DNA मराठी

BJP

Gyanesh Kumar

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार

Gyanesh Kumar : देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असहमती व्यक्त केली आहे आणि यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा हवाला दिला आहे. त्याचबरोबर या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. ते 19 फेब्रुवारीपासून पदभार स्वीकारणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल. त्यांच्या जागी डॉ. विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत निवड समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ज्ञानेश कुमार कोण आहेत?ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली. याआधी त्यांनी गृह मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांची गणना एक अनुभवी आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून केली जाते. राहुल गांधींनी व्यक्त केली असहमतीराहुल गांधी यांनी या नियुक्तीबाबत असहमती व्यक्त करत सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालय 19 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे, त्यामुळे सरकारने ही बैठक पुढे ढकलायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज पडू नये म्हणून सरकारने जाणीवपूर्वक ही प्रक्रिया लवकर पूर्ण केली असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी आणि गुरदीप सप्पल यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि कार्यकाळ) कायदा, 2023 ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन?काँग्रेसचा आरोप आहे की सर्वोच्च न्यायालयाने 2 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती असावी. परंतु, नवीन कायद्यात सरन्यायाधीशांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले, ज्यामुळे सरकारला बहुमत मिळाले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “जर नियुक्तीची प्रक्रिया केवळ कार्यकारी मंडळ (सरकार) द्वारे असेल, तर त्यामुळे आयोग पक्षपाती होईल आणि निवडणूक व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.” निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात ?विरोधकांचा दावा आहे की सरकारने असा निवडणूक आयुक्त नियुक्त केला आहे जो कधीही सरकारच्या विरोधात जाणार नाही. ते म्हणतात की जर ही निवड प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर त्याचा निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावर आणि निष्पक्षतेवर दीर्घकालीन परिणाम होईल.

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार Read More »

Ajit Pawar

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय?

Ajit Pawar: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर अनेकगंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांची भेट नाकारली आहे. आमदार सुरेश धस आज अजित पवारांची भेट घेणार होते मात्र अजित पवारांनी भेट नाकारली आहे. त्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. माहितीनुसार, सुरेश धस या भेटीमध्ये 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते मात्र आज त्यांना अजित पवारांची वेळ मिळाली नाही. तर दुसरीकडे अजित पवार यांनी चौकशी समितीला फक्त 2023-2024 या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना 2019 ते 2023 काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे अजित पवार यांची भेट घेऊन सुरेश धस चौकशीची मागणी करणार होते.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय? Read More »

Suresh Dhas

Suresh Dhas : जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सुरेश धसांचा टोला

Suresh Dhas: मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना लावला आहे. माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही.या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही बोललो पाच लाखाची मदत दहा लाखाची करून दिली. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे प्रकरणात माझी भूमिका एकच आहे. असं सुरेश धस म्हणाले. तसेच माझ्यासोबत दलित बांधव असतात, मला कळवळा दाखवायची गरज नाही. माझ्या मतदारसंघातला 95 टक्के दलित बांधव माझ्यासोबत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये. आव्हाड साहेब तुम्ही एकदा तरी सूर्यवंशी कुटुंबीयांशी संपर्क केला का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे माझ्या भगिनी आहेत त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही.  सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यावर मी काहीही बोलणार नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. असेही धस म्हणाले. परळी सोडून गेलेले व्यापारी बोलायला घाबरत आहेत. पंकजा मुंडेंना माझी  विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष राखेवर द्या.परळीत द्या गायरान जमिनी हडप केले आहेत तिथे द्या. असेही या पत्रकार परिषदेत सुरेश धस म्हणाले.

Suresh Dhas : जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सुरेश धसांचा टोला Read More »

