DNA मराठी

latest news

Yeh Re Yeh Re Paisa 3 : “ये रे ये रे पैसा 3” नव्या वर्षाची सुरुवात गाजवणार

Yeh Re Yeh Re Paisa 3 :  मराठी चित्रपटसृष्टीत ‘ये रे ये रे पैसा’  मल्टिस्टारर चित्रपट आहे. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाचा सीक्वेल ‘ये रे ये रे पैसा 3’ बहुचर्चित आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, नव्या वर्षात 3 जानेवारी 2025 रोजी ‘ये रे ये रे पैसा 3’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.  अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो  या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून,  सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे  निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन वरदविझार्ड एंटरटेन्मेंट हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे.  पंकज पडघन आणि अमितराज यांचे दमदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून भेटीस येणार आहे.  संजय जाधव यांचं दिग्दर्शन असलेला चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळं, काहीतही हटके पाहण्याची पर्वणी असते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटानं तो अनुभव दिला आहे. ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा 2’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. पैसा मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात भलत्याच गोष्टी घडतात आणि त्यातून होणारी धमाल आता आणखी वेगळी, मनोरंजक होणार आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा तगडा अभिनेता आहे. त्यामुळे मनोरंजनासह सर्वांच्याच कसदार अभिनयाची जुगलबंदीही पाहता येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाल उडवण्यासाठी ‘ये रे ये रे पैसा 3’ सज्ज होत आहे.

Yeh Re Yeh Re Paisa 3 : “ये रे ये रे पैसा 3” नव्या वर्षाची सुरुवात गाजवणार Read More »

Ahmednagar Latest News: रामगिरी महाराजांवर कारवाई करा नाहीतर…, समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारला इशारा

Ahmednagar Latest News: पैगंबर मोहम्मद यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज, यती नरसिंम्हानंद आणि मुस्लीम समाजाला धमकी देणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि मुस्लिम धर्मगुरू सलमान अजहरी यांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आज समस्त मुस्लीम समाज व उलेमा शहर अहमदनगर यांच्यावतीने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच प्रशासनाकडून यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील मुस्लिम समाजाकडून देण्यात आला आहे.  मुस्लिम समाजाने या निवेदनामध्ये महंत रामगिरी महाराज, यती नरसिंम्हानंद आणि नितेश राणे यांच्या विरोधात दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये कलम 61 (1), 61(2), 192, 299 भारतीय न्याय संहिता 2023 तसेच 15 (1) बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अॅक्ट 2019 अन्वये कलमांची वाढ करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले होते तेव्हा मुंबई पोलीस आयुक्ताने आरोपी विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

Ahmednagar Latest News: रामगिरी महाराजांवर कारवाई करा नाहीतर…, समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारला इशारा Read More »

Ratan Tata: रतन टाटा यांचा शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार, राज्यात एक दिवसीय दुखवटा जाहीर

Ratan Tata:  रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. टाटा समूहाला जागतिक स्तरावर नामांकित समूहात रूपांतरित करण्याचे श्रेय टाटा यांना जाते. बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय तिरंगा अर्ध्यावर फडकणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गुरुवारी कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम होणार नाही. दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील वरळी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव एनसीपीए येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली. दर्शनासाठी येणाऱ्यांना तेथे पार्किंगची सुविधा नसल्यास पोलिसांच्या सूचनांचे पालन करून त्यांची पार्किंग व्यवस्था तपासावी लागेल, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त तैनात असेल.

Ratan Tata: रतन टाटा यांचा शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार, राज्यात एक दिवसीय दुखवटा जाहीर Read More »

Haryana Election : सामना फिरला, हरियाणात भाजप करणार हॅट्रिक? जाणून घ्या ताजे अपडेट

Haryana Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. सध्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष 47 जागांवर पुढे असून काँग्रेस 36 जागांवर पुढे आहे. त्यामूळे भाजपने ताज्या आकडेवारीनुसार बहुमताचा आकडा पार केला आहे मात्र हे कल असल्याने हरियाणामध्ये पुन्हा एकदा सामना फिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती तेव्हा काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला होता मात्र आता कल बदलत असल्याने पुढील 1-2 तासात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील जबरदस्त फाईट पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या काँग्रेस आघाडीने बहुमतचा आकडा पार केला आहे तर भाजप 28 जागांवर पुढे आहे.  एक्झिट पोलमध्ये हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष 55 ते 60 जागांवर विजय मिळवणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता तर भाजपला 20 ते 30 दरम्यान जागा मिळणार असं देखील अनेक एक्झिट पोलचं म्हणणं होतं. मात्र प्रत्यक्षात भाजप सध्या हरियाणामध्ये तिसऱ्यांदास सरकार स्थापन करण्याच्या जवळ दिसत आहे.

