DNA मराठी

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदी, खासदार डॉ. सुजय विखे घेणार अमित शाह यांची भेट!

MP Sujay Vikhe : खासदार डॉ. सुजय विखे पाटील  यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. या प्रकरणात ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत जानेवारी महिन्यात दिल्ली येथे अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. ते उदरमल ता. नगर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.  कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठीची चर्चा अमित शाह यांच्या सोबत करणार असून यातून कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार  असं देखील ते म्हणाले. तसेच कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, राजेंद्र तोरडमल, देविदास आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सदरील भेट घेतली जाणार असून निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल असे देखील खासदार सुजय विखेंनी बोलताना स्पष्ट केले.

MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदी, खासदार डॉ. सुजय विखे घेणार अमित शाह यांची भेट! Read More »

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान! म्हणाले,ओबीसी समाज……

Maratha Reservation: राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकारण तापले आहे.  यातच मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा लढा तीव्र केला आहे. आणि सरकारला दिलेली डेडलाईन बदलली जाणार नाही अशी देखील भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे.   या वर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, चर्चेनेच विषय मार्गे लागणार आहे. तसेच मराठा समाजाने देखील संयम दाखवला आहे. त्याचबरोबर सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे.  त्यामुळे कोणत्याही निकषापर्यंत येण्याऐवजी आणखी काही कालावधी आहे. ओबीसी समाज असो अथवा मराठा समाज या दोन्हीही समाजाच्या भावना लक्षात घेत दोन्ही समाजाचे हित जोपासण्याचा काम राज्य सरकारकडून केलं जाईल अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे यांनी दिली. सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र डेडलाईन जवळ आली असता देखील कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे जरांगे यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे.  जरांगे पुन्हा आक्रमक मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्यावतीने सरकारला दिलेली डेडलाईन दोन दिवसांवर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबर असून, त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम असल्याचे दिसून येत आहे.  दरम्यान पुन्हा एकदा जरांगेंनी आज माध्यमांशी बोलताना देखील दिलेल्या तारखेनंतर आमचं आंदोलन शांततेत होणार आणि आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवूनच चर्चा करणार, असं म्हटलं आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान! म्हणाले,ओबीसी समाज…… Read More »