DNA मराठी

Leopard attack

eknath shinde

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

Eknath Shinde: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रोहन बोंबे, शिवन्या बोंबे व भागुबाई जाधव यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.   आमदार शरद सोनवणे व युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते पीडित कुटुंबीयांना ही मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून ही घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली. नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या तीन घटनांमध्ये पिंपरखेड गावातील रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव अशा तीन जणांचा मृत्यू झाला होता. बिबट्या नरभक्षक झाल्याने गावात सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेरीस वन विभागाने या बिबट्याला ठार करून पिंपरखेड वासियांची या भीतीच्या सावटातून मुक्तता केली. मात्र त्यानंतर या घटनेची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. तसेच बिबट्यांच्या त्रासातून कायमस्वरूपी सुटका केली जाईल असे सांगून या ग्रामस्थांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. आज ही मदत सुपूर्त केल्यानंतर या तिन्ही पीडितांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच या घटनेनंतर केलेल्या आंदोलनामुळे ग्रामस्थांवर दखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करू असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले. झालेली घटना अत्यंत दुर्देवी असून गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नसली तरीही शिवसेना मात्र कायम आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे बोलताना या ग्रामस्थांना सांगितले. यावेळी युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे,पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, निरगुडसरचे सरपंच रविंद्र वळसे पाटील, वैभव पोखरकर, युवासेना तालुकाप्रमुख विकास राऊत, श्रीकांत लोखंडे, किरण ढोबळे, माजी सरपंच नरेश ढोमे, उपसरपंच विकास वरे, कैलास बोंबे, सोपान गावशेते, लक्ष्मण गायकवाड, माऊली ढोमे यांच्यासह शिरूर व आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच पिंपरखेडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात Read More »

img 20251113 wa0010

Leopard Attack: बिबट्याला ठार मारा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; रीयंका प्रकरणानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला

Leopard Attack: अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात काल (१२ नोव्हेंबर) सायंकाळी बिबट्याने पाच वर्षांच्या रीयंका पवार हिला उचलून नेले होते. तब्बल १६ तासांच्या शोधमोहिमेनंतर आज सकाळी काटवण परिसरात त्या चिमुकलीचा मृतदेह आढळला आणि गावात शोककळा पसरली मात्र या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा राग अनावर झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेत ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला पकडत नाही किंवा ठार मारत नाही, तोपर्यंत रीयंका पवार हिचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत वेळीच पिंजरे लावले असते तर आज ही वेळ आली नसती असा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गावात वातावरण अत्यंत तणावपूर्ण असून पोलीस व वनविभागाचे पथक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून गाव सुरक्षित नाही, बिबट्याला ठार मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Leopard Attack: बिबट्याला ठार मारा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; रीयंका प्रकरणानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला Read More »

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

Maharashtra News: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याकडून नागरिकांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहे. तर आता पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार नगर शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील बोल्हेगाव या भागात बिबट्याने एका युवकावर प्राण घातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना गुरुवार दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला आहे. बोल्हेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ हि घटना घडली आहे.या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे.तसेच या नदीजवळ बाहेर राज्यातील लोक मोठ्या कामाला आलेले आहेत तिथे त्यांची लोकवस्ती आहे.बिबट्याने अक्षय चंद्रशेखर गुंजाळ या युवकार प्राणघातक हल्ला केला त्याच्या पायाला बिबट्याने चावा घेतला आहे. दरम्यान भर वस्ती व वर्दळीचे ठिकाण असलेल्या भागामध्ये बिबट्यांकडून हल्ला झाल्याच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर शहरात तसेच बोल्हेगाव परिसरातील लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. जखमी अक्षय गुंजाळ याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला Read More »