Haryana Election : सामना फिरला, हरियाणात भाजप करणार हॅट्रिक? जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

Business Ideas : सणासुदीत होणार भरपूर कमाई, सुरू करा ‘हा’ उत्तम व्यवसाय

Business Ideas: देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे आणि या हंगामात तुम्ही व्यवसाय करून पैसे काम विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे.   जर तुम्हालाही व्यवसायातून मोठे उत्पन्न मिळवायचे असेल तर आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया सांगणार आहोत. हा व्यवसाय करून तुम्ही सणासुदीच्या काळात भरपूर कमाई करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही इलेक्ट्रिक लाईट आणि डेकोरेशन प्रॉडक्ट्स यांसारख्या वस्तू विकून उत्पन्न मिळवू शकता. मात्र, कोणताही व्यवसाय चालवायचा असेल तर त्या उत्पादनाला बाजारात मागणी असणे अत्यंत आवश्यक असते. देशात सणांची तारांबळ उडणार आहे. दसरा, दिवाळी आदी सण येत आहेत. ज्यामध्ये काही गोष्टींची मागणी असणार आहे त्यामुळे ही कमाईची  उत्तम संधी आहे. मेणबत्त्यांमधून पैसे कमवा गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या दिवशी घरे सजवण्यासाठी रंगीबेरंगी मेणबत्त्यांना मागणी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही रंगीबेरंगी मेणबत्त्या बनवून चांगले उत्पन्न मिळवू शकता. हा मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही.  तुम्ही हा व्यवसाय फक्त 10,000 रुपयांमध्ये सुरू करू शकता. यासाठी कोणतेही मशीन लावावे लागणार नाही. मेणबत्त्या बनवण्यासाठी तुम्हाला कच्चा माल सहज मिळेल. मोल्ड्सच्या मदतीने तुम्ही मेणबत्त्या बनवू शकता आणि त्या विकू शकता. यामध्ये मेणबत्त्या डिझाईनमध्ये बनवून विकता येतात. यानंतर चांगली कमाई होईल. इलेक्ट्रॉनिक लाइट्समधून पैसे कमवा दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा सण. यानिमित्ताने सर्व घरांमध्ये दिवे लावावे लागतात. सर्व रंगीबेरंगी दिवे चमकू लागतात. या सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व दिव्यांना मोठी मागणी आहे. डेकोरेटिव्ह लाइट्सचा व्यवसाय तुम्ही छोट्या प्रमाणावर सुरू करू शकता. तुम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकता आणि किरकोळमध्ये जास्त किंमतीला विकू शकता. यानंतर चांगले उत्पन्न मिळते. सजावट वस्तू दिवाळीच्या निमित्ताने लोक आपल्या घरात रंगीबेरंगी झुंबर आणि दिवे लावतात. यासोबतच विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी सजवलेले आहे. तुमची सर्जनशीलता वापरून तुम्ही या सजावटीच्या वस्तू स्वतः बनवू शकता. यानंतर, तुम्ही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री करू शकता आणि चांगली रक्कम कमवू शकता.

Business Ideas : सणासुदीत होणार भरपूर कमाई, सुरू करा ‘हा’ उत्तम व्यवसाय Read More »

… म्हणून टीव्ही शो CID अचानक बंद झाला, कारण जाणून व्हाल थक्क

CID Show:  टिव्हीवर सर्वात लोकप्रिय शो पैकी एक असणारा सीआयडी अचानक बंद झाल्याने चाहते निराश आहे. काही दिवसापूर्वी सीआयडी 20 वर्षे चालल्यानंतर अचानक बंद झाला होता.   मात्र, आता एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणाऱ्या शिवाजी साटमने अचानक ऑफ एअर झाल्याचा खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या कारणामुळे सीआयडी अचानक बंद  शिवाजी साटम म्हणाले, ‘त्या काळात आम्ही चॅनेलला विचारायचो की ते हा शो का बंद करत आहेत. या शोचा टीआरपी चांगलाच होता. टीआरपीमध्ये आम्ही केबीसी समोरासमोर होतो. त्यानंतर शोच्या टीआरपीमध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली, पण कोणत्या शोच्या टीआरपीमध्ये घसरण होत नाही. शो बंद करण्यापूर्वी त्याने त्याच्या शेड्यूलमध्येही छेडछाड केली. पूर्वी हा शो रात्री 10 वाजता ऑन एअर व्हायचा. यानंतर ते रात्री 10:30 वाजता किंवा कधी कधी 10:45 वाजता प्रसारित करू लागले. यामुळे लोक ते कमी पाहू लागले.  मला वाटते की चॅनेलला शोच्या निर्मात्यांशी समस्या होती, परंतु आमच्यासाठी ते केवळ निष्ठेबद्दल नव्हते. ते मैत्रीबद्दल होते. यामुळे आम्ही एकत्र पडलो.   सीआयडी 1998 मध्ये सुरू झाली CID हा क्राईम शो 21 जानेवारी 1998 रोजी सुरू झाला होता. हा शो बीपी सिंग यांनी तयार केला होता आणि फायरवर्क्स प्रॉडक्शनने निर्मिती केली होती. यामध्ये शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्नची भूमिका, आदित्य श्रीवास्तव यांनी सीनियर इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका, दयानंद शेट्टी यांनी सीनियर इन्स्पेक्टर दया, दिनेश फडणीस यांनी इन्स्पेक्टर फ्रेडरिकची भूमिका तर नरेंद्र गुप्ता यांनी डॉ. साळुंखे यांची भूमिका साकारली आहे.   20 वर्षे सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर हा शो 27 ऑक्टोबर 2018 रोजी बंद झाला. शोचे सुमारे 1547 भाग टेलिकास्ट झाले होते.

