DNA मराठी

Baramati

kishor masal

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’

Kishor Masal : बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं ते त्यांना चांगलंच भोवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आता नगरसेवक किशोर मासाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर किशोर मासाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी पक्षातून हकलपट्टी केली हे मला आता समजलं. पण हकलपट्टी का केली हे मी काल पत्रकार परिषद घेऊन विचारलं होतं. ही मला फाशी आहे हे अगोदरच ठरलं होतं असं किशोर मासाळ यांनी म्हटल आहे. व्हायरल होणारा रेकॉर्डिंग माझं नाही ते तुमच्याकडे आलं कसं ? मला ब्लॅकमेल होत आहे. कोणी दिलं याची चौकशी करण्याची मागणी मी एका पत्राद्वारे बारामती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र याची कोणतीही चौकशी झाली नाही. उलट माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू हे अगोदरच मला सांगितलं होतं हे सर्व प्री प्लॅन आहे अपेक्षित आहे यात वेगळं काही नाही असं मासाळ यांनी म्हटलं आहे. तर माफीनाम्यावर बोलताना किशोर मासाळ म्हणाले की, एखाद्या वेळी सैरभैर झाल्यावर आपण अडचणीत चाललोय म्हटल्यावर जिकडे दिशा दिसेल तिकडे आपण धावतो. मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली ती क्लिप माझीच आहे का आणि ती क्लिप कोणी वाजवायला दिली आणि का माझ्यावरती आरोप लावला याचा शोध होईपर्यंत तोपर्यंत ती क्लिप माझी नाही. एक सेकंदाच्या क्लिप वर तुम्ही कसं ठरवलं की तो मीच आहे म्हणून. कोर्ट सुद्धा दोन-चार सुनावण्या घेता आणि मग निर्णय घेत इथे सुनावणीच झाली नाही अस माध्यमांशी बोलताना किशोर मिसाळ म्हणाले.

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’ Read More »

exit polls

Rahuri and Baramati Exit Polls : राहुरीमध्ये अक्षय कर्डिले तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या एकतर्फी विजयाची शक्यता

Rahuri and Baramati Exit Polls : राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक झाली. राहुरीमध्ये एकूण 56.20% तर बारामतीमध्ये 58.17% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राहुरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघातील जागा रिक्त होती. भाजपकडून राहुरी मतदारसंघासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले तर बारामती मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या. राहुरीमध्ये भाजपविरोधात विरोधी पक्षाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. बारामतीमध्ये कुठल्याच मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नव्हता. ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ या आमच्या संस्थेने राहुरी आणि बारामती मतदारसंघात थेट ग्राउंडवर जाऊन मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या सर्वेक्षणानुसार राहुरीमध्ये भाजप तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे. राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह इतर तीन अपक्ष असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व इतर 22 असे एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ‘रुद्र रिसर्च’च्या अंदाजानुसार राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा आपला गड राखणार असल्याचे दिसून येते. अंदाजानुसार, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 142500 (76%), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 25500 (14%) तर इतरांना 19463 (10%) मतदान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा तब्बल 117000 (62%) इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयाची शक्यता असल्याचे दिसून येते. अक्षय कर्डिले यांच्यासोबत स्व. शिवाजी कर्डिले यांची असणारी सहानुभूती, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची निवडणुकीतून मागार व कार्यकर्त्यांचा भाजपच्या बाजूने असलेला कल, विरोधात तुल्यबळ उमेदवार नसणे, विखे पाटील कुटुंबीयांचा असणारा पाठिंबा व अहिल्यानगर तालुक्यातील प्रभाव, आमदार मोनिका राजळे यांनी केलेला प्रचार आणि पाथर्डी तालुक्यातील प्रभाव, अक्षय कर्डिले यांनी गावोगावी केलेला प्रचार, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरेंमुळे होणारे मतांचे विभाजन, महाविकास आघाडीला वातावरण निर्मिती करण्यात आलेल्या मर्यादा या कारणांमुळे अक्षय कर्डिले यांच्या विजयाची एकतर्फी शक्यता आहे. ‘रुद्र रिसर्च’च्या अंदाजानुसार, बारामती मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 212000 (95%) तर इतरांना 11705 (5%) मते मिळण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा 207000 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय होण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचा असलेला प्रभाव आणि प्रमुख सदस्यांनी मतदारांमध्ये जाऊन केलेला प्रचार, स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे नागरिकांमध्ये असणारी सहानुभूतीची मोठी लाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा, कोणत्याही प्रमुख पक्षाने विरोधात न दिलेला उमेदवार, सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरीक्त असणाऱ्या उमेदवारांचा मर्यादित प्रभाव यामुळे सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे.राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर प्रमुख उमेदवारांनी मागार घेतली. याचा फायदा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना होत असल्याचे दिसून येते.

