DNA मराठी

Kolhapur

samarjeetsinh ghatge

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

Samarjeetsinh Ghatge : कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले की, समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढणार आहे. भाजपाची विचारधारा गावखेड्यात नेण्यासाठी पोषक वातावरण आहे. घाटगे यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. ज्या विश्वासाने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की यापुढे पक्ष सांगेल त्यानुसार चालायचे असे आम्ही ठरवले आहे. पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावात, घराघरात पोहचवू. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, रंजना बापू अस्वले, नगरसेवक दीपक मगर, सभापती शिक्षण समिती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सौ. सारिका बारड, नगरसेविका साधना विष्णू पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासाहेब माळी, मेघा गजानन माने, आनंदा पसारे, विजय राजगिरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैलाश जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांनीही भाजपात प्रवेश केला.

Samarjeetsinh Ghatge : समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश Read More »

samarjit ghatge

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश

Samarjit Ghatge : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कोल्हापूर जिल्यातील कागलचे प्रभावी नेते समरजितसिंह घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, उद्या बुधवारी (8 एप्रिल) मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश पार पडेल. या संदर्भात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालया बाहेर घाटगे समर्थकांकडून बॅनर लावण्यात आले आहे. समरजित घाटगे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलला होता. मात्र, आता पुन्हा भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार आहे. घाटगे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश Read More »

kolhapur

Kolhapur News : कोल्हापुरात गोवा बनावटी मद्याचा मोठा साठा जप्त

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटी दारूविरोधी मोहिमेत शाहूवाडी पोलिसांनी यशस्वी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेर्ले-बांबवडे रोडवर कापशी गावाजवळ सापळा रचून एका टाटा ट्रकला अडवले. या कारवाईत सुमारे 1 कोटी 64 लाख रुपयांचा गोवा बनावटी ‘सनकी’ ब्रँडचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ट्रकसह एकूण 1 कोटी 79 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रकचालक संतोष बंडू पेटकर याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत मध्यप्रदेशातील असीम अब्दुल्ला शेख याचा सहभाग उघड झाला. त्यानंतर शेखलाही अटक करण्यात आली आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले की, “मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सर्व मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.”

Kolhapur News : कोल्हापुरात गोवा बनावटी मद्याचा मोठा साठा जप्त Read More »

माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले

Devendra Fadnavis: माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये आणण्याचे कोर्ट आदेश देईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात माधुरी हत्तीण आणि वनतारा मुद्दा गाजत असताना आता पुन्हा एकदा माधुरी हत्तीण राज्यात परतणार आहे. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते, त्यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितले की, माधुरी हत्तीणीवर हक्क सांगायची आमची कुठलीही इच्छा नाही. आम्हाला कोर्टाने सांगितल्यामुळे आम्ही हे सर्व केले आहे. त्यानंतर मी त्यांना सांगितले जर असे असेल, तर तुम्ही देखील आमच्यासोबत सुप्रीमकोर्टमध्ये जॉईन झाल पाहिजे, आपण जॉईंटली कोर्टाला विनवणी करू की, माधुरी हत्तीण तेथेच कोल्हापूरमध्ये नागणी मठ मध्ये एक रेस्क्यू सेंटर तयार करून ठेवू. हायपावर कमिटीने जे निर्देश दिले आहेत. त्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या सोयी तेथेच करू, तेथेच तो माधुरी हत्तीणीला आणू, तुम्ही त्याला समर्थन द्या. अशी मागणी केली. त्याला त्यांनी समर्थन दिले आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जर कोर्टाने तसा निर्णय दिला, कोर्ट तसा निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर सर्व तयार करून द्यायला तयार आहेत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर कबूतरखाना प्रकरणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे वाटते की तिकडे आस्था आहे, लोकभावना आहे. आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे, दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल. आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. काही मार्ग आम्हाला सुचलेले देखील आहे.ते आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची जी परंपरा आहे. तीदेखील खंडित होणार नाही, आणि आरोग्याचे ही प्रश्न निर्माण होणार नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माधुरी हत्तीण कोल्हापूरमध्ये परतणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले Read More »