DNA मराठी

Saif Ali Khan News

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहे. तर आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित काही नवीन आणि धक्कादायक माहिती शेअर केली आहे. पत्रकार परिषदेत पश्चिम विभागाचे अतिरिक्त सीपी परमजीत सिंह दहिया यांनी सैफ प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, सैफवरील हल्ल्याची तक्रार अभिनेत्याच्या घरून आली नव्हती तर रुग्णालयातून आली होती. पोलिसांना लीलावती रुग्णालयातून कळले की सैफवर हल्ला झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सैफ सुमारे 3 वाजता ऑटोने रुग्णालयात पोहोचला. त्याच वेळी, एसीपी दहिया यांनी असा दावाही केला की सैफ प्रकरणात अटक करण्यात आलेली व्यक्ती ही खरी आरोपी आहे आणि यात कोणताही गोंधळ नाही. त्यांनी सांगितले की पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, जे ते न्यायालयात सादर करतील. सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशहून भारतात आलाएसीपी दहिया यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, आरोपी पश्चिम बंगालमार्गे भारतात दाखल झाला होता. तो काही दिवस कोलकात्यातही राहिला. पोलिसांनी असेही सांगितले की, ज्या महिलेच्या आधार कार्डवरून आरोपीने सिम घेतले होते, तिचा जबाब कोलकातामध्ये नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या फिंगरप्रिंटबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही. हे नमुने पुणे सीआयडीकडे पाठवण्यात आले आहेत. सैफ अली खान प्रकरणात अजूनही अनेक प्रश्नसैफ अली खान हल्ला प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे पोलिसांनी दिलेली नाहीत. घटनेच्या रात्री प्रत्यक्षात काय घडले हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. त्याचवेळी, आरोपी 11 व्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरी चोरी करायला का गेला, तो खालच्या मजल्यावर चोरी करू शकला असता, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. हल्ला रात्री 2 वाजता झाला आणि पोलिसांना रात्री 3 वाजता कळवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी सकाळपर्यंत सैफच्या अपार्टमेंटच्या बागेत लपून का बसला होता?

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा Read More »

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसापूर्वी चाकूने हल्ला करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. तर आता त्या रात्री नेमक काय घडलं होते याबाबत सैफने गुरुवारी त्याच्या घरी पोलिसांना आपला जबाब नोंदवला आहे. सैफवर हल्ला झाला त्या रात्री काय घडले?पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफने आपल्या जबाबात म्हटले आहे की, 16 जानेवारीच्या रात्री तो आणि त्याची पत्नी करीना कपूर 11 व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते. जेव्हा त्याने त्याची नर्स एलियामा फिलिपच्या किंकाळ्या ऐकल्या. सैफ पुढे म्हणाला की जेव्हा त्यांना त्यांच्या नर्स अलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा ते दोघेही जहांगीरच्या रूमकडे धावले, जिथे अलियामा फिलिप देखील झोपली होती. तिथे त्याला एक अनोळखी माणूस दिसला आणि जहांगीरही रडत होता. सैफवर हल्ला कसा झाला?सैफ म्हणाला की त्याने हल्लेखोराला पकडले. यावेळी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी अनेक वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि कसा तरी त्याने स्वतःची सुटका केली. त्यानंतर हल्लेखोराला मागे ढकलण्यात आले. पोलिसांना चाकूचा तिसरा तुकडा सापडला16 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यात वापरलेल्या चाकूचा तिसरा तुकडा जप्त करण्यात आला आहे. “चाकूचा तिसरा तुकडा, ज्यामध्ये हँडल आणि ब्लेडचा काही भाग होता, तो वांद्रे तलावाजवळ सापडला,” असे वांद्रे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या ठिकाणाहून चाकूचा भाग सापडला ते ठिकाण अभिनेत्याच्या सतगुरु शरण बिल्डिंगमधील घरापासून एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. बुधवारी संध्याकाळी आम्ही आरोपीला तलावावर घेऊन गेलो आणि चाकूचा हरवलेला भाग सापडला.”

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा Read More »

Saif Ali Khan वर चाकूने हल्ला, खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; थेट मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न

Saif Ali Khan : जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत,जिथे हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला नको का? अशी टीका काँगेस खासदार वर्षा गायकवाड यांनी अभिनेता सैफ अली खान प्रकरणावरून सरकारवर केली आहे. त्यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो.. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही. कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानानं महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच हाताबाहेर जात चालली आहे. गुन्हेगारांची पाठ थोपटतंय तरी कोण?कोणाचं पाठबळ मिळतंय यांना की, कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. वाढत्या गोळीबाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणं आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणं, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचं राजकारण वाढणं या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. राज्याचे गृहमंत्री करताहेत तरी काय? असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

Saif Ali Khan वर चाकूने हल्ला, खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; थेट मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न Read More »