DNA मराठी

MiM

jaykumar gore on praniti shinde

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार?

Jaykumar Gore on Praniti Shinde : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल ‘बालाजी सरोवर’ येथे खासदार प्रणिती शिंदेंबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रणिती शिंदें यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिले होते. त्या पत्राच्या शेवटी हिंदीतून “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं, पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा शेलक्या आणि आक्षेपार्ह शब्दांत प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार” असा नारा दिला. यानंतर त्यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या भावनिक पत्रावर वादग्रस्त टिप्पणी केली. “दो कदम पीछे नहीं हटे… 50 कदम नीचे गिरे हैं, वो भी टांग ऊपर” अशा वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून विरोधी पक्ष म्हणून एमआयएम भूमिका बजावणार आहे.

Jaykumar Gore on Praniti Shinde : प्रणिती शिंदेंवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका; राजकीय वाद पेटणार? Read More »

asaduddin owaisi

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले

Asaduddin Owaisi : अहिल्यानगर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना नगरचा महापौर आम्ही ठरावावर असा दावा एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केल्याने शहरातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त आणि जर त्यांनी पैसे वाटले तर पैसे घ्या आणि त्या पैशातून त्यांच्याच नावाने शौचालय बांधा असा टोला देखील लावला आहे. बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या. तिथे महिलांनी एकत्र येऊन एमआयएमला मतदान केलं. पुरुषांनी मतदान दिलं नाही तरी त्यांच्या घरातील महिलाच एमआयएमला मत देणार. एमआयएमला इथवर पोहोचवण्यात महिलांचा वाटा सर्वात मोठा आहे असं देखील या सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले. महापौर नगरचा MIM च ठरवेल जर तुम्ही आमचे सहा उमेदवार जिंकून दिले तर आम्ही नगरचा महापौर ठरवणार असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच या निवडणुकीत मला पूर्ण विश्वास आहे हे जालीम हरतील. घरातील महिलांनी आम्हाला लढायला शिकवलं,असं सांगत त्यांनी मतदारांना निर्भय मतदानाचं आवाहन केलं. विरोधक पैशाच्या जोरावर लढत आहेत पैसे न पाहता विकास पाहा. 15 तारखेला न घाबरता मतदान करा असा स्पष्ट संदेश दिला.

Asaduddin Owaisi: MIM ठरवणार नगरचा महापौर; असदुद्दीन ओवैसी विरोधकांवर भडकले Read More »

imtiaz jaleel

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा

BJP MIM Alliance: राज्यातील राजकारणात चर्चेत आलेल्या अकोट नगरपालिकेत आज मोठी राजकीय घडामोडी घडल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष अकोटकडे लागले आहे. अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने शहरातील विकासासाठी अकोट विकास आघाडीची स्थापना करत भाजपने एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह युती केली आहे. भाजपने थेट एमआयएमशी युती केल्याने विरोधक भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर युती झाली असून स्थानिक पातळीवर ज्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक इम्तियाज जलील यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपसोबत युती मान्य नसून युती तोडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना अकोटमध्ये भाजपशी युती होणार नाही. युती तोडण्याचे आदेश दिले आहे. असं इम्तियाज जलील म्हणाले. तसेच जाती जातीत भांडण लावणे तेढ निर्माण करणे हे भाजपचे काम आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असेही यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

BJP MIM Alliance : अकोटमध्ये भाजपशी युती तोडण्याचे आदेश; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र

Maharashtra Politics : एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 29 महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे नुकतंच अकोट पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. अकोट येथे नुकतंच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकले होते मात्र बहुमतपासून पक्ष दूर होता. तर आता अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पुढाकाराने एक आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीमध्ये एमआयएमला देखील स्थान देण्यात आल्याने विरोधकांकडून आता भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने या आघाडीत एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्थान दिले आहे. तर वंचित आणि काँग्रेसला या आघाडीपासून दूर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता या आघाडीवर एमआयएम आणि भाजपच्या वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोट नगरपालिका एकूण जागा : 35 निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार) पक्षीय बलाबल : भाजप : 11 काँग्रेस : 6 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 वंचित : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3 एमआयएम : 5 भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या ‘अकोट विकास मंचा’चे पक्षीय बलाबल : भाजप : 11 एमआयएम : 5 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र Read More »

asaduddin owais

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का

Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून पुन्हा एकदा एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहे. या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपने शानदार कामगिरी करत काँग्रेस आणि आरजेडीला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सीमांचलमध्ये ओवैसी फॅक्टर पुन्हा एकदा दिसून आला आहे. 2020 मध्ये सीमांचलमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने 5 जागांवर बाजी मारली होती. तर आता या निवडणुकीत पुन्हा एकदा एमआयएमने 5 जागा जिंकले असून एका जागेवर सध्या आघाडी घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एमआयएमकडून आरजेडीकडे 6 जागांची मागणी करण्यात आली होती मात्र आरजेडी एमआयएमला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर एमआयएमकडून 24 जागांवर उमेदवार देण्यात आले होते तर या 24 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या निवडणुकी 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाला काही खास करता आले नाही. काँग्रेस ताज्या अपडेटनुसार 5 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे फक्त सीमांचलमधेच नाहीतर संपूर्ण बिहारमध्ये आरजेडीला मोठा फटका बसला आहे.

