DNA मराठी

Municipal corporation election

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal: राहुल नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

Harshwardhan Sapkal: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवले असून या पत्रात सपकाळ म्हणाले की, मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना राहुल नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणा-या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले तसेच अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, अशा प्रकारे एका महत्वाच्या व संवैधानिक पदावरील व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. सपकाळ पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भिड वातावरणात पार पाडणे हे आपल्या आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर हरप्रकारे दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले हे अत्यंत गंभीर आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडून अशापद्धतीने कायदा धाब्यावर बसून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, आणि निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा मजबूत आहे हे आपण दाखवून द्यावे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: राहुल नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा Read More »

election

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी निवडणुका जाहीर; 15 मतदान अन् 16 जानेवारीला निकाल

Maharashtra Election : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून आचारसाहित लागू करण्यात आली असून महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 30 डिसेंबर असून उमेदवारी अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत 2 जानेवारी 2026 असणार आहे. तर उमेदवारांना 3 जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून राज्यातील 29 महापालिकांचे निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. असा आहे निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात – 23 डिसेंबर 2025 उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत – 30 डिसेंबर 2025 उमेदवारी अर्जांची छाननी – 31 डिसेंबर 2025 उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत – 2 जानेवारी 2026 उमेदवारांना चिन्ह वाटप – 3 जानेवारी 2026 मतदान – 15 जानेवारी 2026 मतमोजणी – 16 जानेवारी 2026

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी निवडणुका जाहीर; 15 मतदान अन् 16 जानेवारीला निकाल Read More »

maharashtra election comission

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी आज जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम; निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद

Maharashtra Election : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी आज कार्यक्रम जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोग आज 4 वाजता पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकांची घोषणा करणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे मुंबईत आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. तर दुसरीकडे आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात महानगर पालिकांसाठी आचारसाहित लागू होणार आहे. तसेच या पत्रकार परिषदेत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीदरम्यान आरक्षणावरून झालेल्या घोटाळ्यावर देखील राज्य निवडणूक आयोग स्पष्टीकरण देऊ शकतो. राज्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती तर काही नगरपरिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पेक्षा जास्त गेल्याने राज्य निवडणूक आयोगाने 24 नगरपरिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. तसेच 21 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी आज जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम; निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद Read More »