DNA मराठी

Municipal Council

mahayuti

Maharashtra Election: नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 207 जागांवर मारली बाजी

Maharashtra Election 2025 : राज्यातील 288 नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांनी शानदार कामगिरी केली आहे. भाजपने सर्वात जास्त 120 पेक्षा जास्त जागा जिंकले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 44 जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँगेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. कोणाला किती जागा मिळाल्या? महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (EIC) रविवारी रात्री उशिरा निवडणुकीच्या निकालांचे अंतिम आकडे शेअर केले. आकडेवारीनुसार, भाजप 117 जागा जिंकून सर्वात मोठा विजयी ठरला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 53 जागांसह आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 37 जागांसह स्थान मिळवले. महायुती आघाडीमध्ये काँग्रेसने 28 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7 जागा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या. इतर नोंदणीकृत पक्षांनी 4 जागा जिंकल्या, मान्यता नसलेल्या नोंदणीकृत पक्षांनी 28 जागा जिंकल्या आणि अपक्ष उमेदवारांनी 5 जागा जिंकल्या. महाराष्ट्रातील 288 नगरपरिषदा आणि नगरपरिषदेच्या जागांसाठी 2 आणि 20 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. इतर दोन नगरपरिषदांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निकालांवरून राज्यात महायुती आघाडीची स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट होते. विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगावर आरोप दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांनी निवडणूक आयोगावर महायुती आघाडीला विजय मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. प्रदेश काँग्रेस प्रमुख हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप मित्रपक्षांना इशारा देत म्हटले आहे की, “भाजपचे यश एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी धोक्याची घंटा आहे. भाजप या दोन्ही मित्रपक्षांना 100% बाहेर काढेल” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Maharashtra Election: नगरपरिषद अन् नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; 207 जागांवर मारली बाजी Read More »

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडला आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याआधी निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात बोलताना सपकाळ म्हणाले की, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणावर धांदल झाली. प्रशासकीय धांदल आणि मतांची धांदल देखील या निवडणुकीत दिसली. निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करत आहे की आयोग सरकारच्या हातचा बाहुला आहे असा प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोग ही कटपुतली आहे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे असं सपकाळ म्हणाले. तर040 तास आधी मतदान पुढ ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाचे वाभाळे निघाले आहेत. निवडणूक आयोग कमी पडल आहे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली आहे सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पैसा फेक तमाशा देख असं भाजप करत आहे. राज्यभरात 25 हजार तक्रारी आल्या असाव्यात. आज सगळी पायमल्ली झाली आहे.आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला आहे असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र Read More »

Election

Maharashtra Election: नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

Maharashtra Election : जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश जारी केले असून, या नेमणुका शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार केल्या आहेत. निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान शासकीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणार आहेत. जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश सावंत (तहसीलदार, कोपरगाव) व सुहास जगताप (मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद) यांची नेमणूक करण्यात आली आहे. संगमनेर नगरपरिषदेकरिता अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर) व श्रीमती धनश्री पवार (मुख्याधिकारी, अकोले नगरपंचायत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील (उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर) असतील, तर सहायक अधिकारी म्हणून मिलींदकुमार वाघ (तहसीलदार, श्रीरामपूर) व मच्छिंद्र घोलप (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद) कार्यभार सांभाळतील. जामखेड नगरपरिषदेकरिता नितिन पाटील (उपविभागीय अधिकारी, कर्जत-जामखेड) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद) व मच्छिंद्र पाडळे (नायब तहसीलदार, जामखेड) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेवगाव नगरपरिषदेकरिता प्रसाद मते (उपविभागीय अधिकारी, पाथर्डी-शेवगाव) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून आकाश दहाडदे (तहसीलदार, शेवगाव) व श्रीमती विजया घाडगे (मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद) यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, पाथर्डी नगरपरिषदेकरिता सुभाष दळवी (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून उध्दव नाईक (तहसीलदार पाथर्डी) व दिग्विजय पाटील (नायब तहसीलदार, पाथर्डी) कार्यभार पाहतील. राहाता नगरपरिषदेकरिता मनिषा राशीनकर (उपजिल्हाधिकारी) यांच्यासह सहायक अधिकारी अमोल मोरे (तहसीलदार, राहाता) व वैभव लोंढे (मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद) असतील. राहुरी नगरपरिषदेकरिता अनुपसिंह यादव (उपजिल्हाधिकारी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी नामदेव पाटील (तहसीलदार, राहुरी) व सोपान बाचकर (नायब तहसीलदार,राहुरी) नेमले गेले आहेत. देवळाली प्रवरा नगरपरिषदेकरिता श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून ऋषिकेश पाटील (मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगरपरिषद) व डी.पी. शेकटकर (नायब तहसीलदार श्रीरामपूर) असतील. नेवासा नगरपंचायतीकरिता सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर- नेवासा) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी संजय बिरादार (तहसीलदार, नेवासा) व निखिल फराटे (मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत) असतील. शिर्डी नगरपरिषदेकरिता माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी, शिर्डी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील; सहायक अधिकारी म्हणून सतिश दिघे (मुख्याधिकारी, शिर्डी नगरपरिषद) व बी.बी. मुळे (नायब तहसीलदार राहाता) यांची नियुक्ती झाली आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेकरिता श्रीकुमार चिंचकर (उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी म्हणून सचिन डोंगरे (तहसीलदार श्रीगोंदा) व पुष्पगंधा भगत (मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद) कार्यभार पार पाडतील. सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

Maharashtra Election: नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त Read More »