DNA मराठी

Jalna municipal corporation election

shrikant pangarkar

Shrikant Pangarkar : मी निर्दोश, गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही ; श्रीकांत पांगारकर

Shrikant Pangarkar : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महानगर पालिकेत नगरसेवक पदी निवडून आल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जालना महापालिका निवडणुकीत श्रीकांत पांगारकर यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याठिकाणी श्रीकांत पांगारकर विजयी झालेत. गौरी लंकेश यांची सप्टेंबर 2017 मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणात श्रीकांत पांगारकर  संशयित म्हणून अटकेत होते. न्यायालयाने सप्टेंबर 2024 मध्ये श्रीकांत पांगारकरना जामीन मंजूर केला होता.. त्यांनतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या जालना महानगरपालिका निवडणुकीत पांगारकर यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली. या निवडणुकीत श्रीकांत पांगारकर विजयी झालेत. दरम्यान गौरी लंकेश हत्या प्रकरणात मी निर्दोश आहे. म्हणून माझा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया पांगारकर यांनी दिलीये. जालना महापालिकेसाठी पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत भाजपने 41 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप महापौरासाठी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Shrikant Pangarkar : मी निर्दोश, गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही ; श्रीकांत पांगारकर Read More »

jalna election

Jalna Election: पहिल्याच निवडणुकीत जालना महापालिकेवर भाजपचा झेंडा; 41जागांवर मारली बाजी

Jalna Election : नव्याने झालेल्या जालना शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या महापालिकेवर तब्बल 41 जागा मिळवत भाजपने इतिहासात पहिल्यांदाच आपला झेंडा रोवला आहे. जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मनसेची युती करत 55 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे सेना यांनी महाविकास आघाडी कायम ठेवत निवडणूक लढविली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे सेनेला या महापालिकेत आपले खातेही उघडता आलेले नाही तर मनसेची ही अवस्था यापेक्षा वेगळे राहिलेली नाही. या संपूर्ण जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना तसेच काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढती झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या त्यात भाजपाच्या उमेदवारांची सरशी झाली. जालना महापालिकेचा पहिला महापौर भाजपाचा होणार असल्याने जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांचे वजन पक्षश्रेष्ठींकडे आपसुकच वाढले आहे. या निवडणुकीत भाजपला 41 जागा, शिवसेनेला 12 काँग्रेसला 09, एमआयएमला 02 आणि अपक्ष 01 जागी निवडून आला आहे. या निवडणुकीत एकूण स्थिती पाहता भाजपने महापालिकेत एक हाती सत्ता मिळविल्याचे दिसून येत आहे.

Jalna Election: पहिल्याच निवडणुकीत जालना महापालिकेवर भाजपचा झेंडा; 41जागांवर मारली बाजी Read More »