DNA मराठी

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे

Eknath Shinde: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.  यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल शंभर वेळा माफी मागू शकतो, असे म्हटले आहे. यात मागेपुढे पाहणार नाही. असेही शिंदे म्हणाले. शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे आहेत, पण महाराष्ट्राचे थोर व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी पुतळा कोसळल्याने प्रकरण तापत आहे. राज्य सरकारने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली, तर उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात मूक निदर्शने केली. काय म्हणाले एकनाथ शिंदे? अशा स्थितीत आता शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. मी त्याच्या पायाला 100 वेळा हात लावून माफी मागायला तयार आहे. मी माफी मागण्यापासून मागे हटणार नाही. आमचे सरकार त्यांचे  आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करते. महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा, राजकोट किल्ला संकुलात 26 ऑगस्ट रोजी कोसळला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अनावरण केल्यानंतर सुमारे नऊ महिन्यांनी, राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले. भारतीय नौदलाचे विधान हा प्रकल्प भारतीय नौदलाद्वारे चालवला जात असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. शिवरायांचा पुतळा बसवण्याचा प्रकल्प राज्य सरकारच्या समन्वयाने साकारला आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, असे नौदलाने गुरुवारी सांगितले. एका निवेदनात, नौदलाने पुतळ्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार शक्य तितक्या लवकर सर्व उपायांमध्ये मदत करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे Read More »

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न 

Chhatrapati Shivaji Maharaj : आज अहमदनगर महापालिकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न. यावेळी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते.  आपण पुतळे उभारतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार आपल्या मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजे असे मत खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी व्यक्त केलं अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील अहमदनगर महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते  यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, रणरागिणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील, उपमहापौर गणेश कवडे, सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,  अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, सभापती पुष्पाताई बोरूडे, मीनाताई चोपडा, रूपाली वारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती गणेश कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी आभार मानले. प्रशासकाचा कारभार माझ्याकडे यावा नगर शहराला 500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या वैभवात भर घालणार महत्त्वाचा पैलू आहे. मनपाचा प्रशासकीय कारभार माझ्याकडे असल्यास सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू. ज्या शहरात नदी वाहते त्या शहराचा विकास होतो. नगरसेवकांनी छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरकरांच्या बाजूने उभे राहू, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न  Read More »

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी

Ahmednagar Shivaji Maharaj Statue : ऐतिहासिक अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.   या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी पालिका सभागृहात नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केली आहे. तसेच मनपा आयुक्त व महापौर यांना देखील त्यांनी या मागणीचे पत्र दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांचा महापालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे. अहमदनगर महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.21 डिसेंबर) रोजी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन केले आहे.  या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होईल.मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावा यासाठी स्वत:च्या मालकीची जमीन विकून संघर्ष करत आहे. यामुळे ते एक लढवय्ये कार्यकर्ते आहे. आज समाजासाठी सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची भूमिका आहे.

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी Read More »