DNA मराठी

Congress

Lok Sabha Election Result: राज्यात काँगेस ‘रिटर्न’! महायुतीला धक्का, भाजपची वाढणार धाकधूक?

Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे. राज्यात महाविकास आघाडीने 30 पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपच्या 400 पार मिशनला ब्रेक दिला आहे.  मात्र दुसरीकडे देशासह महाराष्ट्र मध्ये देखील काँग्रेसने पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करत तेरा जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला भाजप पेक्षा चार जागा जास्त मिळाले आहे त्यामुळे राज्य सर्वाधिक खासदार असणारा पक्ष काँग्रेस ठरला आहे.   गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजपच्या खासदारांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने 13 जागांवर मजल मारली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 45 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र त्यांना फक्त 17 जागा मिळाले आहे.  महाराष्ट्रात भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत, ज्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात जिंकलेल्या 23 जागांपेक्षा खूपच कमी आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाआघाडीतील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे) 7 जागा जिंकल्या असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामतीत पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्रात काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत, तर 2019 मध्ये काँग्रेसने चंद्रपूरची एकमेव जागा जिंकली होती. शिवसेना (UBT) 9 जागा जिंकल्या आहेत आणि NCP (शरदचंद्र पवार) 8 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी तिकीट न मिळाल्याने सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजयी झाले. महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अविभाजित शिवसेना एकत्र लढले आणि 41 जागा जिंकल्या. भाजपने 25 उमेदवार उभे केले, त्यापैकी 23 विजयी झाले. तर भाजपचा तत्कालीन मित्रपक्ष शिवसेनेने 23 जागांवर निवडणूक लढवली होती आणि 18 जागा जिंकल्या होत्या. तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादीने 4 मतदारसंघ जिंकले होते, तर काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती. मुंबईबाबत बोलायचे झाले तर येथेही सत्ताधारी महायुतीला मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (UBT) मुंबईत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. फडणवीस यांनी पराभवाचे हे कारण सांगितले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर सांगितले की, निवडणुका जिंकल्यानंतर भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला, त्यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या वर्षी नोव्हेंबरपर्यंत होणार आहेत. त्यांनी ‘X’ वर लिहिले की, “पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. एकट्या भाजपने इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीतील जनतेचा जनादेश आहे तसा स्वीकारला पाहिजे. आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू आणि पुढील विधानसभा निवडणुकीत आमचे नुकसान भरून काढू.

Lok Sabha Election Result: राज्यात काँगेस ‘रिटर्न’! महायुतीला धक्का, भाजपची वाढणार धाकधूक? Read More »

BJP News: जनता दल से. यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा

BJP News: महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा वाढता जनसंपर्क पाहता विविध सामाजिक संघटना, धार्मिक संघटना आणि छोटेमोठे राजकीय पक्ष त्यांच्या समर्थासाठी पुढे येत आहेत. त्यात आता जनता जल सेक्युलर पक्षाची पडली आहे. अहमदनगर जनता दल से. चे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर यांनी सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांना अधिक बळ मिळाले आहे.  सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरचे विद्यमान खासदार असून महायुतीच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार म्हणुन रिंगणात आहेत. मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर ते मतदारांपुढे जात आहेत. महायुतीतील घटक पक्षांची त्यांना साथ मिळाल्याने त्यांची बाजू उजवी असल्याचे दिसून येत आहे. त्यात अनेक स्थानिक सामाजिक, धार्मिक संघटना त्यांना सहकार्य करत आहेत. यामुळे त्यांच्या विजयाचे मार्ग अधिक प्रबळ होत आहेत. त्यात आता जनता दल सेक्युलर जोडीला आल्याने जिल्ह्यातील त्यांचे मताधिक्य वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.  जनता दल से. चे जिल्हाध्यक्ष भगवान बांगर यांनी सांगितले की, सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांना आम्ही आमच्या पक्षाचा पाठिंबा जाहिर केला आहे. त्यासाठी जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांच्याशी पाठिंब्या बाबत चर्चा केली असून त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना हा पाठिंबा पत्राद्वारे घोषित केला आहे. येणाऱ्या काळात सुजय विखे पाटील हे जिल्ह्याच्या विकासासाठी कामे करतील यावर आमचा विश्वास आहे. असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

BJP News: जनता दल से. यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा Read More »

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीची घोषणा मात्र MVA मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच! प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम, आजच निर्णय घ्या नाहीतर….

