DNA मराठी

DNA Marathi News

Lok Sabha Election: जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत देशाला मिळवून दिली

Lok Sabha Election:  जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला मिळवून दिली आहे देशाचा अभिमान ज्याला असेल त्याने येत्या १३ तारखेला देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत आणि खासदार डॉ.सुजय विखे व्हावेत यासाठी राष्ट्र अभिमान मनात ठेवून मतदान करावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरातून प्रचार रॅली आणि त्‍यानंतर आयोजित केलेल्‍या जाहीर सभेत कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले.  याप्रसंगी माजीमंत्री शिवाजी कर्डिले, डॉ.सुजय विखे पाटील, रावसाहेब चाचा तनपुरे, उत्तमराव म्हसे, नामदेव ढोकणे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, उदयसिंह पाटील, विक्रम तांबे, आर आर तनपुरे, तानाजी धसाळ, सुनील भट्टड, सुरेश बानकर, शामराव निमसे, किशोर वने, विक्रम तांबे, प्रफुल्ल शेळके, देवेंद्र लांबे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी म्‍हणाले की, सत्तर वर्षे ज्यांना देशाचा विकास करता आला नाही ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत आहेत. सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत त्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी देशाला पत आणि प्रतिष्ठा मिळून दिल्‍यामुळेच भारत आज जगाच्या पाठीवर विश्वगुरू म्हणून नेतृत्व करत असून, याचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदी यांना आहे.  खासदार डॉ.सुजय विखे यांनी देखील अहमदनगरचा विकास गतिमान केला असून, त्याचे अनेक उदाहरणे देता येतील. ज्याला राष्ट्र अभिमान आहे त्यांनी पंतप्रधान मोदी व डॉ.सुजय विखे पाटील यांना मतदान करून देशाला पुढे नेण्याचे काम करावे. समोरचा उमेदवार हा बहुरूपी उमेदवार आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका अन्यथा रडत पस्‍तावा करण्‍याची वेळ तुमच्‍यावर येईल असे ते म्‍हणाले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, पाच वर्ष आमदार असताना त्यांना पारनेरचा विकास साधता आला नाही, ते आता जिल्ह्याच्या विकासाची भाषा करत आहेत. मात्र आम्ही गेली सहा वर्ष जनतेच्या बरोबर राहून जिल्ह्याचा विकास साधला आहे. राहुरी तालुक्याने विखे पाटील कुटूंबावर नितांत प्रेम केले आहे. याही निवडणुकीमध्ये हे प्रेम तसेच राहणार आहे. समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्‍याचे काम राहुरीची जनता करणार आहे. खासदार असताना मला विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून धमकी दिली जाते तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न देखील विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. पद्मश्री डॉ.विखे पाटील यांच्‍या नंतर आम्ही काय काम केले असा प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांनी आमच्याबरोबर जिल्ह्यात फिरावे आम्ही काय कामे केली आहेत ते त्‍यांना दाखवून देऊ. राहुरी तालुक्यातील अनेक प्रश्न आम्ही मिटवले, प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालय हे प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिले ते मिटवण्याचे काम आम्ही केले. पारनेरची जनता दहशतीखाली आहे मात्र आम्ही जिल्ह्यात असे होऊ देणार नाही. टक्केवारी खाणारे कोण हे जनता जाणून आहे. नगर-मनमाड रोडमध्ये टक्केवारी खाऊन कामं कोणी बंद पाडले हे जनता जाणून आह.  मंत्री असताना देखील ग्रामीण रुग्णालय देखील उभारता आले नाही, त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार काय असा प्रश्न उपस्थित करुन, ही निवडणूक देश हिताची आहे त्यामुळे जनता कोणत्याही गुंडाला राजकारणात थारा देणार नाही, कारखाना बंद पाडण्याचे पाप करणारे आमच्यावर आरोप करतात हे दुर्दैव असल्‍याचे ते म्‍हणाले.  यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, राहुरी तालुका एक नंबरचे लीड देईल यात शंका नाही. भाजपाच्या माध्यमातून मोठा विकास तालुक्‍यात झाला आहे. नरेंद्र मोदीच तिस-यांना पंतप्रधान होतील व खासदार सुजय विखे हेच होतील यात शंका बाळगण्याचे कारण नाही. संसद बंद पाडण्याची भाषा करणारे लंके यांनी पात्रता तपासावी. मिरची, भाकरी खाताना फोटोसेशन समोरचा उमेदवार करीत आहे.  राहुरी शहराचे अनेक कामे खा.सुजय विखे पाटील, ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गी लावले आहे. भुयारी गटार योजना, प्रशासकीय इमारत त्यांनीच केली. कारखान्याबाबत आरोप होत आहेत मात्र तो चालू करण्यासाठी खा.विखे व मी प्रयत्न केले. चालू केला मात्र त्याचे वाटोळे करण्याचा प्रयत्न कोणी केला, कोणाच्या काळात हे घडले हे राहुरीची जनता जाणून आहे. महावितरणच्या माध्यमातून राहुरीच्या मंत्र्याने वसुलीचे काम केले असून, डॉ.सुजय विखे पाटील तालुक्‍यातून पाच लाखाचा लिड मिळणार असल्‍याचे ते शेवटी म्‍हणाले.