… म्हणून टीव्ही शो CID अचानक बंद झाला, कारण जाणून व्हाल थक्क Read More »

Ahmednagar Crime : अनैतिक संबंध अन् शेवगावात पत्नीने केली पतीची हत्या

Ahmednagar Crime: शेवगावात अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा त्याचे पत्नीने व तिच्या प्रियकराने मिळुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीसांनी या प्रकरणात कारवाई करत 12 तासाचे आत आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव (32 वर्ष) याची विजयपुर गावामधील अनिल ज्ञानदेव जगदाळे व त्याची प्रियसीने हत्या केली होती.  आरोपी अनिल ज्ञानदेव जगदाळे याने डोक्यात, हातावर, छातीवर लोखंडी गजाने मारहान करुन ज्ञानेश्वरची हत्या केली. या प्रकरणात मयत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांचे वडिल पांडुरंग बाबासाहेब जाधव यांनी वरिल दोघांविरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं.कलम-103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.   या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक समाधान नांगरे  वेगवेगळी दोन पोलीस पथके बिडकीन, पैठण व छत्रपती संभाजीनगर भागात रवाना केली होती.

Ahmednagar Crime : अनैतिक संबंध अन् शेवगावात पत्नीने केली पतीची हत्या Read More »

Maharashtra Election: भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाथर्डीत भव्य निर्धार मेळावा…!

Maharashtra Election:  शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा  पाथर्डी येथील विजय लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला.  भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा घेऊन अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले असुन मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यावेळी अनेकांनी बोलताना केले. यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसारवाडे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार, पंचायत समितीच्या सभापती सुनीता डौंड, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शितल केदार, आत्माराम कुंडकर, भाऊ वाघमारे, बाळासाहेब सोनवने, बाळासाहेब डोंगरे, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाथर्डीत भव्य निर्धार मेळावा…! Read More »

