DNA मराठी

Prajakta Tanpure

Prajakta Tanpure : निवडणूक भयमुक्त होऊ द्या, अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू…, तनपुरेंचा इशारा

Prajakta Tanpure : माझ्या विरोधी उमेदवारच्या गावात बुर्‍हाणनगर येथे आज आलो. देवीच्या मंदिरात नम्रपणे माथे टेकवून नतमस्तक झालो. परंतु राहुरी येथे माझ्या गावात शनी मंदिरासमोर ज्युनियर कर्डिले यांनी काय अविर्भाव केले. हे सगळ्यांनी पाहिले. मी देवासमोर नतमस्तक होतो, ते दंड-मांड्या ठोकतात. हाच आमच्यातील फरक आहे. असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. नगर तालुक्यात आमदार तनपुरे यांनी दरेवाडी, सैनिक नगर, बाराबाभळी, आलमगीर, वारूळवाडी, कापूरवाडी, गजराज नगर, बुऱ्हाणनगर, वडारवाडी नागरदेवळे येथे झंझावाती प्रचार दौरा केला. यावेळी बुऱ्हाणनगर येथे तनपुरे बोलत होते. अभिषेक भगत, अमोल जाधव, गोविंद मोकाटे, रामेश्वर निमसे, झोडगे, राहुल ढोरे, उद्धव दुसिंगे, विलास काळे, रामदास ससे, अजय गुंड, कुणाल भगत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार तनपुरे म्हणाले की, “बुऱ्हाणनगर येथे ग्रामस्थ श्वास कोंडल्यासारखे राहतात. कुणालाही मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्याला अपवाद अभिषेक भगत, अमोल जाधव आहेत. मतदार संघाचा आमदार असताना येथील ग्रामस्थ माझ्याकडे यायला घाबरतात. येत्या दहा दिवसात सर्व ग्रामस्थांवरील दबाव संपवण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. बुर्‍हाणनगर गावाला पिण्याचे पाणी देण्याचे ज्यांचे काम आहे. तेच आपल्या शेतातील विहिरीत पाणी योजनेची जलवाहिनी फोडून शुद्ध पाणी वापरत होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गावाच्या वाट्याचे पाणी स्वतःसाठी वापरणारे असे कसे नेतृत्व आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून मुळा धरणातून बुऱ्हाणनगर पाणी योजनेत आपण काही बदल केले आहेत. योजनेतील घाटाखालील राहुरी व नगर तालुक्यातील खडांबे, धामोरी, देहरे, विळद गावांसाठी वेगळी योजना केली आहे. घाटावरील ग्रामीण भागातील गावांसाठी स्वतंत्र जलवाहिनी व बुर्‍हाणनगर, नागरदेवळे साठी स्वतंत्र जलवाहिनी केली आहे. भविष्यात बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेतील सर्व गावांना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमदार म्हणून पाच वर्षे काम करताना मतदार संघातील सर्व गावांना मूलभूत सोई-सुविधा कशा मिळतील. यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या भागातही अनेक ठिकाणी रोहित्र दिले. पाच वर्षात फक्त विकास कामांवर फोकस केला. कोणत्याही विरोधकाला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा कधीही विचार केला नाही. परंतु काही चांडाळ चौकडींना इशारा देतो. निवडणूक लोकशाही मार्गाने होऊ द्या. निवडणुकीचे दहा दिवस निघून जातील. निवडणूक भयमुक्त होऊ द्या. अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू. भविष्यात तुमचे नेते आमच्या पक्षात येतील, त्यावेळी तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.” महाविकास आघाडीचे सरकार असताना कर्डिले वारंवार राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांना भेटून मला तुमच्या पक्षात घ्या. अशी विनंती करायचे. त्यांनी एकदा शरद पवार यांना असे सांगितले की, मला विधान परिषदेचे तिकीट द्या. प्राजक्त तनपुरे यांना विधानसभेला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो. त्यावर, त्यांनी तुम्हाला पाडले, तुम्ही काय जबाबदारी घेणार? असे शरद पवार म्हणाले.” असागौप्यस्फोट आमदार तनपुरे यांनी केला. राहुरी व पाथर्डी तालुक्यासह नगर तालुक्यातही तुतारी चिन्ह जोमात आहे. कर्डिलेंना पराभव दिसू लागला आहे. कितीही आवाज दाबला तरी तुतारी वाजणारच आहे. आपला विजय निश्चित आहे. राज्यातही महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.” असेही तनपुरे यांनी सांगितले.