Lok Sabha Election: जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत देशाला मिळवून दिली Read More »

Maharashtra News: आदिवासी समाजाप्रमाणेच धनगर समाजालाही सर्व सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय: माजी खा. विकास महात्मे

Maharashtra News: धनगर समाजामध्ये आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी राज्य सरकारने महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील ढवळपूरी येते सुरू होणारे लोकर प्रक्रिया केंद्र हे रोजगारासाठीचे मुख्य केंद्र ठरेल असा विश्वास माजी खा. विकास महात्मे यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्याने डॉ. महात्मे यांनी धनगर समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधत  मार्गदर्शन केले.  माध्यमांशी बोलताना डॉ. महात्मे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आदिवासी समाजाप्रमाणेच धनगर समाजालाही सर्व सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल. या पुर्वी केवळ आश्वासनाची खैरात धनगर समजाचाला वाटत त्यांची फसवणूक केली.   डॉ. महात्मे म्हाडा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवली त्या वेळेसही धनगर समाजाला मोठ मोठी आश्वासने दिली होती.  राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी लेखी आश्वासन देवूनही समाजाच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीने समाजासाठी काय केले हा प्रश्न कायम आहे.  याउलट राज्यातील महायुती सरकारने नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर असा नामविस्तार केला, सोलापूर विद्यापिठालाही अहिल्यादेवींचे नाव दिले. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देताना स्वयंयोजनेचा लाभ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील ढवळपूरी येथे लोकर प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय हा समाजातील युवकांसाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. यामुळे या जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते सक्रियपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.  डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले याच्या जाहीर सभेचे आयोजन नगर शहरातील मंगलगेट येथे शुक्रवार 10 मे रोजी करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे नेते सुनील साळवी यांनी दिली.

Maharashtra News: आदिवासी समाजाप्रमाणेच धनगर समाजालाही सर्व सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय: माजी खा. विकास महात्मे Read More »

Ahmednagar Politics: जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला

Ahmednagar Politics: जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला. महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून त्यांनी पाणी प्रश्नाबाबत केलेल्या सुचनांचे शासनाकडून धोरणात रुपांतर होणे, हेच त्यांच्या प्रयत्नांचे यश ठरले असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.  शेती, सहकार, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण विकासाचे प्रनेते लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या यांच्या ९२ व्या जयंती दिनाचे ओचित्य साधुन प्रवरा परिवाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. डॉ, सुजय विखे पाटील,जेष्ठ नेते वंसतराव कापरे, भाजपा नेते विनायकराव देशमुख, यांच्यासह विविध संस्थाने पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.  मंत्री विखे पाटील म्हणाले की, बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण विकासाचे धोरण ठेवण्यासाठी प्रत्येक सरकारमध्ये अभ्यास मंडळाच्या माध्यमातून सुचना केल्या. पाणी प्रश्नासाठी ते नेहमीच संवेदनशील राहीले. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करताना नवीन पाणी योजना निर्माण करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून तयार केलेले प्रयत्न शासनाने स्विकारले. पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळवून जिल्हा दुष्काळमुक्त  करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.  शैक्षणिक क्षेत्रात कौशल्य शिक्षणाला प्राधान्य हवे हा विचार त्यांनी प्रथम मांडला. काळाच्या ओघात आज कौशल्य शिक्षणाला आलेले महत्व पाहता बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार किती दुरदृष्टाचा होता हे दिसून येते. आज जिल्ह्यात औद्योगिक वातावरण निर्माण करताना उद्योग क्षेत्राला आवश्यक मनुष्‍यबळ निर्माण करण्यासाठी नगर येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील युवकांना निश्चित लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ahmednagar Politics: जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला Read More »

