DNA मराठी

Maharashtra BJP

BJP

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Maharashtra BJP :  आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या सहा महत्त्वाच्या विभागांसाठी नवीन समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि विभागवार कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही या नियुक्त्यांमागची मुख्य भूमिका आहे. या नव्या निवडीनुसार, मुंबई विभागाच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते मुंबई भाजप समन्वयक म्हणून काम पाहतीलच, शिवाय त्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाच्या समन्वयाचीही अतिरिक्त जबाबदारी असेल. ठाणे-कोकण विभागासाठी आमदार योगेश सागर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार प्रमोद जठार संयोजक म्हणून, तर संजय वाघुले सहसंयोजक म्हणून कार्यभार सांभाळतील.पश्चिम महाराष्ट्रात आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे समन्वयाची धुरा देण्यात आली आहे. त्यांना विक्रम पावसकर (संयोजक) आणि विक्रम देशमुख (सहसंयोजक) यांची साथ लाभणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या जबाबदारीत प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक समन्वयक असतील. त्यांच्या सोबतीला विजय चौधरी संयोजक म्हणून आणि आमदार मंगेश चव्हाण सहसंयोजक म्हणून काम पाहतील. मराठवाडा विभागासाठी प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या पथकात अ‍ॅड. नितीन काळे संयोजक, तर राहुल लोणीकर सहसंयोजक म्हणून कार्यरत राहतील. विदर्भासाठी आमदार संजय कुटे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, प्रा. दिनेश सूर्यवंशी संयोजक आणि आमदार प्रवीण दटके सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडतील. या सर्व नियुक्त्या 5 मे 2026 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांमुळे आगामी काळात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्यास आणि कार्यकर्त्यांचे जाळे अधिक घट्ट होण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

Sujay Vikhe : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनात महत्त्वपूर्ण बदल करत भारतीय जनता पक्षने अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्ह्यातील सक्रिय, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. खासदार म्हणून त्यांनी विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला असून युवक आणि ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि राज्यभरात भाजपची ताकद वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात राज्याच्या राजकारणात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण Read More »

Maharashtra Politics

जाती-धर्माचे राजकारण नको अन्यथा होईल वाईट परिणाम

Maharashtra Politics: महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्यात सध्या जाती आणि धर्माच्या मुद्द्यांवर राजकारण केले जात आहे. हे राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता, राज्याच्या विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्रांवर खोलवर परिणाम घडवते आहे. याचा सर्वाधिक फटका तरुणाईपासून ते शेतकरी व उद्योजकांपर्यंत सर्वच स्तरांवर बसत आहे. तरुण-तरुणींवर परिणामसध्याच्या सामाजिक वातावरणात तरुण पिढी अधिक गोंधळलेली आणि असमंजस झाली आहे. जातीधर्मावर आधारित विचारसरणीमुळे एकत्रित विकासाच्या संधी कमी होतात. शिक्षण, नोकरी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये गट-तट तयार होतात, जे वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीच्या आड येतात.त्यातून जातीय भेदभावाची बीजे तरुण मनात पेरली जातात आणि द्वेषाचे वातावरण तयार होते. काही तरुण आपल्या योग्य दिशा आणि उद्दिष्ट विसरून राजकारणात गुंततात, आणि त्यांचे खरे सामर्थ्य दुर्लक्षित राहते. परिणामी, मानसिक तणाव, नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना त्यांच्यात वाढीस लागते. शेती व्यवसायावर परिणामशेतकरी हा समाजाचा कणा मानला जातो. मात्र जातीधर्मावर केंद्रित राजकारणामुळे शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या दुर्लक्षित राहतात. सरकारचे आणि धोरणकर्त्यांचे लक्ष जातीय वादाकडे वळल्यामुळे शेतीसंबंधी महत्त्वाचे निर्णय लांबणीवर पडतात.त्यातच शेतकऱ्यांमध्ये गटबाजी निर्माण होते आणि पारंपरिक एकजूट कमी होते. सहकारी संस्था, बाजार समित्या अशा ठिकाणीही जातीय राजकारण शिरकाव करते, ज्यामुळे शेती व्यवस्थेत पारदर्शकतेचा अभाव जाणवतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सुधारणा यांकडेही दुर्लक्ष होऊन शेती मागे पडते. उद्योग व व्यवसाय क्षेत्रावर परिणामराजकीय अस्थिरतेचा आणि सामाजिक तणावाचा थेट परिणाम उद्योगधंद्यांवर होतो. जातीय तणावामुळे गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कचरतात. त्यामुळे उद्योगांना स्थिरता लाभत नाही. शांतता व सामाजिक सलोखा बिघडल्यामुळे नवउद्योजकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत नाही.यामुळे तरुणांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा कमी होते. रोजगाराच्या संधी कमी होतात आणि बेरोजगारी वाढते. ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील विश्वासाला तडा जातो आणि व्यापारावर प्रतिकूल परिणाम होतो. जात-धर्मावर आधारित राजकारणामुळे समाजातील समतोल बिघडतो आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक अवघड होते. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुण, शेतकरी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. शिक्षण, रोजगार, शेती आणि उद्योग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून विकासाभिमुख विचारसरणीला चालना देणे हे काळाचे मागणे आहे. जाती-धर्माच्या भिंती पुसून एकजुटीने पुढे जाणे हाच खरा महाराष्ट्राचा मार्ग आहे.