Prajakta Tanpure : निवडणूक भयमुक्त होऊ द्या, अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू…, तनपुरेंचा इशारा Read More »

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा जागेवर अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का याबाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक तनपुरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.  अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील असा आम्हाला आशा आहे असा विश्वास यावेळी आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. निलेश लंके देखील लवकरच शरद पवार गटात येतं लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नसून मी स्वतः लोकसभा लढवणार नाही मी विधानसभा लढवणार आहे असं तनपुरे यांनी स्पष्ट केलं तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, लंके यांनी घेतलेल्या महानाट्य मोठा जनप्रतिसाद मिळाला.  तसेच येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक हातातली घड्याळ काढून तुतारी फंकण्यास सज्ज राहतील अशी आशा आम्हाला आहे.  लंकेचा पक्षप्रवेश होणार काय यावरती बोलताना ते म्हणाले की लंके का येणार नाही असे म्हणतच एक प्रकारे लंकेंचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असं असं सुचक विधान यावेळी तनपुरे यांनी केलं.  महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेसाठी अगदी तोला मोलाचा उमेदवार दिला जाईल  याबाबत कुठलेही शंका नाही असं देखील यावेळी बोलताना प्राजक्ता तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं Read More »

Prajakta Tanpure

Prajakta Tanpure : ‘हा’ तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार… तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल

Prajakta Tanpure – गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारकडून 40 हुन अधिक गावांचा समावेश दुष्काळजणीमध्ये करण्यात आला. मात्र नगरच्या गावांचा सुरुवातील यामध्ये समावेश नव्हता.  दुष्काळाची परिस्थिती असताना नगरचे पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात आले. दुष्काळजन्य सदृश्य परिस्थिती निकष तसेच लाभ आपण पहिले तर कोणताही फायदा महसुली मंडळांना होणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पहिले तर शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. हे फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणायचा प्रकार आहे, अशा शब्दात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, कृषी पंपांना वीजबिलात सूट दिली मात्र खरी गरज पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये महत्वाचा आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहे याच्या वीजबिलात सूट देणे गरजेचे आहे. यांचे कनेक्शन बंद केले जाऊ नये मात्र महावितरण कडून यांचा वीजपुरवठा खंडित केला जातो आहे. यामुळे  दुष्काळजन्य परिस्थिती पाहता यावर काहीतरी ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यावेळी तनपुरे यांनी केली. पिकविम्याबाबत अनेक मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. मात्र खूप कमी लोकांना याचा फायदा मिळाला आहे, अशी खंत यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केली. अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे. केवळ सरकारकडून घोषणा केल्या जात असून वास्तविक पाहता शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही, असे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. दुष्काळसदृष्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल असे धोरण सरकारने राबवावे,  पीकविम्याची अग्रीम रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळावी अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली. दूधदराबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, आमच्या जिल्ह्यात दूध उत्पादक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र दुधाचे दर काही दिवसांपूर्वी 35 ते 40 रुपयांवर गेलेले दुधाचे दर आता 20 ते 25 रुपयांवर आले आहे. महाविकास आघाडीने दूध खरेदी करून दुधाचे दर नियंत्रित ठेवले होते. मात्र या सरकारच्या काळात दुधाचे दर पडलेले  आहे मात्र ग्राहक खरेदी करत असलेले दुधाचे  दर काही कमी झाले नाही आहे.  यामुळे सरकारनं दुधाच्या दरबाबाबत काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

Prajakta Tanpure : ‘हा’ तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार… तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल Read More »