Lok Sabha Election 2024 : धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती निर्माण करायची नाही

Lok Sabha Election 2024 :  तालूक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीला महायुती सरकरच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच तालूक्यात उद्योजकांचे आगमन होऊन आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार आहे. असे होत असताना नव्याने निर्माण होणारे औद्योगिक क्षेत्र आपल्याला दहशदमुक्त ठेवायचे आहे. धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती आपल्याला निर्माण करायची नाही, असे भावनीक आवाहन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.   श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात मंत्री विखे पाटील यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधला. प्रचार फेरी, व्यक्तीगत गाठीभेटी, वाडीवस्त्यावर बैठका घेवून महायुतीच्या पदाधिकांऱ्यांनी तालुका पिंजून काढला. यावेळी मंत्री विखे पाटील यांच्यासह, विक्रमसिंह पाचपूते, राजेंद्र नागवडे, विनायक देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.  मंत्री विखे पाटील यांनी आपल्या संपुर्ण दौऱ्यात केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देतानाच, जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन केले असल्याचे सांगितले. औद्योगिक आणि तिर्थक्षेत्र विकासातून रोजगार निर्मिती केली जाईल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले.   जिल्ह्यात तीन औद्योगिक वसाहतीसाठी महायुती सरकारने जागांची उपलब्धता करून दिली असून उद्योजक आपल्या जिल्ह्यात येण्यास उत्सूक झाले आहेत. उद्योजक आणि कामगार यांना संरक्षणाची हमी दिल्याने औद्योगिक दृष्ट्या नगर जिल्हा मुख्य व्यापारी केंद्र होईल.  असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.  सुपा औद्योगिक वसाहतीबद्दल सांगताना ते म्हणाले, या वसाहतीतील उद्योजक धाक, दडपशाहीमुळे निघून गेले. औद्योगिक क्षेत्रात ठेकेदारीने हैदोस घातला होता. हे वातावरण आपल्याला श्रीगोंद्यात होऊ द्यायचे नसेल तर लोकसभा निवडणुकीत  मतदान करताना गांर्भीयाने विचार करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या विकासात अडथळे निर्माण करणारे कोण आहेत? ही ओळखण्याची वेळ आता आली आहे. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपला संघर्ष थांबलेला नाही. येणाऱ्या काळात हक्काचे पाणी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

Lok Sabha Election 2024 : धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती निर्माण करायची नाही Read More »

Ahmednagar News: कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक डॉ. बाबासाहेबांना अपमानित केले