Uniform Civil Code

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा

Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार आहे. देशात समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड बनणार आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केले जाईल. हे राज्याबाहेर राहणाऱ्या रहिवाशांना देखील लागू होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी धर्म, लिंग, जात किंवा समुदायाच्या आधारावर भेदभाव न करता सुसंवादी समाजाचा पाया रचेल. यामुळे सर्व लोकांना समान अधिकार मिळतील. कोणाविरुद्धही भेदभाव केला जाणार नाही. आम्ही आमचे वचन पूर्ण करत आहोत. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे हे याचे एक उदाहरण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत उभा आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री धामी यांनी पुष्टी केली होती की जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केला जाईल. यापूर्वी, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले होते की सरकार यूसीसी लागू करण्यास वचनबद्ध आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले गृहपाठ पूर्ण झाला आहेधामी म्हणाले होते की राज्य सरकारने त्यांचे “गृहपाठ” पूर्ण केले आहे. जानेवारी 2025 पासून राज्यभरात यूसीसी लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. ते म्हणाले होते, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते. सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही त्यावर प्राधान्याने काम केले. युसीसीचा मसुदा तयार होते. पण एक कायदा आणला गेला. आता आम्ही सोमवारी ती वचनबद्धता पूर्णपणे आणि औपचारिकपणे पूर्ण करणार आहोत.” “हे पंतप्रधानांच्या एकसंध भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल जिथे कोणत्याही धर्म, लिंग, जात किंवा समुदायाविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा Read More »

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले

Vijay Wadettiwar : महामंडळाने मोठा निर्णय घेत एसटी भाडेवाढ केले आहे.त्यामुळे आता सरकारवर चारही बाजूने विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा विरोध आहे तर एसटीभाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे. असा टोला देखील यावेळी राज्य सरकारला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला.

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले Read More »

Walmik Karad 2

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी

Walmik Karad : खंडणी प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आज न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी विष्णू चाटे च्या माध्यमातून मागितली असल्यास आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कंपनी या प्रकरणाची तक्रार 11 डिसेंबर रोजी दिली होती. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडची एसआयटी कोठडी संपणार असल्याने बीड सत्र न्यायालयात या प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. काल 21 जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ 29 नोव्हेंबरचा असल्याचा सांगण्यात येत आहे. याच दिवशी वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि त्याच दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाठेला भेटायला त्याच्या कार्यालयामध्ये गेला होता तेव्हाचा सीसीटीव्ही फुटेझ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपी देखील दिसत आहे.त्यामुळे आज वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी Read More »

Shuresh Dhash

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले…..

Suresh Dhas: काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी एका पोलीस अधिकाऱ्याने करुणा शर्मा यांच्या गाडीत साडी नेसून पिस्तुल ठेवल्याचा दावा केला होता. पण त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्याचं नाव घेतलं नव्हतं. पण आता त्यांनी थेट अधिकाऱ्याचं नाव सांगितलं आहे. “बीडमध्ये हक्काची दहशत मोडून काढतील चुकीच्या व्यक्तीला मदत करणारे व्यक्ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. ते कधीही चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाही. एलसीबीच्या 107 च्या टेबलवर प्रति आरोपी पाच हजार ते वीस हजार असा रेट सुरू असून करुणा शर्मांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्याचे बक्षीस म्हणजे सचिन सानप यांची एलसीबीला झालेली बदली. कोल्हापूरवरून गणेश हंगे बदलून आणला तो 107 चा टेबल आहे, सचिन आंधळे याला ही बदलून आले,” असे सुरेश धस म्हणाले. दरम्यान, सुरेश धस यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सातत्याने करत आहे.

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले….. Read More »

Modi

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. भारतीय नौसेनेच्या माहितीनुसार या तीन अद्यावत युद्धनौकांमध्ये, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्ध लोकांचा समावेश आहे. या तीन युद्धनौका म्हणजे आपल्या देशाची सागरी सुरक्षेतील एक महत्त्वाची झेप असल्याचे भारतीय नौदलाचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, INS निलगिरी हे 17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे. वाढीव क्षमता, समुद्रात जास्त काळ राहणे आणि स्टेल्थ यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह ते नौदलात सामील करण्यात आले आहे. हे देशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते. INS सूरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचे चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे, ती अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे. INS वाघशिर ही P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. INS वाघशिर पाणबुडी बांधणीत भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. हे फ्रेंच नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. देशाला देणार भक्कम सुरक्षा कवच आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या भारतीय नौदलाच्या अतिशय अद्ययावत युद्धनौका आहेत. देशाला हवाई सुरक्षा देण्यास त्या सक्षम असून शत्रूने धाडलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस वाघशीर ही अद्ययावत पाणबुडी देशाच्या मारक क्षमतेत भर टाकणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा या पाणबुडीवरून करता येणार आहे. याच श्रेणीतील आयएनएस अरिघात ही पाणबुडी गेल्यावर्षी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्या दरम्यान, नवी मुंबईतील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांच्या देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे त्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार आहे.यात आमदारांचे रिपोर्टकार्ड,मतदार संघातील आढावा त्यासोबत काही प्रश्न देखील पंतप्रधान आमदरांना विचारणार असून त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे.असल्याची माहिती मिळतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक घेतली होती.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण Read More »

