DNA मराठी

FIFA World Cup 2026

fifa world cup

FIFA World Cup 2026 : स्पेनचा विश्वविजेतेपदावर कब्जा; मेस्सीचे स्वप्न भंग, अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत पराभव

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा अतिरिक्त वेळेत पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. न्यू जर्सीतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. निर्धारित 90 मिनिटांत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र अतिरिक्त वेळेच्या 106व्या मिनिटाला फेरान टोरेसने निर्णायक गोल झळकावत स्पेनला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात स्पेनने चेंडूवरील नियंत्रण राखत अर्जेंटिनाच्या बचावफळीवर सतत दबाव ठेवला. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने अनेक अप्रतिम बचाव करत संघाला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र अतिरिक्त वेळेत स्पेनच्या वेगवान हल्ल्यापुढे अर्जेंटिनाची बचावफळी अखेर ढासळली. सामन्याच्या उत्तरार्धात एन्झो फर्नांडेझला रेड कार्ड मिळाल्याने अर्जेंटिनाला 10 खेळाडूंसह खेळावे लागले, ज्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला. या पराभवासह लिओनेल मेस्सीचे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. अनुभवी मेस्सीला स्पेनच्या शिस्तबद्ध बचावापुढे प्रभावी खेळ करता आला नाही. अंतिम शिट्टीनंतर स्पेनच्या खेळाडूंनी जल्लोष केला, तर अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. स्पेनने तब्बल 16 वर्षांनंतर विश्वचषक जिंकत जागतिक फुटबॉलमध्ये पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले.

FIFA World Cup 2026 : स्पेनचा विश्वविजेतेपदावर कब्जा; मेस्सीचे स्वप्न भंग, अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत पराभव Read More »

spain vs france

Spain vs France : स्पेनचा दमदार विजय; फ्रान्सला पराभूत करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश

Spain vs France : फिफा विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य फेरीत स्पेनने सर्वांना धक्का देत फ्रान्सवर 2-0 असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. अमेरिकेतील आर्लिंग्टन येथे झालेल्या या सामन्यात स्पेनने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत फ्रान्सच्या बलाढ्य संघाला पराभव केले. या विजयासह स्पेनने विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सामन्याच्या 22 व्या मिनिटाला मिकेल ओयारझाबाल याने पेनल्टीवर गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. युवा स्टार लामिन यामाल याच्यावर झालेल्या फाऊलमुळे स्पेनला ही पेनल्टी मिळाली. त्यानंतर 58 व्या मिनिटाला पेद्रो पोरो याने अप्रतिम गोल करत स्पेनची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. फ्रान्सकडे किलियन एम्बाप्पे, उस्मान डेंबेले आणि मायकेल ओलिसे यांसारखे आक्रमक खेळाडू असूनही स्पेनच्या भक्कम बचावफळीसमोर त्यांना गोल करण्यात अपयश आले. या स्पर्धेत स्पेनची बचावफळी सात सामन्यांपैकी सहा सामन्यांत अभेद्य राहिली असून, संपूर्ण स्पर्धेत त्यांनी केवळ एकच गोल स्वीकारला आहे. प्रशिक्षकांच्या अचूक रणनीती आणि युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे स्पेनने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता अंतिम फेरीत स्पेनचा सामना इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे. दुसरीकडे, फ्रान्सला आता तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळावा लागणार आहे.

Spain vs France : स्पेनचा दमदार विजय; फ्रान्सला पराभूत करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश Read More »

jayden adams

Jayden Adams : फुटबॉल विश्वातून एक दुःखद बातमी, अवघ्या 25 वर्षाच्या ‘या’ फुटबॉलरचे निधन

Jayden Adams : फुटबॉल विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) युवा फुटबॉलर जेडन अॅडम्स (Jayden Adams) याचे वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. ॲडम्सने नुकतेच ‘बाफाना बाफाना’ (दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय संघ) कडून फिफा (FIFA) विश्वचषकात खेळण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले होते. त्याच्या निधनामुळे चाहते, सहकारी खेळाडू यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्लब फुटबॉलमध्ये (Club Football) जेडेन ॲडम्सने क्लब फुटबॉलमध्ये ‘ममेलोडी सनडाउन्स’साठी (Mamelodi Sundowns) उत्कृष्ट कामगिरी केली होती. संघाला ‘सीएएफ (CAF) चॅम्पियन्स लीग’चे विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले. विश्वचषकादरम्यानही त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेने बाद फेरीत (नॉकआउट स्टेज) धडक मारून इतिहास रचला होता, परंतू ‘राउंड ऑफ ३२’ मध्ये कॅनडाविरुद्धच्या (Canada) सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. जेडेन याचे मार्गदर्शक ब्रेंडिन जॉन्सन यांच्या मते, विश्वचषकातून (World Cup 2026) परतल्यानंतर ॲडम्स खूप आनंदी होता आणि आगामी हंगामासाठी खुप उत्सुक होता. ‘सीएएफ’ चॅम्पियन बनल्यानंतर तो आपल्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यासाठी तयारी करत होता. जॉन्सन म्हणाले, “गुरुवारी माझी त्याच्याशी दीर्घ चर्चा झाली होती. विश्वचषकातून परतल्यानंतर तो खूप सकारात्मक होता. त्याला माहित होते की त्याच्यासमोर अनेक मोठ्या संधी आहेत. तो फुटबॉलसाठी पूर्णपणे समर्पित होता. झेकियाविरुद्धच्या गट सामन्यात दोन आठवडे आधी त्याच्या आजीचे निधन झाले होते. या दुःखाच्या प्रसंगातही तो देशासाठी मैदानात उतरला”. जेडेन याच्या म़त्यूचे कारण अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. मात्र त्याच्या अचाकन जाण्याने केवळ दक्षिण आफ्रिकेलाच नव्हे तर फुटबॉल विश्वालादेखील मोठा धक्का बसला आहे.त्याने कमी वयात फुटबॉल खेळामध्ये केलेली कामगिरी फुटबॉलप्रेमी कायम लक्षात ठेवतील.

Jayden Adams : फुटबॉल विश्वातून एक दुःखद बातमी, अवघ्या 25 वर्षाच्या ‘या’ फुटबॉलरचे निधन Read More »