DNA मराठी

Marathi Movie

bhetali tu punha

Bhetali Tu Punha : “भेटली तू पुन्हा” चा सिक्वल ‘या’ दिवशी येणार

Bhetali Tu Punha : तरुणाईच्या पसंतीस उतरलेला “भेटली तू पुन्हा” हा चित्रपट २८ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ९ वर्ष पूर्ण झाली असून याच विशेष दिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे. “भेटली तू पुन्हा 2” लव स्टोरीच्या पुढची स्टोरी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार असून अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहे. स्वरूप स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करणार असून प्रभाकर परब, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. “भेटली तू पुन्हा” या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हे या चित्रपटाच्या सिक्वलचे दिग्दर्शन करणार असून लेखन संजय जमखंडी यांचे आहे. “भेटली तू पुन्हा” या चित्रपटाचा सिक्वल येतो आहे हे माझ्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे. हलकी फुलकी प्रेमकथा, सुमधुर संगीत, उत्तम अभिनय यामुळे रसिक प्रेक्षकांचा चित्रपटाच्या पहिल्या भागाला छान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वलमुळे कथानक काय वळण घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी सांगितले.

Bhetali Tu Punha : “भेटली तू पुन्हा” चा सिक्वल ‘या’ दिवशी येणार Read More »

img 20260602 wa0015

Live Movie : ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू…

Live Movie: काही दिवसांपूर्वीच ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यानंतर गीत ध्वनीमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. त्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्यांनी ‘लाईव्ह’बाबत रसिकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे ‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते छबी असीम हल्दर असून, लेखक-दिग्दर्शक संजीव राय आहेत. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा एका महत्त्वकांक्षी तरुणीभोवती फिरणारी आहे. या कथेच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, समाजातील विविध घटनांचा वेध घेण्यात येणार आहे. नायिकेच्या संघर्ष आणि न्याय-हक्काच्या लढाईची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मढ, गोरेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. ‘लाईव्ह’ या शीर्षकावरून चित्रपटात काय पाहायला मिळणार याची कल्पना येत नाही. त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक संजीव राय म्हणाले की, ‘लाईव्ह’ चित्रपटाची कथा समाजातील वास्तव चित्र दाखवणारी आहे. आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये तरुणींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तरीही त्यांच्या समोरील आव्हाने कमी झालेली नाहीत. या चित्रपटाची कथाही अशाच आव्हानात्मक प्रवासावर आधारलेली असून, सरकारी व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी आहे. समाजातील विविध घटकांचा समावेश असलेला हा चित्रपट आजवर कधीही प्रकाशात न आलेले पैलूंवर प्रकाश टाकणार आहे. वास्तवाला मनोरंजनाची जोड देत ‘लाईव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून एक संगीतप्रधान कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी ‘लाईव्ह’ चित्रपटाची संपूर्ण टिम खूप मेहनत घेत असल्याचेही राय यांनी सांगितले. दिग्दर्शक संजीव राय आणि पूनम विभूते यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. गीतकार महालिंग कंठाळे यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. डिओपी गोपी सिनेमॅटोग्राफी करीत असून, सैफुद्दीन शेख कला दिग्दर्शकाची बाजू सांभाळत आहेत.

Live Movie : ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू… Read More »

img 20260330 wa0006

Siddharth Jadhav : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग ; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती

Siddharth Jadhav : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’च्या उपक्रमांतर्गत शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी “हजार वेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाचे हे पहिलेच सार्वजनिक प्रदर्शन असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. या प्रदर्शनावेळी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि चित्रपटाचे रंगभूषाकार श्रीकांत देसाई उपस्थित होते. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी या मान्यवरांचे स्वागत केले. हा चित्रपट हाऊसफुल ठरला असून प्रेक्षकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर २०२५ पासून या उपक्रमांतर्गत दरमहा एक चित्रपट दाखवण्यात येत असून रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपटाविषयी हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट एक बहुचर्चित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात एका ग्रामीण भागातील माणसाच्या संघर्षाची आणि स्वप्नांची कथा आहे. त्याच्यावर ‘शोले’ या चित्रपटाचा प्रभाव असून तो हा चित्रपट हजार वेळा पाहतो. सामाजिक, प्रेरणादायी आणि चित्रपटप्रेमीच्या भावविश्वावर आधारित अशी या चित्रपटाची मांडणी आहे.

Siddharth Jadhav : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग ; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती Read More »

ranpati shivray swari agra

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार

Ranpati Shivray Swari Agra : शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या आग्रा भेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की केवळ बळावर नव्हे, तर बुद्धी आणि नियोजनावर विजय अवलंबून असतो. ‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.  कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. चित्रपटाचे कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. गीते जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, दिग्पाल लांजेकर यांची असून संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत  मयूर राऊत यांचे आहे. ध्वनी संयोजन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (नॉइज स्टोरीज) यांनी केले आहे.  रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा रोहिणी सालेकर यांची आहे. कार्यकारी निर्माती केतकी पार्थ अभ्यंकर आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अर्जुन मोगरे  आहेत. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शनाची  जबाबदारी  समित साळुंखे, अनुराधा गव्हाणे साळुंखे  यांनी सांभाळली आहे. पॅनोरमा स्टुडिओज ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार Read More »

gotya gangster

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

Gotya Gangster : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार असून, 26 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुती ऋतुजा पाटील व शिव लोखंडे यांनी केली आहे. राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. त्यानंतर विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अत्यंत खुसखुशीत गोष्ट, उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात आहे. या कथानकाविषयीची उत्सुकता ट्रेलरमधून वाढली आहे. ‘बाबू बँड बाजा’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम चित्रपटांची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे आता राजेश पिंजानी यांचा हा शेवटचाच चित्रपट ठरला. आता गोट्या गँगस्टर आता 26 डिसेंबरला प्रदर्शित करून राजेश पिंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट Read More »