DNA मराठी

PM Modi

Manoj Jarange Patil

जनगणना करण्याची काही गरज नव्हती मात्र…, जरांगे पाटील सरकारवर भडकले

Manoj Jarange Patil: केंद्र सरकारने आज संपूर्ण देशभरात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती, मात्र केंद्र सरकारने हा जर निर्णय घेतला असेल तर घेऊ द्या, कारण इंग्रजी जनगणना केली होती त्या नंतर जनगणना झाली नाहीच. या जनगणनेमुळे आमच्या समाजाला न्याय मिळेल, ओबीसीने जातीचे आरक्षण खाल्ले होते ते आता उघडे पडले आहे. कोणी किती खाल्ले ते समजेल. जनगणना करणे आवश्यक नाही, सरकारने बार्टी आयोगाचा शिफारसी जरी मंजूर केल्या, तरी भागते सरकारची इच्छा असेल तर नक्की करा. आमचा काही विरोध करण्याची गरज नाही, मात्र यात निष्पक्ष अधिकारी असले पाहिजे. बळजबरी नोंदी करणारे नसावे जाती वादी अधिकारी नसावे. जनगणना करतान कोणते ही जाती भेध करता कामा नाही, व आता आरक्षणाच कोठा सरकारने वाढवला पाहिजे. आयोग निवडतानी चांगले अधिकारी निवडा. असा सरकारला सल्ला देत केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी करत होतो.

जनगणना करण्याची काही गरज नव्हती मात्र…, जरांगे पाटील सरकारवर भडकले Read More »

Sanjay Raut

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप

Sanjay Raut on PM Modi: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी आडवाणी यांची तुलना मुघल सम्राट शहाजहान यांच्याशी केली असून, त्यांना जिवंत असताना सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप केला. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले – राऊतांचा आरोपसंजय राऊत म्हणाले, “लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना त्यांना शहाजहानाप्रमाणे कोंडून ठेवण्यात आले आणि नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले. मुघली संस्कृतीप्रमाणे त्यांना सत्तेपासून बेदखल करण्यात आले. तेव्हा आम्ही विचारले होते की, मुघली संस्कृतीप्रमाणे का वागले? आडवाणी यांचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदावर हक्क होता. तो त्यांना का दिला नाही?” राऊत यांनी हा सवाल उपस्थित करत भाजपच्या अंतर्गत धोरणांवर टीका केली. मोदींची निवृत्ती आणि फडणवीसांचे मतराऊत यांनी पुढे नरेंद्र मोदी यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “17 सप्टेंबर 2025 रोजी नरेंद्र मोदी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कितीही वाटत असले तरी त्यांना निवृत्त व्हावे लागेल.” राऊत यांचे हे वक्तव्य फडणवीस यांच्या त्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे, ज्यात त्यांनी मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील, असे म्हटले होते. राऊत यांनी यावरून भाजपच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचा दावा केला. भाजप-संघ संबंधांवर मौनभाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यातील संबंधांबाबत राऊत यांनी भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले, “भाजप आणि संघ यांच्यातील संबंध कसे असावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाने बोलण्याची गरज नाही.” राऊत यांनी यावर तटस्थ भूमिका घेतली असली तरी त्यांच्या इतर वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा तापली आहे. राजकीय वादाला तोंडराऊत यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा भाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होण्याची शक्यता आहे. आडवाणी यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा मुद्दा आणि मोदी यांच्या निवृत्तीचा प्रश्न यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, या विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झाले आहे.

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप Read More »

Earthquake

Delhi NCR Earthquake: राजधानी दिल्ली हादरली, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट

Delhi NCR Earthquake: सोमवारी सकाळी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. भूकंप इतका तीव्र होता की अनेक लोक भूकंपाच्या धक्क्याने जागे झाले. काही सेकंद पृथ्वी हादरत राहिली. लोक घाबरून घराबाहेर पडले. 4.0 रिश्टर स्केलच्या भूकंपाने दिल्ली-एनसीआर हादरले भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी होती आणि त्याचे केंद्र दिल्लीजवळ होते, त्यामुळे भूकंपाचे धक्के अधिक तीव्रतेने जाणवले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भूकंपांसोबतच एक विचित्र आवाजही ऐकू आला, जणू काही काहीतरी तुटत आहे, ज्यामुळे त्यांच्यातील भीती आणखी वाढली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, सोमवारी पहाटे 5.36 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 होती आणि त्याचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 5 किलोमीटर खोलीवर होता. आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान झालेले नसले तरी, भूकंपामुळे लोक घाबरले आहेत. दिल्ली, नोएडा, गुडगाव, गाझियाबाद, फरीदाबाद येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Delhi NCR Earthquake: राजधानी दिल्ली हादरली, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट Read More »

