DNA मराठी

Maharashtra News Maharashtra Politics

img 20260508 wa0012

Bhagwanbaba Multistate Co-operative Society Limited : ठेवीदारांची फसवणूक; स्थानिक पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याने संताप

Bhagwanbaba Multistate Co-operative Society Limited : “भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा शेवगाव” या संस्थेमार्फत ठेवीदारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, पीडित गुंतवणूकदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही स्थानिक पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संस्थेकडून ११ ते १८ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून अनेक ठेवीदारांकडून मुदत ठेव स्वरूपात लाखो रुपयांची गुंतवणूक स्वीकारण्यात आली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना ना मूळ रक्कम परत मिळाली, ना व्याज अदा करण्यात आले. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे. तक्रारदारांनी सांगितले की, घरबांधणी, शेती, मुलांच्या शिक्षणासाठी आणि कौटुंबिक गरजांसाठी साठवलेली आयुष्यभराची पुंजी या संस्थेत गुंतवली होती. मात्र पैसे परत मागितल्यावर संस्थेकडून केवळ टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे आणि मानसिक त्रास दिला जात आहे. या प्रकरणात संस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक यांनी विश्वास संपादन करून जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठेवीदारांनी एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी करत शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. विशेष म्हणजे, आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर कार्यालयातून शेवगाव पोलिस स्टेशनला लेखी पत्र पाठवून सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. तरीही स्थानिक पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. “आर्थिक गुन्हे शाखेचे आदेश असूनही पोलिस तक्रार दाखल करून घेत नाहीत, मग सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल पीडित गुंतवणूकदारांनी उपस्थित केला आहे. वेळेत कारवाई झाली नाही, तर आणखी अनेक ठेवीदार पुढे येतील आणि मोठे आंदोलन उभे राहू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Bhagwanbaba Multistate Co-operative Society Limited : ठेवीदारांची फसवणूक; स्थानिक पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याने संताप Read More »

ST Gratuity Interest Scam Case : एसटी ग्रॅज्युइटी व्याज घोटाळा प्रकरणी काल पासून चौकशी सुरू

ST Gratuity Interest Scam Case : राज्य परिवहन महामंडळात उपदान (ग्रॅज्युइटी) देताना मोठ्या प्रमाणात दिल्या गेलेल्या व्याजाच्या बद्दल एसटीच्या अंतर्गत लेखा परिक्षण पथकाद्वारे काल पासून तपासणी सुरू केली असून तपासणी दरम्यान काही धक्कादायक बाबी सुद्धा समोर आल्या असून या तपासणी सोबतच महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाची सुद्धा मदत घेतली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. या घोटाळ्या प्रकरणी प्रसार माध्यमातून लक्ष वेधण्यात आल्या नंतर महामंडळाच्या लेखा शाखेकडून मुख्य अंतर्गत लेखा परीक्षक कार्यालय, मुंबई यांच्या मार्फत तपासणी मोहिम सुरू करण्यात आली असून दोन वर्षात ४८० कर्मचाऱ्यांच्या थकीत उपदान रकमेवर न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या दोन वर्षात सुमारे दोन कोटी ५५ लाख रुपये इतकी व्याजाची रक्कम देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयीन निवड्यांची संख्या ज्या विभागात मोठ्या प्रमाणात आहे, व ज्या विभागांनी जास्त व्याज दिले आहे. अशा अकोला, वर्धा, जळगाव, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, नांदेड, सातारा, जालना आणि गडचिरोली या विभागांतील मागील दोन वर्षांतील उपदान दाव्यांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांची तपासणी सुरू झाली असून तपासणी दरम्यान रोजंदारी कालावधीची गणना, २४० दिवसांची परिगणना, एसटी बँकेच्या नावाने धनादेश काढण्याची प्रक्रिया, तसेच ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्रलंबित ठेवण्यामागील कारणे शोध सुरू असतानाच काही धक्कादायक माहिती समोर आली असून काही विभागात पूर्ण ग्रॅज्युइटी रक्कम पूर्ण न रोखता एक, दोन वर्षाची रक्कम रोखण्यात आली आहे. हे प्रमाण कमी असले व रक्कमही कमी असली तरी एसटीच्या विधी खाते व कर्मचारीवर्ग खात्याने समन्वयाने योग्य मार्ग न काढता,उदासीनता दाखविल्याने नाईलाजास्तव संबंधित निवृत्त अधिकारी व कर्मचारी न्यायालयात गेले आहेत. पण न्यायालयाने दिलेल्या काही तारखांना महामंडळाचे काही वकील गैरहजर राहिले असून एसटीच्या गैरहजर वकिलांना मानधन देण्यात आले आहे. याचीही चौकशी करण्यात आली पाहिजे. लेखा शाखा योग्य पद्धतीने तपासणी करीत आहे. त्यांना ५ एप्रिल पर्यंतची मुदत सुद्धा देण्यात आली आहे.तरीही या चौकशीत बऱ्याच इतरही बाबी उघडकीस येत असून सुरक्षा व दक्षता विभागाची सुद्धा मदत घेण्यात आली तर अजून काही मुद्दे समोर येतील असेही बरगे यांनी म्हटले आहे.

ST Gratuity Interest Scam Case : एसटी ग्रॅज्युइटी व्याज घोटाळा प्रकरणी काल पासून चौकशी सुरू Read More »