DNA मराठी

Crime

crime

Sambhajinagar Crime: नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा तिच्याच दुसऱ्या नवऱ्याने भर दिवसा गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पूजा गवांडे असे मृत महिलेचे नाव आहे. ती पंपावर काम करत असताना सत्यम गवांडे याने धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिचा निर्घृण खून केला. माहितीनुसार, पूजाचे यापूर्वी एक लग्न झाले होते आणि तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर काही महिन्यांपूर्वी तिने सत्यम गवांडे याच्यासोबत आळंदी येथे विवाह केला होता. मात्र, लग्नानंतर दोघेही एकत्र राहत नव्हते. सत्यम गवांडे याला दुसरे लग्न करायचे असल्याने तो पूजाकडे सोडचिठ्ठी देण्याचा तगादा लावत होता. मात्र, पूजाने यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक, ग्रामीण यांनी दिली.

Sambhajinagar Crime: नवऱ्याकडून पत्नीचा पेट्रोल पंपावर गळा चिरून खून Read More »

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक

Ahilyanagar Crime : नगर जिल्ह्यातील जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. 1 जून) रात्री 10 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. यामधील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री 10 वाजता विंचरणा नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय 20, रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. गोळीबारात कुणाल जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपास यंत्रणा कार्यरत केली. हा गुन्हा प्रभू रायभान भालेकर (राहणार संभाजीनगर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. हे आरोपी नेवासा मार्गाने जात असल्याचे समजतच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन प्रभू रायभान भालेकर, नकुल विष्णु मुळे, शरद अंकुशराव शिंदे, गणेश गोविंद आरगडे, रावबहादुर श्रीधर हारकळ, सुशील ताराचंद गांगवे अशांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत या घटनेतील सहा आरोपींना तत्काळ अटक केली आहे. या आरोपीने मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास जामखेड पोलीस करत आहे.

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक Read More »

Ahmednagar News: जमिनीच्या किरकोळ वादातून शेतकऱ्यांचे अपहरण अन् बेदम मारहाण

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील कांबी येथील शेतकरी नशिर शेख यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शेतीच्या किरकोळ वादातून बेदम मारहाण करण्यात आली आहे. शुक्रवारी दि. 21 रोजी रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास गावातीलच अलीम बन्नोमियाॅ शेख व दोन अनोळखी व्यक्तींनी शेतीच्या किरकोळ कारणामुळे नशिर शेख यांच्यासह कुटुंबीयातील महिलांना जबर मारहाण करून नशीर शेख यांना राहत्या घरातून बळजबरीने चार चाकी वाहनातून अपहरण करुन आज्ञात ठिकाणी नेऊन लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने व डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण करून रक्तबंबाळ अवस्थेत शेवगाव-पाथर्डी रोडवर अपरात्री आज्ञातस्थळी  सोडून देऊन मारेकरी निघून गेले.  या प्रकरणात  फिर्याद जखमी नशिर शेख यांचा मुलगा आजिम नशिर शेख यांनी शेवगाव पोलिसात दिली असून आरोपी अलीम बन्नोमियाॅ शेख यांच्यासह दोन साथिदारावर भारतीय दंड संहिता कलम ४५२, ३६५, ३६७, ३४, ३२३ अंतर्गत शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सदर घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Ahmednagar News: जमिनीच्या किरकोळ वादातून शेतकऱ्यांचे अपहरण अन् बेदम मारहाण Read More »