DNA मराठी

Buldhana News

telangana missing family

Buldhana News : अखेर ‘त्या’ बेपत्ता दाम्पत्याची कार तिसऱ्या दिवशी विहिरीत आढळली!

Buldhana News : तेलंगणा राज्यातून जळगात खान्देशातील लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा तिसऱ्या दिवशी अखेर शोध लागला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडनेर भोलजी उड्डाणपुलानजीक झुडपांनी वेढलेल्या विहिरीत त्यांच्या कारसह मृतदेह २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तेलंगणातील सीतापूरममधील एका सिमेंट कंपनीत कार्यरत पद्मसिंह दामू, पाटील (४९) व त्यांची पत्नी नम्रता (४५) हे एमएच १३ बीएन ८४८३ या कारने डोकलखेडा येथील लग्न सोहळ्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी मार्गस्थ झाले होते. सायंकाळी ६:३० वाजता त्यांचा नातेवाईकांशी शेवटचा संपर्क झाला, मात्र त्यानंतर दोघांचेही फोन बंद येऊ लागल्याने नातेवाइकांत चिंता वाढली. पाटील दाम्पत्य लग्नस्थळी न पोहोचल्याने त्यांच्या महामार्गावरील विविध गावांत चौकशी करण्यात आली पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३१ वाजता त्यांनी बाळापूर टोलनाका पार केल्याचे स्पष्ट झाले, तर शेवटचे ‘लोकेशन’ नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे आढळले. त्यानंतर नांदुरा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली व पोलिसांनी चौकशी सुरु केली. नांदुरा-मलकापूर महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करूनही २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नाही. परिणामी, विविध चर्चांना ऊत आले होते. अखेर सायनलच्या सुमारास वडनेर उड्डाणपुलाजवळील झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत चारचाकीसह पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच वरिष्ठ अधिका-यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यांनतर 3 क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ओम साई फाउंडेशनच्या कार्यकत्यांना विहिरीत उतरवून सायंकाळपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्रथमदर्शनी महामार्गालगत ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी वळण आहे व रस्त्याच्या बाजूलाच १० फुटांवर ती विहीर आहे. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन विहिरीत पडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, हा घातपात आहे का? या बाजूनेही पोलिस तपास करीत आहेत.

Buldhana News : अखेर ‘त्या’ बेपत्ता दाम्पत्याची कार तिसऱ्या दिवशी विहिरीत आढळली! Read More »

bear attacks

Buldhana News : करवंड शिवारात दोघावर अस्वलाचा हल्ला, 2 जण गंभीर जखमी

Buldhana News : ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या करवंड शिवारात शेतात काम करणाऱ्या 2 जणावर अस्वलाने हल्ला केला आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले तर दुसऱ्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरातील शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चिखली तालुक्यातील करवंड शिवारात रोहिदास हंजारी राठोड वय 42 वर्ष हे शेतात फवारणी करत असताना त्यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने अस्वलाने पळ काढला. मात्र पुढे दुसऱ्या शेतात काम करणाऱ्या दत्तात्रय दगडू लहाने वय 52 वर्ष रा. करवंड यांच्यावर देखील अस्वलाने हल्ला केला. यात ते देखील जखमी झाले आहे. दोन्ही जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी रोहिदास राठोड हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे.

Buldhana News : करवंड शिवारात दोघावर अस्वलाचा हल्ला, 2 जण गंभीर जखमी Read More »

buldhana

Buldhana News : आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा

Buldhana News : राज्यात सध्या मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. यातच आता हैदराबाद गॅझेटीयर आणि सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावा अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव, भगिनी, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. आपला पारंपारिक पोशाख, नृत्य आणि मागण्या संदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज, रायसिंग महाराज, समाजाचे नेते हरिभाऊ राठोड, संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला. ज्या पद्धतीने मराठा आंदोलनादरम्यान “एक मराठा लाख मराठा” असे घोषवाक्य पाहायला मिळाले, त्याच पद्धतीने “एक गोर, सव्वा लाखेर जोर” हे घोषवाक्य देखील पाहायला मिळालं. सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Buldhana News : आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा Read More »

Nandura Urban Bank : बाबो… राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत मोठा घोटाळा; आरोपी अधिकाऱ्याला अटक

Nandura Urban Bank : राज्यातील सहकारी बँकेत पुन्हा एकदा मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा अर्बन बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे.  या प्रकरणात पोलिसांनी एका अधिकाऱ्याला अटक देखील केली आहे.  नांदुरा अर्बन बँकेत एका अधिकाऱ्याने बँकेची 5 कोटी 45 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलीसांनी तत्काळ या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गजानन शर्मा असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. शर्मा याने बँकेतील    इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली. शर्मा याने बँकेतून मोठ्या प्रमाणात रक्कम इतर बँकांच्या विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा अर्बन बँक ही बुलढाणा जिल्ह्यातील नावाजलेली सहकारी बँक आहे. या बँकेत कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आरोपी गजानन शर्मा याने बँकेत मोठा गंडा घातला. शर्मा यांनी बँकेचे कोट्यवधी रुपये दुसऱ्या बँकेच्या खात्यात वारंवार ट्रान्सफर केले. बँकेतील इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्याने हा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले आहे. बँकेच्या संचालकांना हा प्रकार कळताच त्यांनी त्यांच्याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी शर्माला अटक केली. आतापर्यंतच्या तपासात 5 कोटी 45 ​​लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. दुसरीकडे ही घटना वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर ठेवीदारांना आपले पैसे गमावण्याची भीती वाटू लागली. बँकेत पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, बँक व्यवस्थापनाने ठेवीदारांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे.

Nandura Urban Bank : बाबो… राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत मोठा घोटाळा; आरोपी अधिकाऱ्याला अटक Read More »