DNA मराठी

Maharashtra crime news

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण

Pune Crime News: पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण Read More »

केडगावात लूटमार अन् हत्या, 3 जणांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ahilyanagar Police: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत केडगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना 22 जून रोजी एक अनोळखी पुरूष जखमी अवस्थेत केडगाव इंडस्ट्रियल एरियामधील नागछाप हिंग कंपनीच्या मोकळया जागेत आढळला होता. या व्यक्तीला पुढील उचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषित केल्याने या प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवरून बीएनएस कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तपास करत असताना पोलिसांनी घटनाठिकाणचे जवळील व केडगाव ते कायनेटीक चौक, अहिल्यानगर मार्गावरील 20 ते 25 सीसीटीव्ही फुटेज तपासून संदेश संजय क्षेत्रे, अमन असीरमिया शेख आणि मंगेश कालीदत्त कांबळे, सर्व रा.केडगाव, अहिल्यानगर या आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मयताचे आधारकार्ड मिळून आले. आधारकार्डवरून मयत हा बोबडा अनारसिंग, रा.सुखपुरी, जैनाबाद, बुरहानपूर, मध्यप्रदेश असल्याचे निष्पन्न झाले. मयतास लुटमार करण्याच्या उद्देशाने लाकडी काठी व दगडाने मारहाण करण्यात आली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.

केडगावात लूटमार अन् हत्या, 3 जणांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई Read More »

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सहा महिण्यापासुन फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी अटक केली आहे. संदिप सरसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, 25 सप्टेंबर 2024 रोजी पिडीतेला फोन करून पिडीतेच्या घराचे काही अंतरावर असलेल्या बौध्द समाज मंदीराचे आवारात भेटण्यासाठी बोलावुन पिडितेच्या आई वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन पिडीतेवर अत्याचार केला होता. या प्रकरणात शेवगांव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता कलम 64, 65(1), 351 (1) सह बा.लै.अत्या.अधि. 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी सहा महिन्यापासून फरार होता. आरोपीबाबत पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी हा सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथुन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून शेवगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक Read More »

दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Jalna Crime : जालन्यात दुकानात घुसून एका व्यापाऱ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, जालना शहरातील कडबी मंडी भागात हरकाराम चेलाराम चौधरी यांची खुशी इमिटेशन नावाची ज्वेलरीची दुकान आहे. या दुकानात अज्ञात दोन तरुणांनी प्रवेश केला. यातील एका तरुणाकडे एक धारदार कोयता ही होता. यावेळी अज्ञात तरुणांनी पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केलंय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकरणी अज्ञात दोन तरुणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हरकाराम चौधरी यांच्या पोटाला चाकू लागल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद Read More »

Vasai Murder Case : अफेअर, नोकरी आणि खून… जाणुन घ्या वसईच्या आरती हत्याकांडाची इनसाईड स्टोरी

