DNA मराठी

Election Comission

election

Baramati By Election : राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर; 4 मे रोजी निकाल

Baramati By Election : निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 30 मार्च 2026 (सोमवार) रोजी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2026 (सोमवार) निश्चित करण्यात आली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 7 एप्रिल 2026 (मंगळवार) रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 (गुरुवार) आहे. त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी मतदान पार पडेल. मतदानानंतर 4 मे 2026 (सोमवार) रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 (बुधवार) पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Baramati By Election : राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर; 4 मे रोजी निकाल Read More »

election

Rahuri By Election : राहुरीत लवकरच पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय

Rahuri By Election : विधानसभा सदस्य कै. शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ नुसार या मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येणार आहे. यानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान ठेवण्यात आला आहे. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुख्य  निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Rahuri By Election : राहुरीत लवकरच पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय Read More »

abhijeet bichukale

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका

Abhijeet Bichukale : राज्यात आज 200 पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी मतदान सुरू असून निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता सातारा नगरपालिकेचे अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या 21 तारखेच्या मतमोजणीवर जहाल प्रतिक्रिया व्यक्त केली. आज मतदान झाल्यानंतर निकाल हा 20 दिवसानंतर आहे माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांना प्रत्यक्ष उभा राहिलेल्या सगळ्या अपक्ष पक्षीय उमेदवारांना विनंती आहे निकालाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या जातात त्या ठिकाणी अंथरून पांघरून घेऊन मुक्कामाला जावा भाजप काहीही करू शकतं असं शरद पवारांनी सांगितलं होतं ते खरं ठरू शकत म्हणून ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेला आहे तिथेच मुक्कामी जावा गडबड होण्याची शक्यता आहे मी सेलिब्रेटी म्हणून सांगतोय असं माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले. मतदानाच्या काही तासांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत राज्यातील 24 नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द करून पुढे ढकलले होते मात्र 03 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याने आज उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्य निवडणूक आयोगाला 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे.

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका Read More »