DNA मराठी

Iraq

Donald Trump

Donald Trump: 23 वर्षांनंतर इराकमधून अमेरिकन सैन्याची माघार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमधील अमेरिकन लष्करी मोहिमेला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सप्टेंबरअखेरपर्यंत अमेरिकेचे उर्वरित सर्व सैनिक इराकमधून माघारी बोलावले जाणार आहेत. 2003 मध्ये सद्दाम हुसेन यांच्या राजवटीविरोधात सुरू झालेल्या लष्करी कारवाईनंतर तब्बल 23 वर्षांनी अमेरिकेची इराकमधील सैन्य उपस्थिती संपुष्टात येणार आहे. व्हाईट हाऊसमध्ये इराकचे पंतप्रधान अली अल-झैदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. “इराकमध्ये आता अमेरिकन सैन्याची गरज उरलेली नाही. दोन्ही देशांतील संबंध आता आर्थिक आणि विकासात्मक सहकार्यावर आधारित असतील,” असे ट्रम्प यांनी सांगितले. इराकचे पंतप्रधानांनीही 30 सप्टेंबरपर्यंत सर्व अमेरिकन सैनिक देशाबाहेर जातील, मात्र अमेरिकन कंपन्या इराकमध्ये कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले. अमेरिकेने 2003 मध्ये इराकवर आक्रमण करून सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवून टाकली होती. त्यानंतर दहशतवादविरोधी कारवाया, इस्लामिक स्टेट (ISIS) विरोधातील मोहिमा आणि इराकी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकन सैन्य दीर्घकाळ तैनात होते. 2024 मध्ये झालेल्या अमेरिका-इराक करारानुसार सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार सुरू झाली होती आणि आता ती पूर्ण होणार आहे. सध्या उर्वरित अमेरिकन सैनिक मुख्यत्वे सल्लागार आणि प्रशिक्षणाच्या भूमिकेत कार्यरत आहेत. या निर्णयामुळे मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी धोरणात मोठा बदल होणार असून, अमेरिका आणि इराक यांच्यातील संबंध आता प्रामुख्याने आर्थिक, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रांवर केंद्रित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Donald Trump: 23 वर्षांनंतर इराकमधून अमेरिकन सैन्याची माघार; ट्रम्प यांची मोठी घोषणा Read More »

strait of hormuz

Strait of Hormuz : आनंदाची बातमी! भारतासह हॉर्मुझमध्ये ‘या’ देशांच्या टँकर्सवर निर्बंध नाहीत

Strait of Hormuz : अमेरिका, इस्राईल आणि इराण दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धात भारतासाठी इराणकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने मोठा निर्णय घेत पाच मित्र भारतासह पाच देशातील टँकरला हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तून जाण्याची परवानगी दिली आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनी स्पष्ट केले की, धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली ही सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. त्यांनी जाहीर केले की, भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना या मार्गावरून सुरक्षित मार्ग (safe passage) उपलब्ध करून दिला जाईल. अराकची यांच्या माहितीनुसार, या देशांनी इराणकडे तशी विनंती केली होती त्यानंतर परस्पर समन्वयाच्या आधारे ही परवानगी देण्यात आली. हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी इराणचे उप-परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनी सांगितले की, भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या देशांनी सुरक्षित मार्गाची मागणी करत इराणशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर समन्वयाच्या प्रक्रियेद्वारे त्यांना ही परवानगी मंजूर करण्यात आली. शत्रू राष्ट्रांसाठी मार्ग बंद अराकची म्हणाले, “आम्ही सध्या युद्धसदृश परिस्थितीत आहोत. त्यामुळे, आमच्या शत्रू राष्ट्रांच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्याचे कोणतेही औचित्य उरत नाही.” त्यांनी पुढे सांगितले, “अनेक जहाज-मालकांनी किंवा ज्या देशांची ही जहाजे आहेत त्या देशांनी आमच्याशी संपर्क साधून, हॉर्मुझमधून त्यांच्या जहाजांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.” “यापैकी काही राष्ट्रांसाठी ज्यांना आम्ही मित्र मानतो किंवा इतर काही विशिष्ट कारणांमुळे आम्ही ज्यांना परवानगी देण्याचे ठरवले आहे, अशा प्रसंगी आमच्या लष्करी दलांनी त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य केले आहे. चीन, रशिया, पाकिस्तान, इराक, भारत (भारताची दोन जहाजे काही दिवसांपूर्वीच या मार्गावरून गेली) आणि इतर अनेक देश ज्यामध्ये मला वाटते बांगलादेशचाही समावेश आहेअशी राष्ट्रे आहेत ज्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि समन्वय प्रस्थापित केला. ही व्यवस्था भविष्यातही कायम राहील, अगदी हा संघर्ष संपुष्टात आल्यानंतरही.”

Strait of Hormuz : आनंदाची बातमी! भारतासह हॉर्मुझमध्ये ‘या’ देशांच्या टँकर्सवर निर्बंध नाहीत Read More »