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले

Asaduddin Owais: अहिल्यानगर शहरात एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेपूर्वी पोलिसांनी खासदार ओवैसी यांना सभेसाठी काही अटी आणि शर्ती घातल्याने सभेत बोलताना ओवैसी यांनी फक्त मलाच लव्ह लेटर का? असा प्रश्न विचारत पोलिसांचा भरपूर समाचार घेतला. या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता येतो, जेव्हा ठाकरे गटाचा नेता येतो, जेव्हा आरएसएसची सभा असते आणि जेव्हा भाजपचा नेता येतो तेव्हा पोलीस त्यांना लव्ह लेटर देत नाही. फक्त आम्हालाच लव्ह लेटर मिळतो कारण पोलिसांना देखील माहिती मर्द फक्त एकच आहे. अश्या शब्दात खासदार ओवैसी यांनी पोलिसांचा समाचार घेतला. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मी भारताचा नेतृत्व दुसऱ्या देशामध्ये केलं. कतरचे एक शेख पॅलेस्टाईन संबंधी भारताविषयी बोलत होते तेव्हा माझ्या डेलिगेशनने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्या शेख ला उत्तर दिलं की भारतापेक्षा तर तुमचा हा कतर पॅलेस्टाईनच्या अगदी जवळ आहे मग तुम्ही का नाही पहिले मदत पोहोचवत आणि भारत याने आपला एक हिस्सा हा पॅलेस्टाईन साठी ठेवलेला आहे. असं मी कतर मध्ये भारताची साईट घेऊन सांगितलं आज मी भारतासाठी दुसऱ्या देशांशी लढत आहे तरी देखील जिथे मी जातो तिथे मला लव्ह लेटर दिला जातो आणि त्यात सांगितलं जातं की मी काय बोलावं आणि काय नाही ? बीजेपी पार्टीचे नेते येतात, शिंदे पार्टीचे नेते येतात, अजित पवार पार्टीचे नेते येतात तेव्हा त्यांना का हा लव्हलेटर दिला जात नाही. मी एकटाच मर्द पोलिसांना दिसतो का? आणि ज्या कलमान्वये मला हा लेटर देण्यात आला तो कलमला रद्द करण्यासाठी मीच 35 मिनिट सादनात भाषण केलं आहे. कदाचित पोलीस हे विसरले. पोलिसांनी दिलेला हा लव्ह लेटर मी रिजेक्ट करतो असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले Read More »

imtiaz jaleel

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap : अहिल्यानगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगर शहरात चिकनी चमेली राहत असून काम न करता फक्त हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आमदार जगताप यांच्यावर केली आहे. या सभेत बोलताना आम्ही पंतप्रधान मोदींना उत्तर देतो तर तू कोण? तू तर चिल्लर आहे असा टोला देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना लावला. तर दुसरीकडे त्यांनी नगर – औरंगाबाद रस्त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान करत मी 20 हजार रुपये देतो तुम्ही एकदा नगर – औरंगाबाद रस्त्यावर प्रवास करा असं म्हटले आहे. तसेच आमच्या पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो मात्र मी जेव्हा आमदार आणि नंतर खासदार झालो तेव्हा मी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता अशी आठवण देखील जलील यांनी विरोधकांना करून दिली. तर दुसरीकडे नगर शहरात एक विषारी साप असून तो दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या विष मध्ये दम नाही अशी टीका फारुख शाब्दी यांनी आमदार जगताप यांच्यावर केली.

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: मोठी बातमी, खासदार ओवैसी नगर शहरात दाखल

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे अहमदनगर शहरात आगमन झाले असून आज संध्याकाळी 7 वाजता मुकुंदनगरमधील सीआयव्ही ग्राउंड येथे ओवैसी जाहीर सभा घेणार आहे. या सभेत ओवैसी यांच्याकडून कोणते मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार ओवैसी यांच्यासोबत नगर शहरात एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह मुंबई प्रदेशाध्यक्ष फारुक शाब्दी, माजी आमदार वारीस पठाण आज नगर शहरात येणार आहे. खासदार ओवैसी पहिल्यांदाच नगर शहरात जाहीर सभा घेत असल्याने सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा सभेच्या ठिकाणी दाखल झाला आहे.

Asaduddin Owais: मोठी बातमी, खासदार ओवैसी नगर शहरात दाखल Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी 9 ऑक्टोबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. खासदार ओवैसी यांची ही सभा मुकुंदनगर मधील सीआयव्ही ग्राउंड येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यापूर्वी खासदार असदुद्दीन ओवैसी 30 सप्टेंबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार होते मात्र 29 सप्टेंबर रोजी शहरात दोन गटात वाद निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर खासदार ओवैसी यांनी सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर आता ही सभा 09 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती अहमदनगर एमआयएमकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नगर शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या या सभेत एमआयएम कडून आगामी पालिका निवडणुकीसाठी कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील नगर शहरात 09 ऑक्टोबर रोजी येणार आहे.