Ahmednagar News:  कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक डॉ. बाबासाहेबांना अपमानित केले. या अपमानाचा बदला म्हणूनच आरपीआय कवाडे गटाने महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संविधानाचे रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच होऊ शकेल हा संदेश कार्यकर्ते देत असून आंबेडकरी चळवळीची मत नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीकरिता निर्णायक ठरतील असा विश्वास आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी व्यक्त केला.  पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना गायकवाड म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रा. कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी युती केली. राज्यात महायुतीचे उमेदवार निवडुण आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रियेतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.  देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली. देशातील सर्व घटकांना विविध योजनांच्या माध्यामातून सामाजिक सुरक्षा देण्याचे काम झाले आहे. देशाची प्रगती संरक्षण आणि अधिक विकास मोदींच्या नेृत्वाखालीच होऊ शकतो हा विश्वास सर्व सामान्य मतदारांच्या मनामध्ये आहे.  नगरच्या विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली, भविष्यात हाच विकास पुढे घेवून जाण्यासाठी त्यांना निवडूण आणण्याची भूमिका प्रचाराच्या माध्यमातून मतदारांच्या पुढे मांडत आहोत. याला समाजातील सर्व घटकांचे समर्थन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.  संविधान बचावाचा कॉंग्रेसचा केवळ कांगावा करत असून, याच कॉंग्रेसने डॉ. आंबेडकरांचा पराभव करून त्यांना अपमानीत केले होते. या अपमानाचा बदला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत. राज्यातील महायुती सरकारने लंडन येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहिर केले.  इंदू मिल येथे स्मारक उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे महायुती सरकारच आंबेडकरी चळवळीला न्याय मिळऊन देऊ शकते, ही भूमिका पटल्यामुळेच महायुती बरोबर जाऊन काम करण्याचा निर्णय प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी घेतला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.  या प्रसंगी संपर्क प्रमुख नितीन कसबेकर, जिल्हा सरचिटणीस महेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष नितीन साळवे, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, जेष्ठ नेते सुरेश भिगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड, सांरग पटेकर, शाहिद शेख, संजय साळवे, शहर अध्यक्ष किरण जाधव, महेंद्र साळवे, विलास गजभिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News: कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक डॉ. बाबासाहेबांना अपमानित केले Read More »

Maharashtra News: महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महायुतीच्या सत्तेची गरज

Maharashtra News:  महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीच्या सत्तेची गरज असल्याचे प्रतिपादन महायुचीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. महायुतीच्या काळात सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे वेगवान निर्णय घेतले आहेत. देशात महाराष्ट्रला विकासात पुढे ठेवण्याचे काम सुद्धा महायुती सरकार करत आले आहे असेही त्यांनी सांगितले. ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते.  महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभांना त्यांच्यासोबत जिल्हा बॅंकचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिकाताई राजळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे, कोल्हार, चिंचोडी, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, डमाळवाळी, डोंगरवाडी गावांसाठी आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार डॉ. विखे पाटील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदाद पवार या तीन खंद्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले. गतीमान सरकार म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ मोठे प्रकल्प आणून राज्यातील तरूणांना रोजगार दिले, अनेक भागातील पाण्याच्या योजना, लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री, महात्मा फुले आरोग्य योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना, आपला दवाखाना योजना, रमाई आवास योजना अशा विविध योजना राज्यातील तळागळापर्यंत पोहचविल्या. राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळवणाच्या सोयी सुविधा निर्माण केल्या. शेतकऱ्यांसाठी दुष्काळी योजना आणि इतर योजना राबवून शेतकऱ्यांना बळकटी देण्याचे काम केले. यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  देशात पुन्हा भाजप आणि महायुतीचे सरकार येणार आहे आणि नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतपप्रधान होणार असणार आहे. यामुळे देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आल्यास राज्याचा विकास अधीक जलद गतीने होणार यात कोणतीही शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  यावेळी शिवाजीराव कर्डीले यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की, महायुती सरकार हे लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती अधिक गतीने होणार यात कोणतीही शंका नाही. त्यात महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे विकासाचे व्हीजन आहे. त्यांना संसदेचा चांगला अनुभव आहे. यामुळे स्थानिक प्रश्न सोडविताना त्यांचा जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणणे ही आपली जबाबदारी आहे असे ते म्हणाले.  तर आमदार मोनिका ताई यांनी खासदारांच्या माध्यमातून मागील पाच वर्षात केलेल्या कामांची आणि येणाऱ्या काळात जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कशा पद्धतीने डॉ. विखे काम करतील या बाबत त्यांनी सविस्तर माहिती मतदारांना दिली.

Maharashtra News: महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महायुतीच्या सत्तेची गरज Read More »

Ram Shinde : येणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी एकत्र; मंत्री विखे पाटील आणि आ. शिंदेची ग्वाही!