जाती-धर्माचे राजकारण नको अन्यथा होईल वाईट परिणाम Read More »

Uddhav And Shinde

Uddhav Thackeray : शिंदे गटाला धक्का! ‘त्या’ प्रकरणात होळीनंतर होणार निर्णय

Uddhav Thackeray: राज्यात पुन्हा एकदा खरी शिवसेना कोणाची या प्रश्नावर चर्चा सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती.  मात्र राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला होता. या याचिकेवर आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या नोटिशीला 01 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सभापती राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या (यूबीटी) गटाने दाखल केलेल्या याचिकेवर   सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, उद्धव गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात पाठवण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच होळीनंतर या प्रकरणाची सुनावणी होऊन निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हाच ‘खरा’ शिवसेना पक्ष असल्याच्या सभापतींच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने नुकतीच याचिका दाखल केली होती. यापूर्वी, CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने CM शिंदे आणि इतर 38 शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती आणि शिवसेनेच्या UBT च्या याचिकेवर त्यांचे उत्तर मागितले होते. मात्र अद्याप उत्तर दाखल झालेले नाही. या खंडपीठात CJI चंद्रचूड व्यतिरिक्त न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही समावेश आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे उद्धव गटाचा  म्हणणे आहे. कारण सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर लवकर निर्णय न घेतल्यास संपूर्ण प्रकरण निरर्थक ठरणार आहे. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, “आम्ही होळीच्या सुट्टीनंतर सुनावणीसाठी या प्रकरणाची  सुनावणी करून प्रकरण निकाली काढू.”  अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिकरणाच्या (स्पीकर) कार्यालयातून मूळ रेकॉर्ड मागवण्यात येईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात होईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. . काय आहे उद्धव गटाच्या याचिकेत? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, विधानसभा अध्यक्षांच्या 10 जानेवारीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना आहे, कारण विधानसभेत आणि पक्षाची सत्ता त्यांच्याकडे आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुमत आहे. याशिवाय शिंदे आणि त्यांच्या गटातील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळण्यालाही याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.

Uddhav Thackeray : शिंदे गटाला धक्का! ‘त्या’ प्रकरणात होळीनंतर होणार निर्णय Read More »

BJP

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट

Loksabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच सत्ताधारी ‘महायुती’ मध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला नसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.   तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप राज्यातील काही विद्यमान खासदारांना धक्का देणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार भाजप आगामी लोकसभा विद्यमान निवडणुकीमध्ये तब्बल डझनभर खासदारांना तिकीट नाकारणार आहे. यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला पुढील आठवड्यामध्ये ठरू शकतो.  यानंतर भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील आपल्या उमेदवारांची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या जागावाटपात विजय हा एकमेव निकष आहे. महायुतीमध्ये समाविष्ट सर्व पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सुरुवातीची चर्चा सकारात्मक झाली असून 11-12 मार्चपर्यंत जागावाटपाचा निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकसभेच्या 45 जागा कशा जिंकायच्या, याशिवाय जागावाटपाचा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही. पंतप्रधानांच्या विजयासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करतील. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. अनेक बैठका होऊनही महायुती आघाडी किंवा विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीने महाराष्ट्रात जागावाटपाचा निर्णय घेतलेला नाही. राज्यातील विद्यमान खासदारांची कार्यपद्धती आणि परिणामकारकता जाणून घेण्यासाठी भाजपने पक्षांतर्गत तीन सर्वेक्षण केल्याचे वृत्त आहे. डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या खासदारांचा स्ट्राइक रेट चांगला नाही अशा खासदारांना हटवले जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांची निवड करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गेल्या पाच वर्षांतील विद्यमान खासदारांची कामगिरी हा सर्वोच्च निकष ठेवला आहे. याशिवाय सामाजिक समीकरणाबरोबरच स्थानिक पातळीवरील राजकारणातील त्या नेत्याचा प्रभावही तपासण्यात आला आहे. भाजपने राज्यातील 32 ते 37 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजप येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करू शकते. ज्यामध्ये डझनभर नवीन नावांचा समावेश अपेक्षित आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या खासदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. 1. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन 2. उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी 3. सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी 4. सांगली- संजय काका पाटील 5. लातूर- सुधाकर श्रृंगारे 6. जळगाव- उन्मेष पाटील 7. धुळे- सुभाष भामरे 8. बीड- प्रीतम मुंडे 09. नांदेड- प्रतापराव चिखलीकर 10. रावेर- रक्षा खडसे 11. वर्धा- रामदास तडस.

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट Read More »