DNA मराठी

BMC

bmc election

Raj Thackeray: मुंबईच्या तिजोरीवर खाजगी कंपन्यांचा दरोडा की अधिकाऱ्यांचे संगनमत? मनसेचा महापालिकेला थेट जाब

Raj Thackeray: मुंबई महानगरपालिकेने गेल्या दोन-तीन वर्षांत हजारो कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटचे जे रस्ते चकाचक केले, ते रस्ते आता पुन्हा खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी खोदले जात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. “8 हजार कोटी रुपये खर्चून रस्ते बनवायचे आणि पुन्हा टाटा पॉवरसारख्या कंपन्यांना ते खोदण्याची परवानगी द्यायची, हा कोणता कारभार? मुंबईत ‘बेस्ट’ची वीज असताना टाटा पॉवरला केबल टाकण्याची गरजच काय?” असा खोचक सवाल करत देशपांडे यांनी महापालिकेच्या ‘हितसंबंधांवर’ बोट ठेवले आहे. सदर घोटाळ्याबाबत बोलतांना संदीप देशपांडे म्हणाले की, परवानगी इलेक्ट्रिकल केबलची घेतली जाते, मात्र जमिनीखाली टाटा ऑप्टिकल फायबरचे जाळे विणले जात आहे. एका कामाच्या नावाखाली चार वेगवेगळ्या सेवांचे काम केले जात असूनही महापालिका त्यातून उत्पन्न का मिळवत नाही? जागा पालिकेची, त्रास मुंबईकरांना आणि नफा मात्र खाजगी कंपन्यांना, असे संतापजनक चित्र सध्या मुंबईत दिसत आहे. या गैरप्रकाराकडे लक्ष वेधणारे शाखा सचिव लक्ष्मण पाटील यांचे त्यांनी कौतुक केले असून, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केवळ रस्ते खोदाईच नव्हे, तर महापालिकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरही देशपांडे यांनी चिंता व्यक्त केली. “पुढच्या पाच वर्षांत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पालिकेकडे पैसे उरणार नाहीत, अशी परिस्थिती असताना पाणीपट्टी कमी करण्याच्या लोकप्रिय घोषणा कशाच्या आधारावर केल्या जात आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, ॲमेझॉन आणि ब्लिंकिट सारख्या कमर्शियल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून कर वसुली करावी, अशी मागणीही मनसेने लावून धरली आहे. आयुक्तांच्या नवीन नियमावलीवर टीका करताना, “लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आयुक्तांनी करू नये,” असा इशाराही त्यांनी दिला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भगतसिंग कोशारी यांच्यावर कडाडून टीका करत मोठं वक्तव्य केलं आहे. “भगतसिंग असते तर त्यांना चौपाल असता, ड वर्गाचा माणूस… भगतसिंग यांचं नाव या माणसाला देणं म्हणजे अपमान आहे,” असा घणाघाती आरोप देशपांडे यांनी केला. इतकंच नाही तर, “त्यामुळे भगतसिंग कोशारी यांनी आपलं नाव बदलावं, ही आमची मागणी आहे,” असं स्पष्टपणे सांगत त्यांनी वादाला नवं वळण दिलं आहे. देशपांडेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आगामी काळात यावरून नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटू शकते.

Raj Thackeray: मुंबईच्या तिजोरीवर खाजगी कंपन्यांचा दरोडा की अधिकाऱ्यांचे संगनमत? मनसेचा महापालिकेला थेट जाब Read More »