Modi

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. भारतीय नौसेनेच्या माहितीनुसार या तीन अद्यावत युद्धनौकांमध्ये, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्ध लोकांचा समावेश आहे. या तीन युद्धनौका म्हणजे आपल्या देशाची सागरी सुरक्षेतील एक महत्त्वाची झेप असल्याचे भारतीय नौदलाचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, INS निलगिरी हे 17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे. वाढीव क्षमता, समुद्रात जास्त काळ राहणे आणि स्टेल्थ यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह ते नौदलात सामील करण्यात आले आहे. हे देशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते. INS सूरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचे चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे, ती अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे. INS वाघशिर ही P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. INS वाघशिर पाणबुडी बांधणीत भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. हे फ्रेंच नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. देशाला देणार भक्कम सुरक्षा कवच आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या भारतीय नौदलाच्या अतिशय अद्ययावत युद्धनौका आहेत. देशाला हवाई सुरक्षा देण्यास त्या सक्षम असून शत्रूने धाडलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस वाघशीर ही अद्ययावत पाणबुडी देशाच्या मारक क्षमतेत भर टाकणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा या पाणबुडीवरून करता येणार आहे. याच श्रेणीतील आयएनएस अरिघात ही पाणबुडी गेल्यावर्षी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्या दरम्यान, नवी मुंबईतील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांच्या देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे त्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार आहे.यात आमदारांचे रिपोर्टकार्ड,मतदार संघातील आढावा त्यासोबत काही प्रश्न देखील पंतप्रधान आमदरांना विचारणार असून त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे.असल्याची माहिती मिळतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक घेतली होती.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण Read More »

Modi

PM Modi: ‘प्रत्येकजण चुका करतो, मी देव नाही…’; पंतप्रधान मोदींनी सर्वकाही सागितलं

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर निखिल कामथ यांच्या ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ या पॉडकास्ट शोमध्ये येणार आहे. निखिल कामथ यांनी प्रदर्शित केलेल्या ट्रेलरमधून ही माहिती मिळाली. यापूर्वी, झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी एका गेस्टसशी हिंदीमध्ये संवाद साधतानाची एक क्लिप शेअर केली होती, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली होती. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर असे अनुमान लावले जात होते की ते पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून पंतप्रधान मोदी होते. पॉडकास्टचा दोन मिनिटांचा ट्रेलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रिलीज करण्यात आला.आता निखिल कामथने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या भागाचा दोन मिनिटांचा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरचे शीर्षक “पीपल विथ पीएम नरेंद्र मोदी | एपिसोड 6 ट्रेलर” आहे. या ट्रेलरमध्ये पंतप्रधान मोदी आणि निखिल कामथ यांच्यातील एक मनोरंजक संभाषण दाखवण्यात आले आहे. “मी इथे तुमच्या समोर बसून बोलत आहे, मी घाबरत आहे. हे माझ्यासाठी कठीण संभाषण आहे,” कामथ व्हिडिओमध्ये म्हणतात. यावर पंतप्रधान मोदी हसत हसत उत्तर देतात, “हा माझा पहिला पॉडकास्ट आहे, तुमच्या प्रेक्षकांना तो कसा आवडेल हे मला माहित नाही.” पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये काय लिहिले?ट्रेलर पोस्ट करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, “मला आशा आहे की तुम्हालाही ते बनवण्यात आम्हाला जितका आनंद झाला तितकाच आनंद तुम्हालाही मिळाला असेल!” ट्रेलरमध्ये, कामथ पॉडकास्टचा उद्देश स्पष्ट करतात, जो राजकारण आणि उद्योजकता यांच्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी पंतप्रधान मोदींना जगातील सध्याच्या परिस्थितीबद्दल, विशेषतः युद्धांबद्दल प्रश्न विचारले.