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: खासदार ओवैसी अहिल्यानगर शहरात घेणार सभा; पोलिसांकडून ग्रीन सिग्नल

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना अहिल्यानगर शहरात सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे. यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी काही अटी व शर्ती ठेवून ओवैसी यांना सभेसाठी परवानगी दिली आहे. सभेसाठीच्या अटी व शर्थी १) जाहिर सभा घेण्याकरीता आवश्यक लागणा-या परवानगी स्थानिक स्वाराज्य संस्था यांचेकडुन घेवुनच सभा घ्यावी. [स्टेज, मंडप उभारणी, एम एस ई बी, पार्कीग व्यवस्था, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग इत्यादी। त्याबाबचे मंजुरी पत्र सादर करावे. २) जाहिर सभा घेत असताना फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स, अती महत्वाचे वाहने, अत्यावश्यक वस्तु वाहतुक करणारे वाहने येण्या जाणेसाठी अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन पार्किंग व्यवस्था करावी. सदर पार्किंग ठिकाणी आपले स्वयंसेवक नेमावेत. वाहतुक पोलीसांच्या सुचनांचे पालन करावे. ३] आपले पक्षाचे खासदार बें अससुददीन ओवेसी यांना झेड वर्गवारीची सुरक्षा आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी ४५ बाय ६० फुट लांबी रुंदीचे डी झोन तयार करुन स्टेजची व्यवस्था करावी. तसेच स्टेजवर बसणा-या प्रमुखांची नावांची यादी आगाऊ उपलब्ध करुन देवुन त्यांचे पास आमचेकडुन घ्यावेत. स्टेज सुरक्षामध्ये कोणताही निष्काळी पणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. ४) सभेच्या ठिकाणी सुरक्षाच्या अनुषंगाने सभेचे ठिकाण चारही बाजुने सुरक्षीत करुन समक्ष दिलेल्या सुचनेप्रमाणे स्वतंत्र प्रवेश व्दाराची व्यवस्था करावी जेणेकरुन सुरक्षा अनुषंगाने सोयीचे होईल याबाबत काटेकोरपणे पालन करावे. ५) जाहिर सभेच्या अनुषंगाने लावण्यात येणारे झेंडे, पोस्टर्स व बॅनर्स याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतंत्र पारवानगी घेवुन सादर करावी. ६) आपण लावण्यात आलेल्या झेंडे व पोस्टर्स व बॅनर्स व इतर जाहिरातीमुळे कोणत्याही धर्माच्या/जातीच्या भावना दुखवतील असे वक्तव्य अथवा देखावे अथवा विभिस्त किंवा मना दुखवतील असे गाणी पोस्टर्स लावू नयेत. ७] जाहिर सभा अयोजित करताना असताना कोणावरही आपले कार्यकर्ते जबरदस्तीने सहभागी करणार नाही याची दक्षता घ्यावी. जाहिर सभा ही शांततेने व सुरळीत पार पाडणेसाठी पोलीस ज्या ज्या वेळी मिटिंगसाठी बोलविले जाईल त्यावेळेस हजर राहुन त्यावेळी देणेत आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. ८) जाहिर सभा मध्ये महिला व मुली सहभागी असतील तर त्यांची गैर सोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शक्यतो महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे भाग करावेत. ९] जाहिर सभा असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेचा/मार्गाचा वापर करावा. जाहिर सभा घेण्यापुर्वी अथवा नंतर कोणतीही रॅली काढता येणार नाही. सभेकरीता येणारे वक्ते यांना झेड सुरक्षा असलेने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कोठेही पोलीसांच्या परवानगी शिवाय दौ-यात बदल करता येणार नाही. १०) जाहिर सभा च्या वेळी अत्यावश्यक सेवा चालु राहितील तसेच आपले समर्थकाकडुन त्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. ११] जाहिर सभेच्या दरम्यान अथवा नंतर आपले कार्येकर्ते यांचेकडुन कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. १२] सभेच्या ठिकाणी लाईट, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग याची सभेला येणा-या नागरिकांचे प्रमाणात पुरेशी सोय करण्यात यावी. वरील नियम व अटीचे पालन करुन याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र व सबंधिकत विभागाचे परवानगी पत्र असे संपुर्ण बाबीची पुर्तता करुन याबाबतचा पुर्तता आहवाल दि. २८/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा शिवाजीनगर पोलीस ठाणेस सादर करावेत. आपण वरील बाबीची पुर्तता न केल्यास आपला परवानगी अर्ज नामंजूर करुन मा. वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Asaduddin Owais: खासदार ओवैसी अहिल्यानगर शहरात घेणार सभा; पोलिसांकडून ग्रीन सिग्नल Read More »