DNA मराठी

pune crime news

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस

Nilesh Ghaywal : कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या परदेशवारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.घायवळविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला विशिष्ट अटींवर २०२२ मध्ये न्यायालयीन जामीन मंजूर करण्यात आला होता. या अटींमध्ये पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश होते. मात्र न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही हा प्रश्न उपस्तित होतो. तसे झाले असते तर घायवल देशाबहेर जाण्याचा प्रश्न च उद्भवला नसता. परिणामी घायवळ याला २०१९ मध्ये तत्काळ (तत्काळ) योजनेतून मिळवलेला पासपोर्ट वापरून परदेशात जाणे शक्य झाले. तत्काळ योजना आणि पडताळणी तत्काळ योजनेत अर्जदाराला जलद पासपोर्ट मिळतो. या प्रक्रियेत पासपोर्ट आधी दिला जातो आणि नंतर काही दिवसांत पोलिस पडताळणी केली जाते. पडताळणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढे पासपोर्ट एक्ट नुसार पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करता येते. पोलिसांचा पडताळणी अहवाल विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, घायवळने २०१९ मध्ये तत्काळ योजनेतून मिळवलेल्या पासपोर्टसाठी झालेल्या पोलिस पडताळणी (पीव्ही) अहवालात त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच घरावर भेट दिली असता तो “उपलब्द नाही (नॉट अव्हेलेबल)” असल्याची नोंद करण्यात आली होती. वास्तविक पाहता पोलिसांनी गुन्हयाची माहिती अवहालात देणे अपेक्षित होते परंतु तसे झालेले दिसत नाही. यामुळे त्याचा पासपोर्ट कायम ठेवण्यात अडचण आली नाही. पासपोर्टविषयी पुढील कारवाई घायवळने पासपोर्ट अर्ज करताना स्वतःविरुद्ध असलेले गुन्हे लपवून चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करुण 2019 मध्ये पासपोर्ट मिळवला होता. पोलिसांनी आरोपी देशा बाहेर गेल्यानंतर हा प्रकार पासपोर्ट कार्यालयला निदर्शनास आणून दिला. त्या नंतर त्याचा पासपोर्ट जप्तीबाबत कारणे दाखवा नोटीस (एससीएन) जारी करण्यात आली आहे. तसेच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट करण्यात आले आहे.

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस Read More »

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण

Pune Crime News: पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण Read More »

img 20251006 wa0006

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीची वातावरण निर्माण होत आहे. यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे. रविवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे पुण्यातील कायद्याव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला Read More »

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकरण, इंस्टाग्रामवर मैत्री अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 Pune Crime News:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे त्यामुळे महिलांचे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे.  माहितीनुसार, पुण्यातील हिंजवडी परिसरात अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 23 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीचे नाव कार्तिक कांबळे असे असून, त्याच्यावर आयपीसी कलम अ अंतर्गत कलम 376, 376 (2) आणि 506 तसेच POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला इंस्टाग्रामवर भेटले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल ते जून दरम्यान घडली होती. रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुरुवारी आरोपीला अटक केली. आरोपीने पीडितेचा लैंगिक छळही केला सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश कुराडे यांनी एएनआयला सांगितले की, आरोपीने पीडितेवरही लैंगिक अत्याचार केले असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली  पीडित मुलगी तिच्या कुटुंबासोबत आली आणि घटनेची माहिती दिली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आले. त्यानंतर आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत घरच्यांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकरण, इंस्टाग्रामवर मैत्री अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार Read More »

Pune News:  डोक्यावर हातोड्याने वार.. 01 कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने केली पतीची हत्या

Pune News: पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घेटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार 1 कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सच्या लोभापोटी पत्नीने पतीची हत्या केली. महिलेने प्रियकरासह हा गुन्हा केला. आरोपीने पीडितेच्या डोक्यावर हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केली. पिंपरी-चिंचवड शहरात एका महिलेने लष्करात काम करणाऱ्या प्रियकरासह पतीची हत्या केली. ही घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या 1 कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सवर पत्नीचा डोळा होता. दोघेही ते पैसे आपापसात वाटून घेणार होते. राहुल सुदाम गाडेकर (36) असे आरोपी महिलेच्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी राहुलची पत्नी सुप्रिया गाडेकर आणि तिचा प्रियकर सुरेश पाटोळे आणि त्याचा साथीदार रोहिदास सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.  आरोपी सुरेश हा भारतीय लष्करात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत राहुल गाडेकर यांची पत्नी सुप्रिया ही संगमनेर तालुक्यातील निमगाव पंगा येथे गेल्या दोन वर्षांपासून लॅब चालवत होती.  तिथे ती लष्करात कार्यरत असलेल्या सुरेशच्या प्रेमात पडली. हा प्रकार पती राहुलला समजल्यानंतर पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत होती. यानंतर सुप्रियाने प्रियकराच्या मदतीने पतीला मार्गावरून दूर करण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच सुरेश पाटोळे सुट्टीवर घरी आले होते, तेव्हा त्यांनी राहुलला मारण्यासाठी दोन लोखंडी हातोडे खरेदी केले होते. त्याचवेळी राहुल गाडेकर यांनी एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याची माहिती पत्नी सुप्रियाला होती. राहुलच्या मृत्यूनंतर ती सुरेश आणि त्याच्या साथीदाराला काही पैसे देणार होती. राहुल गाडेकर चाकण येथील एका कंपनीत कामावर जात असताना आरोपी सुरेश व रोहिदास यांनी पाठीमागून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला. राहुलचा खून केल्यानंतर आरोपी सुरेश नोकरीवर रुजू झाला. रोहिदास चिंचपूर गावात आपल्या घरी गेला. मात्र तपासादरम्यान पोलिसांना पत्नीवर संशय आला आणि चौकशीत सत्य बाहेर आले. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना आळंदी पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Pune News:  डोक्यावर हातोड्याने वार.. 01 कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने केली पतीची हत्या Read More »

Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक

Pune Prostitution Racket: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत पॉश भागात चालवले जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या राजस्थानी अभिनेत्री आणि दोन परदेशी मॉडेल्सना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुण्यातील विमाननगर भागात ही कारवाई केली. आतापर्यंतच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, ज्यात आलिशान हॉटेल्समध्ये वेश्याव्यवसायाचे काळे साम्राज्य चालवताना अभिनेत्री पोलिसांनी पकडल्या आहेत. नुकतेच पुण्यात एका कारवाईदरम्यान एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. ऑनलाइन ग्राहकांशी संपर्क साधून हा वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. अभिनेत्री आणि रशियन मॉडेल पुण्यात वेश्याव्यवसायासाठी आल्याची खबर पोलिसांना मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विमाननगर परिसरात सापळा रचला. अटक करण्यात आलेली राजस्थानी अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे फोटो आणि बोल्ड व्हिडिओंमुळे चर्चेत असते. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. राजस्थानी अभिनेत्रीसह अन्य दोन रशियन मॉडेलनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट टोळीचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. ऑनलाइन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.  आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधीही अनेकवेळा हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता.  पोलिसांनी ताथवडे येथील एका लॉजवर छापा टाकून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक केली. तर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकलेल्या एका अभिनेत्रीसह अन्य दोन मुलींची सुटका करण्यात आली.

Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक Read More »