PM Modi: ‘प्रत्येकजण चुका करतो, मी देव नाही…’; पंतप्रधान मोदींनी सर्वकाही सागितलं Read More »

Sanjay Raut

Sanjay Raut On PM Modi : ‘आम्ही आमचा रिमोट कंट्रोल दिला नाही, म्हणून…’ PM मोदींना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut On PM Modi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या शेवटच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर आता या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (ठाकरे गट) यांनी प्रत्युत्तर दिला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की,महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विश्वास नाही. ही महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात आम्ही तिघे एकत्र आहोत आणि तुमच्यापेक्षा सुरक्षित आहोत. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या टिप्पणीवर त्यांनी पलटवार केला आणि रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे जनता ठरवेल असे म्हटले. मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले होते की, महाविकास आघाडीच्या एका पक्षाने आपला रिमोट कंट्रोल काँग्रेसकडे सोपवला आहे. त्याचा संदर्भ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे होता. त्यावर संजय राऊत म्हणाले की, शिवसेना फोडून तुम्ही जो वेगळा गट स्थापन केला आहे, त्याचे नियंत्रण तुमच्या हातात असेल, मात्र आम्ही आमचा रिमोट कंट्रोल भाजपकडे सोपवला नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदी संतापले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीतसंजय राऊत म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आहे, मी यापूर्वीही म्हटले आहे की 23 नोव्हेंबरनंतर कोणतीही महाआघाडी होणार नाही कारण मुख्यमंत्री नसतील. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार नाही. त्यांना विरोधी पक्षनेतेपदही दिले जाणार नाही, कारण भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत केले आहे. राऊत म्हणाले, निवडणुकीनंतर आम्ही सरकार स्थापन करत आहोत. महायुतीला बहुमत मिळणार नाही. काय म्हणाले पीएम मोदी?गुरुवारी जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मुंबई हे स्वाभिमानी शहर आहे, मात्र महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या एका पक्षाने आपला रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्यांच्या हाती दिला आहे. मोदी म्हणाले, म्हणून मी त्यांना आव्हान दिले की, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे गुणगान काँग्रेसला करावे. आजपर्यंत या लोकांना बाळासाहेबांची स्तुती करायला काँग्रेस आणि त्यांचे राजपुत्र जमले नाही. काँग्रेस सत्तेसाठी हतबल असून हा पक्ष पाण्याविना माशासारखा आहे, असे ते म्हणाले.

Sanjay Raut On PM Modi : ‘आम्ही आमचा रिमोट कंट्रोल दिला नाही, म्हणून…’ PM मोदींना संजय राऊतांचे प्रत्युत्तर Read More »

Modi

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही

PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीतर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये   370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही Read More »

Narendra Modi

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. या सभेत बोलताना त्यांनी वीर सावरकर यांना काँग्रेसचे युवराज संपूर्ण देशात फिरून शिव्या देतात मात्र सावरकर यांचा वारसा जपण्याचा दावा करणारे आज काँग्रेससोबत आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आमची सरकार आली तर राज्यातील शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा देखील मोदींनी नाशिकमधून केली. तर राज्यातील अनेक विकास कामे थांबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आणा असा आवाहन देखील त्यांनी केला. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जर राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली तर राज्यात सुरु असणारी लाडकी बहिण योजना बंद होणार असा दावा देखील त्यांनी केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा Read More »

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : राज्यात विधानसभेसाठी रणधुमाळी सुरु असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत आहे. या सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असे वक्तव्य केले आहे. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पुढे होता मात्र मालेगाव आणि धुळेमधील व्होट जिहादमुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल Read More »

Parliament

Parliament Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात, ‘या’ मुद्यावर विरोधक सरकारला देणार आव्हान

Parliament Winter Session 2024 : संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 20 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. रिजिजू म्हणाले की, संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एक विशेष सोहळा आयोजित केला जाईल, जो संविधान दिन म्हणून साजरा केला जाईल. रिजिजू म्हणाले, माननीय राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत हिवाळी अधिवेशन, 2024 साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त समितीने शेवटच्या अधिवेशनात दिलेल्या मुदतीवर टिकून राहिल्यास 29 नोव्हेंबर रोजी संसदेत अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकावर लक्षसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांचे लक्ष वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकाकडे लागले आहे. या दोन मुद्द्यांवरून संसदेत बराच गदारोळ होण्याची शक्यता आहे. वन नेशन-वन इलेक्शनच्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडले जाईल. विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत आणि देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने नाहीत. अशा स्थितीत हे विधेयक मंजूर करणं सरकारसाठी कठीण होणार आहे. वक्फ विधेयकावरही गदारोळ होण्याची शक्यतायाशिवाय वक्फ विधेयक 2024 वर सुरू असलेला गतिरोध देखील संसदेच्या अधिवेशनात मुद्दा बनू शकतो. खरे तर वक्फ विधेयकावर गठित जेपीसी आपला अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडू शकते. यावरून विरोधी पक्ष सरकारला विरोध करत आहेत. जेपीसीच्या बैठकीत वक्फ विधेयकाबाबत अनेकदा गदारोळ झाला आहे.

Parliament Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात, ‘या’ मुद्यावर विरोधक सरकारला देणार आव्हान Read More »