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केले आहे. देशात यावेळी 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. यासाठी आतापर्यंत अनेक उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली आहे मात्र राज्यात अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाबाबत  निर्णय झालेला नाही.   MVA ने वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना युतीमध्ये सामील होण्याची शेवटची संधी दिली आहे. विरोधी आघाडी MVA मध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP यांचा समावेश आहे.  प्रकाश आंबेडकरांनी जास्त जागांच्या मागणीमुळे एमव्हीएमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचे जागावाटपाचे गणित बिघडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राजकीय तापमान आणखी वाढवले ​​आहे. संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यावर टीका करत काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असा आरोप आंबेडकरांनी आपल्या पत्रात केला आहे. वृत्तानुसार, MVA ने VBA ला आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपला निर्णय कळवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. MVA ने प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला 4 जागा देऊ केल्या आहेत. त्या चार जागा स्वीकारार्ह आहेत की नवीन प्रस्ताव द्यायचा आहे का, हे आजच VBA ला स्पष्ट करण्यास सांगितले आहे.  MVA आज जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकते. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले की, व्हीबीएने आम्हाला 27 जागांची यादी दिली होती, त्यापैकी आम्ही त्यांना चार जागा देऊ केल्या आहेत. त्यांना काय हवे आहे ते त्यांनी सांगावे… त्यांच्यासाठी महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत.

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीची घोषणा मात्र MVA मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच! प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम, आजच निर्णय घ्या नाहीतर…. Read More »

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक मत झालं आहे. MVA ने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून याचा औपचारिक घोषणा दोन दिवसांत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस किमान 10 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तर काँग्रेस लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळतील. उद्धव गट व्हीबीएला दोन जागा देणार आहे. व्हीबीएने पाच जागांची मागणी केली होती.  तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष म्हणून राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार आहे. वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागा लढवणार आहे. त्यापैकी मुंबई नॉर्थ ईस्टची एक जागा व्हीबीएला देता येईल. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष दोन गटात विभागले गेले असून त्यांचा प्रत्येक गट हा बहुतांश आमदारांसह सत्ताधारी महायुतीच्या युतीचा भाग आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करून 23 जागा लढवल्या होत्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले.  शिवसेनेने मुंबईच्या दक्षिण मध्य आणि उत्तर-पश्चिमच्या जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 25 जागा लढवून केवळ चंद्रपूर जिंकले, तर राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चारवर विजय मिळवला.  अविभाजित शिवसेनेने 2019 ची निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती आणि लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. मात्र तत्कालीन शिवसेना आता दोन गटात विभागली गेली आहे. त्यापैकी केवळ 5 खासदार उद्धव यांच्यासोबत आहेत, तर उर्वरित 13 खासदार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आहेत. भाजपसाठी महाराष्ट्र जिंकणे महत्त्वाचे भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. खरे तर, उत्तर प्रदेश (80 जागा) नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे ही दोन्ही राज्ये भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यासाठी विशेष रणनीतीही आखण्यात आली आहे. 2019 मध्ये निकाल कसे लागले? गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. तेव्हा शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसने 25 ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्यांना केवळ एक जागा जिंकता आली. राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चार जागा जिंकल्या. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष व्हीबीएने लोकसभेच्या 48 पैकी 47 जागा लढवल्या होत्या. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. पण व्हीबीएला सुमारे सात टक्के मते मिळाली. त्यावेळी राज्यात भाजपला सुमारे 28 टक्के, शिवसेनेला 23 टक्के, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 16 टक्के मते मिळाली होती. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमला एक टक्क्यांहून कमी मते मिळाली, परंतु औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एआयएमआयएमला यश मिळाले.