Ram Shinde : “माझ्या आणि आ.राम शिंदे यांच्‍या मध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नसुन यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित येवून एक विचाराने लढविणार आहोत,” अशी ग्‍वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांनी  आज जामखेड शहरातील चुंभळी येथील जाहीर सभेत दिली.  लोकसभा निवडणूक प्रचाराच्‍या निमित्‍ताने शहरातील जामवाडी, तपनेश्‍वर, मुख्‍य बाजारपेठ, शिवाजी नगर, संताजी नगर, सदाफुले वस्‍ती, आरोळे वस्‍ती आणि चुंभळी येथे नागरीकांच्‍या भेटी घेवून संवाद साधला. केंद्र आणि राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयांची माहीती देवून महायुतीच्‍या उमेदवाराला खंबीरपणे साथ देण्‍याचे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री आ.राम शिंदे, शिवसेना नेते बाबुशेठ टायरवाले, भाजपा नेते विनायकराव देशमुख यांच्‍यासह स्‍थानिक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. चुंभळी येथील कार्यक्रम सुरु होताच, उपस्थितांनी आ.राम शिंदे यांच्‍यावर होत असलेल्‍या अन्‍यायाचा प्रश्‍न उपस्थित केला. आ.शिंदे यांनीच या चर्चेत हस्‍तक्षेप करुन,” मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नाहीत. आपल्‍याला आता महायुतीच्‍याच उमेदवाराचे काम करायचे आहे. या भागातून शंभर टक्‍के मतदान हे महायुतीच्‍या उमेदवारालाच होईल, असे काम करायचे आहे .” असे सांगून त्‍यांनी  हा विषय संपविला. याच विषयाचा उल्‍लेख करुन, मंत्री ना. विखे पाटील यांनीही चुंभळी येथील श्री.मस्कोबा महाराजांच्‍या देवस्‍थानाचा उल्‍लेख करुन, आमच्‍या लोणी बुद्रूक गावाचे ग्रामदैवत सुध्‍दा म्‍हसोबा महाराज आहेत. या देवस्‍थानांच्‍या साक्षीने सांगतो की, “आमच्‍या दोघांमध्‍ये आता कोणतेही मतभेद नाहीत. यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रितपणेच लढविणार आहोत. याबाबत कुणीही मनात संभ्रम ठेवु नये.”

Ram Shinde : येणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी एकत्र; मंत्री विखे पाटील आणि आ. शिंदेची ग्वाही! Read More »

Ahmednagar News: जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला

Ahmednagar News: मागील पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.विविध मंत्रालयाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून  विकास कामांना गती दिली.अडीच वर्षाचा कोव्हीड कालावधी सोडला तर मतदार संघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहीलो. जनतेसाठी केलेल्या कामाचे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्वास  महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यातील संवाद सभेत बोलत होते. महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी  तालुक्यात ठिकठिकाणी संवाद सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. विखे यांच्यासह जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिकाताई राजळे, दिनकरराव पालवे, एकनाथ हटकर, विजय गवळे, साहेबराव गोळे, महादेव कुटे, तसेच भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.  या वेळी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील पाच वर्षात मी जिल्ह्यातील विविध प्रश्नांची उकल केली असून रस्ते, पाणी, उद्योग विकास, पर्यटन, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे, कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील गावागावात विकासकामांसाठी निधीची पुर्तता केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी काम केले आहे.मला जिल्ह्याच्या विकासासाठी काय करावे लागणार याची जाण आहे.  येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, तरूणांच्या हाताला काम देणे, शिक्षणसाठी सुविधा उभ्या करणे, अत्याधुनिक  आरोग्य सुविधा निर्माण, पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे अशी विविध कामे करण्याचा आपला मानस त्यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपला गाढा विश्वास असून नगरकरांच्या हितासाठी त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  शिवाजीराव कर्डीले यांनी सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी खासदार यांच्या कार्याचा गौरव करत, वांभोरी चाळीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला. तसेच येणाऱ्या काळात खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने वांभोरी चाळीच्या पाईपलाइनच्या  नुतनिकरणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले.  तर आमदार मोनिकाताई राजळे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात दिलेल्या कामांची आश्वासने पुर्ण केली आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळला असून येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील हे सत्तेत असणे आवश्यक आहेत. यामुळे येत्या १३ मे ला नगर जिल्ह्यातील एक सुशिक्षित आणि सामान्य नागरिकांची कळकळ असलेला खासदार आपल्याला पाठवायचा आहे. यामुळे कमळाचे बटन दाबून त्यांना भरगोस मतांनी विजयी करा असे त्यांनी सांगितले.  