aaditya thackeray

Aaditya Thackeray: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरे भडकले

Aaditya Thackeray: मुंबईच्या रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आता थेट मुंबईकरांच्या खिशालाच ‘ब्रेक’ लावण्याचे नियोजन सुरू आहे का? असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेकडे ‘कंजेश्चन टॅक्स’ (गर्दी शुल्क) आकारण्याची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या या ‘टॅक्स बॉम्ब’वर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे. ​आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या या प्रस्तावाचा समाचार घेताना विचारले की, मुंबईकडून देशाच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा जातो, मग बदल्यात मुंबईकरांना नवीन करांचा बोजा का? “एकीकडे मुंबईतील उद्योग आणि रोजगार राज्याबाहेर घालवायचे आणि दुसरीकडे इथल्या सामान्य जनतेला नवीन करांच्या जाळ्यात ओढायचे, हा भाजपचा दुहेरी डाव आहे,” असे ठाकरे म्हणाले. याआधीही रस्ते आणि सुशोभीकरणाच्या कामात घोटाळे करून मुंबईची तिजोरी रिकामी करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ​मकरंद नार्वेकर यांनी मांडलेला हा प्रस्ताव म्हणजे भाजपची अधिकृत भूमिका आहे का, असा खडा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. “रस्त्यांची दुरवस्था करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणारी भाजप जनतेला ‘टॅक्स रिफंड’ देणार का? खराब हवामानामुळे आरोग्याचे नुकसान होणाऱ्या मुंबईकरांना भरपाई मिळणार का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपला कोंडीत पकडले. ‘बेस्ट’ बसची संख्या कमी करून खाजगी कंपन्यांचे खिसे भरले जात असताना आता सामान्य वाहनधारकांना लक्ष्य केले जात असल्याने मुंबईत आगामी काळात मोठा राजकीय रणसंग्राम होण्याची शक्यता आहे.

Aaditya Thackeray: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरे भडकले Read More »

eknath shinde

BMC Election : एकनाथ शिंदेंचा भाजपला धाक; मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नवनिर्वाचित नगरसेवकांना सामील करून आपली ताकद वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तीन आणि शरद पवार गटातील एक नगरसेवक शिंदे गटात अधिकृतपणे सामील होण्याची तयारी करत आहेत. हे चार नगरसेवक आता बीएमसीमध्ये संयुक्त विधिमंडळ गट म्हणून स्थापन केले जात आहेत. या नवीन राजकीय समीकरणांतर्गत, महायुती आघाडी बीएमसीमध्ये दोन स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करेल. भाजप स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करेल, तर शिंदे यांची शिवसेना संयुक्त गट म्हणून नोंदणी करेल, ज्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शरद पवार गटातील नगरसेवक एकत्र येतील. या फेरबदलानंतर, बीएमसीमध्ये शिंदे सेनेची संख्या 29 वरून 33 पर्यंत वाढेल. शिवसेनेच्या गटातील नगरसेवकांची संख्या वाढल्याने बीएमसीमधील नेतृत्व आणि महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचा प्रभाव आणखी मजबूत होईल. दरम्यान, महायुती आघाडीची एकूण संख्या आता 122 नगरसेवकांपर्यंत पोहोचली आहे. भाजपचा वाढता दबाव बीएमसीमध्ये वाढत्या शिवसेना (शिंदे गट) गटामुळे त्यांच्या मित्रपक्ष भाजपची चिंता वाढली आहे. नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने, बीएमसी धोरणात्मक निर्णयांवर आणि नेतृत्वावर शिंदे गटाचा प्रभाव आणखी मजबूत होईल. बीएमसी महापौरपद आणि स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्वावरून दोन्ही पक्षांमध्ये आधीच संघर्ष सुरू आहे. वाढत्या ताकदीमुळे, शिंदे सेना आपला दावा अधिक आक्रमकपणे मांडू शकते, ज्यामुळे भाजपच्या एकतर्फी वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. मुंबई बीएमसी निवडणुकीत या वर्षीचा जनादेश भाजप युतीसाठी ऐतिहासिक ठरला आहे. महायुतीने प्रचंड विजय मिळवला आणि ठाकरे कुटुंबाची जवळजवळ तीन दशकांची पकड मोडून काढली. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने एकूण 118 जागा जिंकल्या, त्यापैकी एकट्या भाजपने 90 जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष बनला. शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी (यूबीटी) ही निवडणूक निराशाजनक ठरली. पक्षाला मागील निवडणुकीत 84 जागांवरून 65 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) उद्धव सेनेसोबत युती करून 53 जागा लढवूनही केवळ सहा जागा मिळाल्या.

BMC Election : एकनाथ शिंदेंचा भाजपला धाक; मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र Read More »