुण्यात एक गँग ऑपरेट करत होते, रात्रीच्या अंधारात चड्डी-बनियान घालून फिरायची, चेहऱ्यावर कपडा, हातात शस्त्र घेऊन लोकांना लुटायची. आता काय झालंय, कपडे राहिले आहेत पण चेहऱ्यावर कपडा नाही. हेच लोक आता विधानसभेत दिवसाढवळ्या गुंडागिरी करतायत.” अशी टीका जलील यांनी केली. जलील पुढे म्हणाले,”जिथे कायदे बनवले जातात, त्या पवित्र सभागृहात आता शिव्या दिल्या जात आहेत. केवळ शिव्या नाही तर आता मारहाणीपर्यंत मजल गेली आहे. एखाद्या गरीबावर हात उचलून तुम्ही समजता की तुम्ही बलवान झालात? तर त्याचं उत्तर मी आधीच दिलं आहे.” “मी बुलढाण्याच्या मातीत उभा राहून मायेबहिणींच्या, बुजुर्गांच्या, नवयुवकांच्या आशीर्वादाने हे सांगतो, सरकारमधील कोणताही नेता आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. जर तुमच्या मनात जराही विचार असेल की इम्तियाज जलीलवर हात उचलता येईल, तर लक्षात ठेवा, उत्तर दिलं जाईल जागा तुझी, दिवस तुझा, वेळही तुझी, तरीसुद्धा उत्तर आमचंच असेल!” असं देखील इम्तियाज जलील म्हणाले. या भाषणातून इम्तियाज जलील यांनी संजय गायकवाड यांना परखड शब्दांत सुनावले असून राजकीय वर्तुळात याची तीव्र चर्चा रंगली आहे.
दिवस तुझा, वेळही तुझी, पण उत्तर आमचंच…, Imtiaz Jaleel यांचा संजय गायकवाडांना प्रत्युत्तर Read More »