Vasai Murder Case : वसई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  ज्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खडबड उडाली असून अनेक चर्चांना उधाण आला आहे.  शहरात भरदिवसा रस्त्याच्या मधोमध 20 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आरती यादवचे नुकतेच आरोपी रोहित यादवसोबत ब्रेकअप केला होता. याचाच राग मनात धरून ही हत्या करण्यात आली आहे. 30 सेकंदात 15 वार  पोलिसांनी सांगितले की, वसईमध्ये एका नराधमाने प्रेयसीच्या डोक्यावर अवघ्या 30 सेकंदात लोखंडी कुंड्याने 15 वेळा वार करून रस्त्यातच तिची निर्घृण हत्या केली. ही घटना वसई (पूर्व) येथील चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी 9.45 वाजता घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. रोहितने आरतीवर मागून मोठ्या लोखंडी रेंचने हल्ला केला. त्यामुळे आरती रस्त्यावर पडते. यानंतर रोहित तिचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर हल्ला करतो. …तर आरतीचा जीव वाचला असता घटनेच्या वेळी डझनभर लोक तेथून गेले, परंतु सर्वजण केवळ प्रेक्षक राहिले. एका प्रत्यक्षदर्शीने रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, त्यामुळे तो घाबरला आणि मागे हटला. तोपर्यंत घटनास्थळी लोकांची गर्दी जमली असली मात्र तरी देखील 20 वर्षीय आरती यादवला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. प्रत्यक्षदर्शींनी रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर आरतीचा जीव वाचू शकला असता, असे पोलिसांनी सांगितले. आरतीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर गंभीर दुखापत झाली होती. आरती ही उत्तर प्रदेशची रहिवासी होती आणि आरोपी रोहित हा हरियाणाचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी (18 जून) सकाळी आरती वसईतील एका खासगी कंपनीत कामासाठी घरून निघाली. त्यानंतर रोहित तिथे आला आणि तिला विचारू लागला की तिचे कोणत्या मुलासोबत अफेअर आहे. यानंतर आरती निघू लागली असता रोहितने हातातील मोठ्या कुंड्याने तिच्या डोक्यात वारंवार वार केले. रोहित आरतीच्या रक्ताने माखलेल्या शरीराजवळ बसून राहिला. काही वेळाने वालीव पोलिसांनी येऊन त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. हल्ला करताना रोहित म्हणत होता, “तू माझ्याशी असं का केलंस?” आरोपींनी आरती यादव यांच्यावर इंडस्ट्रियल कुंड्याने सुमारे 15 वार केले. आरतीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आरोपीने त्याला हे काम मिळवून दिल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि आरती गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. रोहितला अचानक संशय आला की ती आपली फसवणूक करत आहे आणि ती दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यावरून दोघांमध्ये अनेक भांडण झाले आणि अखेर आरतीचे ब्रेकअप झाले. याचा राग आल्याने रोहितने आरतीची हत्या केली. पोलिसांनी कारवाई केली नाही : आरतीची बहीण मृत आरती यादवची बहीण सानिया यादव हिने आरोप केला आहे की, रोहित गेल्या तीन-चार दिवसांपासून तिच्या बहिणीचा छळ करत होता. शनिवारी त्यांनी आरतीला मारहाण केली होती. आरतीचा मोबाईल तुटला. सानियाने सांगितले की, कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी रोहितवर कारवाई करण्याऐवजी त्याला इशारा देऊन सोडून दिले. तिची बहीण आरती यादवला न्याय मिळवून देणार असल्याचे सानियाने सांगितले. वालीव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून त्याची चौकशी सुरू आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Vasai Murder Case : अफेअर, नोकरी आणि खून… जाणुन घ्या वसईच्या आरती हत्याकांडाची इनसाईड स्टोरी Read More »

Maharashtra News : धक्कादायक, एकाच घरात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra News : राज्याची उपराजधानी नागपूर येते एक खळबळजनक घटना घडली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार  मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमण गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. घरामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. श्रीनिवास इलापुंगाटी (वय ५८), पद्मलता इलापुंगाटी (वय ५४) आणि मुलगा व्यंकट इलापुंगाटी (वय २९) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, इल्पुंगटी कुटुंबाचा राईस मिलचा व्यवसाय आहे. मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमण गावात अनेक वर्षांपासून इल्पुंगटी कुटुंब राहत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. नेहमी सकाळी लवकर उठणाऱ्या इल्पुंगटी कुटुंबातील एकही सदस्य गुरुवारी सकाळी बराच वेळ होऊनही घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी हाक मारून दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता ते चक्रावून गेले. घरात पती-पत्नी आणि त्यांच्या २९ वर्षांच्या मुलाचे मृतदेह पडले होते. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आरोली पोलीस स्टेशनने घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली की त्यांच्या मृत्यूमागे षडयंत्र आहे? पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Maharashtra News : धक्कादायक, एकाच घरात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ Read More »