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर

Ahmednagar News: जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवषच्या पावसाळ्यात नियम झालेल्या सीना नदीला आता पाणी पोटात साठवून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे. तसेच भिंगार नाल्याचाही चेहरा उजाळणार आहे.  सीना नदीच्या पूररेषेची फेरआखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण व खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती. तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला यश येऊन राज्या शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसे पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभीच प्राप्त झाले आहे. नगर शहराच्या सीमेला लागून सीना नदी वाहते. नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या तसेच नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केले आणि नदीचे पात्र आकसत गेले. त्यातून नदीला एखाद्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सीना नदीला पूर येणे हे तशी औत्सुक्याची बाब. एक तर नगर जिल्ह्यात एखाद्या वषच पावसाची कृपा असते. नेहमी अवर्षणच असते. कधी तरी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला की सीना नदीला पूर येतो.  पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडते. यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती. वारंवार होणारी ही स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूररेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह 2023 मध्ये संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत सांगोपांग चर्चाही झाली.  आमदार जगताप यांनी महसूल व वनविभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाब कैफीयत मांडली. या विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत मागविले होते. जलसंपदा विभागाने पूररेषेची फेरआखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या. सीना नदीचे रुंदीकरण व खोलीकरण अगोदर करायला हवे तरच पूररेषेची आखणी करता येईल असे या विभागाने सांगितले. या नदीवर शहर व शहराजवळ असलेल्या पुलांच्या लांबीरुंदीचे गणितही पाहणे गरजेचे आहे. सीना नदीची मूळ वहनक्षमता पुनर्स्थापित करावयाची असल्यास नदीपात्रात साचलेला गाळ काढणे, अतिक्रमण काढणे, गरजेचे आहे. काढलेला गाळ नदीकिनारी टाकून नगर शहराचे सुशोभिकरण करता येईल असे महापालिकेने म्हटले होते. त्यावरून किनारी रस्ता (कोस्टल रोड) तयार करता येऊ शकतो. त्यातून नदीचे मूळ पात्र पुनर्स्थापित होऊन त्या पात्रात पाऊस व अन्य पाण्याचा विसर्ग किती बसू शकतो ही लक्षात येईल. त्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील 10 किलोमीटर लांब नदीचे खोलीकरण व रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे महापालिकेने म्हटले होते.  तशी शहराभोवतालची नदीची लांबी 14 किलोमीटर आहे. या भागात तिची प्रस्तावित रुंदी 20 ते 30 मीटर व प्रस्तावित खोली चार मीटर आहे. पूव 09.70 किलोमीटर लांबीचे काम झाले असले तरी उर्वरीत पुरे करावयाचे आहे. नदीचे रुंदीकरण व खोलीकरणासंदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती, राज्य कार्यकारी समिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तांत्रिक मूल्यमापन समिती यांच्या बैठका झाल्या. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून 15व्या वित्त आयोगामार्फ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचेही खोलीकरण व रुंदीकरण या कामांसाठी 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सीना नदी व भिंगार नाल्याचे भाग्य त्यामुळे उजाळणार आहे. नगरमध्ये विकास कामांचा महासंग्राम कोरोना काळात नगर शहरातील विकास कामे काही प्रमाणात थांबली होती. परंतु, त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध कामांसाठी भरीव निधी आणला. या निधीतून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी मिळाल्यामुुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. तसेच सीना नदी, भिंगारनाला सुशोभिकरणासाठी 20 कोटींचा निधी मिळाल्याने नगर शहराचे रुपडे बदलणार असल्याचे दिसून येत आहे. सीना नदी अतिक्रमणमुक्त होणार सीना नदी पात्रातील अतिक्रमण व गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते. यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरलेे. पुराच्या पाण्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणीही केली होती. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याची आ. जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत सीना नदी सुशोभिकरण व अतिक्रमण मुक्त, रुंदीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. याबाबत आ. जगताप तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. सीना नदीतील गाळ व अतिक्रमणे काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय मार्गी नागपूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठागणे मळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन भाग, पुणे महामार्ग, फुलसौंदर मळा, बाबर मळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा विषय माग लागत नव्हता. परंतु, आमदार संग्राम जगताप यांच्या अथक प्रयत्नानंतर सीना नदी लगत असलेल्या पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय माग लागला आहे. त्यामुळे जागा मालकांना आता जागा डेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर Read More »

Iran-Israel Conflict : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एन्ट्री, ‘या’ देशाला दिला पाठिंबा

Iran-Israel Conflict :  इराणने इस्रायलला मोठा धक्का देत 400 मिसाईलने इस्रायलवर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलला मोठा नुकसान झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलला आपला पाठिंबा देत इराणला इशारा दिला आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की आज, माझ्या निर्देशानुसार, युनायटेड स्टेट्स सैन्याने इस्रायलच्या संरक्षणास सक्रियपणे पाठिंबा दिला आणि आम्ही अजूनही परिणामांचे मूल्यांकन करत आहोत. हा इस्रायलच्या लष्करी क्षमतेचा आणि अमेरिकन लष्कराचा दाखला आहे.   अमेरिकेचा इस्रायलला पूर्ण पाठिंबा आहे. मी सकाळ आणि दुपारचा काही भाग माझ्या संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षा दलासह आणि इस्रायली लोकांशी सल्लामसलत करण्यासाठी सिच्युएशन रूममध्ये घालवला. राष्ट्रीय सुरक्षा दल इस्रायली अधिकारी आणि त्यांच्या समकक्षांच्या सतत संपर्कात आहे. मध्यपूर्वेतील घडामोडींवर अमेरिका लक्ष ठेवून आहे – बिडेन दरम्यान, इराणने इस्रायलवर केलेल्या बॅलेस्टिक मिसाईल हल्ल्यानंतर जो बिडेन म्हणाले की, अमेरिका मध्यपूर्वेत घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून आहे आणि इस्रायलच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. बिडेन म्हणाले की, उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि मी आमच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमशी बोललो आहोत की अमेरिका या हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास आणि तेथील अमेरिकन कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यास अमेरिका मदत करण्यास तयार आहे का. बिडेन यांनी आपल्या मुद्याचा पुनरुच्चार करत आम्ही पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी असल्याचे सांगितले. इराणी हल्ल्यादरम्यान, बिडेन यांनी अमेरिकन सैन्याला इराणी मिसाईल पाडण्याचे आदेश दिले. अमेरिकेने या प्रदेशात आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. त्याच वेळी, वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्र मंत्रालयात भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीपूर्वी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, इराणने 5 महिन्यांच्या कालावधीत दुसऱ्यांदा इस्रायलवर थेट हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हे अस्वीकार्य आहे आणि संपूर्ण जगाने त्याचा निषेध केला पाहिजे.

Iran-Israel Conflict : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एन्ट्री, ‘या’ देशाला दिला पाठिंबा Read More »