Ahmednagar News: जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला Read More »

Maharashtra News: आमदार असताना शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले? सुजय विखेंचा परखड सवाल

Maharashtra News:  महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावने पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले. त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी कितीवेळा  विधानभवना बाहेर आंदोलने केली असा परखड सवाल त्यांनी विचारला.  महायुतीच्या वतीने नगर तालुक्यातील कामरगाव येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ संवादसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.  डॉ. सुजय विखे आता पर्यंत कुणावरही टिका न करता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या आपल्या विकास कामाच्या जोरावर आपल्या प्रचाराची दिशा ठेवली होती. मात्र सातत्याने विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करत निवडणुकीचे वातावरण गढुळ केल्याने त्यांना चोख उत्तर त्यांनी या सभेतून दिले आहे. डॉ. विखे म्हणाले की, विरोधकांकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत. त्यांची भाषणे काढून बघा त्यात एकही विकासाचा मुद्दा नाही, तुमच्या मुलांना उज्वल भवितव्य देण्याची एकही घोषणा नाही. कांदा प्रश्नावर आजतयागत त्यांनी कधीही आवाज उठवला नाही. त्यांनी केवळ खासदारकीच्या तिकीटासाठी राजीनामा दिला. हाच राजीनामा त्यांनी जर दुधाच्या प्रश्नावर, कांद्याच्या प्रश्नावर दिला असता तर आम्ही त्यांचा सत्कार केला असता असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.   केवळ लोकांची सहानभूती मिळविण्यासाठी नौटंकी करण्याचे काम त्यांनी चालवले आहे. जनतेला आता त्यांचे सर्व कारणामे माहित पडले असून येत्या १३ मे रोजी जनता त्यांना चांगलाच धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

Maharashtra News: आमदार असताना शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले? सुजय विखेंचा परखड सवाल Read More »

PM Modi: पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील

PM Modi: देशात पंतप्रधान मोदींचीच हवा असून त्यांच्या विकासाचा विश्वमेध कुणी रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, कितीही विरोध केला तरी देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वातावरण आहे आणि जनतेना त्यांच्याच बाजूने कौल देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  येत्या ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगर जिल्ह्यात येणार आहे. त्यांच्या सभेची जय्यत तयारी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादीचा मेळावा सुरू असताना महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या प्रचार सभांची गती वाढवली आहे. महायुतीच्यावतीने शेवगांव तालुक्यातील घोटन येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले याच्यासह, नरोडे काका, अंबादास कळमकर, संजय कोळगे, बबन भुसारी आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी आणि भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. विखे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाचा गतीमान विकास केला आहे. अनेक योजनांच्या मार्फत त्यांनी तळागळातील लोकांचा विकास करून दाखविला असून ३० कोटीहून अधिक लोकांना गरिबीतून मुक्त केले. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली आहे. यामुळे देशा परदेशातून अनेक नामांकित कंपन्या भारतात गुंतवणुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंरराष्ट्रीय संबंध मजबूत केले. यामुळे आज जगात भारताचा डंका वाजत आहे. येणाऱ्या काळात विकसीत भारताचे स्वप्न त्यांनी देशाला दिले आहे. यामुळे मोदींच्या हमीवर देशातील नागरिकांचा विश्वास असल्याने तिसऱ्यांदा त्यांनाच पंतप्रधान पदावर बसविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुमचे प्रत्येक मत हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. यामुळे विचारपुर्वक मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.  आमदार चंद्रशेखर घुले यांनी सुद्धा कार्यकत्यांना संबोधित केले, आ. घुले यांनी सांगितले की, देशाला कणखर नेतृत्व देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशात कुठलाही पर्याय नाही. यामुळे महायुतीचा उमेदवाराला विजयी करणे आवश्यक आहे. खा. डॉ. सुजय विखे ह्यांनी मागील पाच वर्षात आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. यामुळे नगरच्या विकासासाठी ते पंतप्रधान मोदींच्या टीम मध्ये आवश्यक आहे. यामुळे येत्या १३ मे रोजी कमळाचे बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

PM Modi: पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील Read More »