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat: ‘भारत राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या दिवशी स्वतंत्र झाला अन्…’, RSS प्रमुख मोहन भागवत पुन्हा चर्चेत

Mohan Bhagwat : आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठानच्या दिवसापासून भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे. असं आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले. मंदिरासाठी सुरू झालेल्या चळवळीबद्दल ते म्हणाले की, ही भारताच्या ‘स्व’साठी सुरू झालेली चळवळ होती. यामुळे भारताला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आणि जगाला मार्ग दाखवण्याचे धाडस मिळाले आहे. राम मंदिराचा अभिषेक देशभरात प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने भारत या दिवशी स्वतंत्र झाला. राम मंदिराच्या अभिषेकाचा दिवस भारतात द्वादश प्रतिष्ठा म्हणून साजरा केला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले. राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारी रोजी झाला. हिंदू कॅलेंडरनुसार, 11 जानेवारी हा दिवस या वर्षी पहिला वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. आरएसएस प्रमुख म्हणाले, ‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशात कुठेही संघर्ष झाला नाही. सर्वत्र आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण होते. इंदूरमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे सांगितले. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा ही राष्ट्राची शान असल्याचे वर्णन करताना, आरएसएस प्रमुख म्हणाले की, हा क्षण संपूर्ण देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. या दिवशी देशभर उत्साह होता. गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनीही हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आणि भारतभूमीच्या प्रत्येक कणात राम उपस्थित असल्याचे सांगितले. राम हा वाद नाही तर तोडगा आहे.

Mohan Bhagwat: ‘भारत राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या दिवशी स्वतंत्र झाला अन्…’, RSS प्रमुख मोहन भागवत पुन्हा चर्चेत Read More »

Modi

PM Modi: ‘प्रत्येकजण चुका करतो, मी देव नाही…’; पंतप्रधान मोदींनी सर्वकाही सागितलं

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर निखिल कामथ यांच्या ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ या पॉडकास्ट शोमध्ये येणार आहे. निखिल कामथ यांनी प्रदर्शित केलेल्या ट्रेलरमधून ही माहिती मिळाली. यापूर्वी, झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी एका गेस्टसशी हिंदीमध्ये संवाद साधतानाची एक क्लिप शेअर केली होती, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली होती. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर असे अनुमान लावले जात होते की ते पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून पंतप्रधान मोदी होते. पॉडकास्टचा दोन मिनिटांचा ट्रेलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रिलीज करण्यात आला.आता निखिल कामथने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या भागाचा दोन मिनिटांचा ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरचे शीर्षक “पीपल विथ पीएम नरेंद्र मोदी | एपिसोड 6 ट्रेलर” आहे. या ट्रेलरमध्ये पंतप्रधान मोदी आणि निखिल कामथ यांच्यातील एक मनोरंजक संभाषण दाखवण्यात आले आहे. “मी इथे तुमच्या समोर बसून बोलत आहे, मी घाबरत आहे. हे माझ्यासाठी कठीण संभाषण आहे,” कामथ व्हिडिओमध्ये म्हणतात. यावर पंतप्रधान मोदी हसत हसत उत्तर देतात, “हा माझा पहिला पॉडकास्ट आहे, तुमच्या प्रेक्षकांना तो कसा आवडेल हे मला माहित नाही.” पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये काय लिहिले?ट्रेलर पोस्ट करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, “मला आशा आहे की तुम्हालाही ते बनवण्यात आम्हाला जितका आनंद झाला तितकाच आनंद तुम्हालाही मिळाला असेल!” ट्रेलरमध्ये, कामथ पॉडकास्टचा उद्देश स्पष्ट करतात, जो राजकारण आणि उद्योजकता यांच्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी पंतप्रधान मोदींना जगातील सध्याच्या परिस्थितीबद्दल, विशेषतः युद्धांबद्दल प्रश्न विचारले.

PM Modi: ‘प्रत्येकजण चुका करतो, मी देव नाही…’; पंतप्रधान मोदींनी सर्वकाही सागितलं Read More »