DNA मराठी

Kopargaon Election

kopargaon election

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

Kopargaon Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे आज नगरपालिका व नगरपंचायत व नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. मतदान केंद्रावरच कार्यकर्ते भिडल्याने एकच गोंधळ उडाला मात्र तातडीने प्रशासनाने मध्यस्थी करत हा वाद सोडवला असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतच्या अध्यक्ष व सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा , नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान कोपरगावमध्ये दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे नेमकं काय घडलं? माहितीनुसार, नगर परिषदेच्या निवडणुकीचे साठी आज कोपरगावात मतदान प्रक्रिया पार पडत आहे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट युतीमधीलच घटक पक्षांमध्ये सामना पाहायला मिळत आहे मात्र मतदानापूर्वीच दोनही पक्षातील कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेरच एकमेकांशी भिडले. एका मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपचे लोक मतदारांवर ती दबाव आणतायेत की भाजपला मतदान करा असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून हाकलून लावले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे काळे कोल्हे संघर्ष कोपरगावमध्ये काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळाला यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयते तर विवेक कोल्हेगाटाकडून परागसंधान यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली त्यामुळे कुठेतरी काळे कोल्हे संघर्ष पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळणार हे नक्की होते. दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीकाटिप्पणी ही जोरदार पाहायला मिळाली आज मतदानाच्या दिवशी सकाळीच एका मतदान केंद्रावर काळे व कोल्हे गट एकमेकांशी भिडले प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणारे यामुळे निकालापूर्वीच या ठिकाणचे राजकारण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील आता चांगला संघर्ष पाहायला मिळतोय.

Kopargaon Election : कोपरगाव निवडणूक; राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले Read More »

election

Maharashtra Election: कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक‌ : प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; 69 मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त

Maharashtra Election : कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया होईल. ही प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, सुहास जगताप आदी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी सकाळी ठीक ६:३० वाजता सर्व मतदान केंद्रांवर ‘मॉक पोल’ (चाचणी मतदान) प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारांनी नेमलेल्या मतदान प्रतिनिधींनी विहित नमुन्यातील फॉर्म व दोन रंगीत पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. मतदान प्रतिनिधी संबंधित यादीतील मतदार असणे बंधनकारक आहे. केंद्रात एका वेळी एकाच प्रतिनिधीला उपस्थित राहता येईल. मतदानासाठी मतदारांजवळ निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र (Original ID) सोबत असणे अनिवार्य आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात, तसेच केंद्राच्या आत मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा मतदार यांनी आपले मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवूनच केंद्रात प्रवेश करावा. प्रचार कालावधी संपल्याने आज रात्री १० वाजेपर्यंत उमेदवारांनी सर्व होर्डिंग्ज, बॅनर्स, प्रचार साहित्य स्वतःहून काढून घ्यावे. त्यानंतर आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. शहरातील सर्व ६९ मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी १ पोलीस उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक, ९ पीएसआय, १० मोबाईल व्हॅन्स, १२९ पोलीस कॉन्स्टेबल व ७४ होमगार्ड्स तैनात असतील. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. मतदान संपल्यानंतर २१ डिसेंबर रोजी ‘सेवानिकेतन विद्यालय’ येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून जारी केलेले ओळखपत्र (Pass) असलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल. प्रशासनाने मतदानाच्या दिवशीही सर्व नागरिक, उमेदवार व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Maharashtra Election: कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक‌ : प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; 69 मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त Read More »