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक Read More »

Congress News: काँग्रेसला बसणार मोठा धक्का! बडा नेता सोडणार काँग्रेसची साथ

Congress News:  मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. यामुळे राज्यातील पक्षांना आणि जनतेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचा बडा नेता काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  शुक्रवारी छिंदवाडा येथील जनतेसमोर भाषण करताना कमलनाथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, “माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सत्याचे समर्थन करा. सत्याला साथ द्या.” कमलनाथ यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह यांचे वक्तव्यही समोर आले असून त्यांनी आजवर संघटनेत ज्या पद्धतीने काम केले आहे, ज्या प्रकारे त्यांचे काँग्रेसशी दीर्घ संबंध आहेत, ते पाहता ते काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात जातील, असे मला वाटत नाही. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री मोहन यादव आणि कमलनाथ दोन महिन्यांत तीन वेळा बंद दाराआड भेटले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री मोहन यादव रात्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दोघांची भेट सुमारे तासभर चालली होती. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.  तर दुसरीकडे, कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्यांदरम्यान भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांचेही मोठे वक्तव्य चर्चेत आले आहे. ते म्हणाल्या की, “कमलनाथांनी रामाचा आशीर्वाद घेऊन यावे. विकासावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भाजपमध्ये जावे,” असा सल्ला यांनी दिला आहे.  कमलनाथ काँग्रेसवर नाराज आहेत? काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याने कमलनाथ संतापले होते. खासदार संघटनेतील बदलांवर कमलनाथ खुश नव्हते. राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेसने हजर राहण्यास नकार दिला असताना कमलनाथ यांना ते आवडले नाही.त्यांनी छिंदवाड्यात प्रभू रामाच्या नावाने पत्रके वाटली आणि काँग्रेसच्या मोठ्या कार्यक्रमांपासूनही अंतर ठेवले होते. कमलनाथ यांनी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अशोक सिंह यांच्या उमेदवारीपासूनही स्वतःला दूर केले होते. नकुल नाथ यांनी घेतला ‘हा’ निर्णय  कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरुन काढून टाकले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नकुलनाथ हे छिंदवाड्याचे खासदार असून मागील अनेक दिवसांपासून ते त्यांच्या परिसरात जाऊन लोकांशी संपर्क साधत आहेत.

Congress News: काँग्रेसला बसणार मोठा धक्का! बडा नेता सोडणार काँग्रेसची साथ Read More »

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव

Priyanka Gandhi :  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमीन खरेदीशी संबंधित प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात प्रियांका गांधींचाही उल्लेख आहे. मात्र या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. काय प्रकरण आहे हे संपूर्ण प्रकरण हरियाणातील फरीदाबाद येथील जमीन खरेदीशी संबंधित आहे. माहितीनुसार, 2005-2006 दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी फरिदाबादच्या अमीपूर गावात प्रॉपर्टी डीलर एचएल पाहवा (थम्पीच्या जवळ) मार्फत सुमारे 40.8 एकर जमीन खरेदी केली होती, जी डिसेंबर 2010 मध्ये पाहवा यांना परत विकली गेली. त्याचप्रमाणे एप्रिल 2006 मध्ये याच अमीपूर गावात प्रियंका गांधी वड्रा यांच्या नावावर घर खरेदी करण्यात आले होते, जे फेब्रुवारी 2010 मध्ये पाहवा यांना परत विकण्यात आले. ईडीचे म्हणणे आहे की वाड्रा आणि थंपी यांचे दीर्घ संबंध आहेत आणि समान व्यवसाय करण्याव्यतिरिक्त दोघेही अनेक गोष्टी एकत्र करतात. हा एक मोठा खटला आहे, जो फरारी शस्त्र विक्रेता संजय भंडारीशी संबंधित आहे. रॉबर्ट वड्रा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका नवीन प्रकरणात आरोपी केले आहे ज्यात त्यांनी लंडनमधील एका घराचे नूतनीकरण केले आणि त्यात वास्तव्य केले. संजय भंडारी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात हे घर कथितपणे ‘गुन्ह्याच्या कमाईचा’ भाग आहे. संजय भंडारी 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पळून गेला आणि यूके सरकारने ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या कायदेशीर विनंतीवर कारवाई करत, या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली. या प्रकरणात वाड्रा यांचे नाव प्रथमच समोर आले असून ईडीने निवेदन जारी करून ते सार्वजनिक केले आहे. परदेशात कथित अघोषित संपत्ती असलेल्या व्यक्तींवरील मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी करणे हा या तपासाचा मुख्य उद्देश आहे.  ईडीने या प्रकरणी यूएईस्थित अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यापारी सीसी किंवा चेरुवथुर चकुट्टी थम्पी आणि यूकेचे नागरिक सुमित चड्ढा यांच्याविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे.

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव Read More »