Rahuri and Baramati Exit Polls : राहुरीमध्ये अक्षय कर्डिले तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या एकतर्फी विजयाची शक्यता Read More »

baramati by election

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदार संघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  छायाचित्र मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते पारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)  राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. डुडी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दावे व हरकती सादर येणार आहे. तरी मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे. प्राप्त दावे व हरकतीवर शुक्रवार ६ मार्च २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून मंगळवार १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीचे वितरण करण्यात आले. 7 हजाराहून अधिक मतदारांची वाढ बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ३० ऑक्टोबर २०२४ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ३ लाख ८० हजार  ६०८ इतके मतदार असून आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी आहे. या कालावधीत ७ हजार ७६३ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९२ हजार ८१९ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९६ हजार १०२ इतके मतदार असून यामध्ये ३ हजार २८३ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे.ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत महिला मतदारांची संख्या १ लाख ८७ हजार ७६५ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९२ हजार २४५ इतके मतदार असून यामध्ये ४ हजार ४८० इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. मतदारसंघात तृतीयपंथी मतदार संख्या २४ असून यामध्ये कोणताही बदल नाही, अशी माहिती डुडी यांनी दिली.

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदार संघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध Read More »

Ajit Pawar Memorial : मोठी घोषणा, राज्यात ‘या’ ठिकाणी बांधले जाणार अजित अजित पवारांचे स्मारक

Ajit Pawar Memorial : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे एक स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक पवार कुटुंबाने स्थापन केलेल्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात बांधले जाईल. अजित पवार यांचे जवळचे सहकारी आणि पवार कुटुंबाचे दीर्घकाळ विश्वासू किरण गुजर यांनी ही माहिती दिली. किरण गुजर यांनी सांगितले की, अजित पवार यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. रविवारी मुंबईला जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह अंत्यसंस्कार स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांशी आणि इतर संबंधित व्यक्तींशी चर्चा केली आणि अजित पवारांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बांधण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. गुजर यांनी सांगितले की, शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की स्मारकात अजित पवार यांचे सार्वजनिक जीवन, योगदान आणि बारामतीतील समर्पण प्रतिबिंबित झाले पाहिजे. स्मारकाच्या स्वरूपाबाबत लवकरच सविस्तर चर्चा केली जाईल. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसोबत डिझाईन, लेआउट आणि रचनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठक घेतली जाईल, असे गुज्जर यांनी सांगितले. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शक्तिशाली आणि प्रभावशाली नेते होते, त्यांनी बारामती आणि आसपासच्या परिसराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. बारामती हा पवार कुटुंबाचा राजकीय गड मानला जात आहे आणि अजित पवार यांना या प्रदेशातील विकास नेते म्हणूनही ओळखले जात होते. चार दशकांहून अधिक काळ पवार कुटुंबाशी संबंधित असलेल्या किरण गुज्जर यांना अजित पवार यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जात असे. सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी शनिवारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना उत्पादन शुल्क, क्रीडा, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागांची जबाबदारी देण्यात आली. पण पूर्वी अजित पवारांकडे असलेले वित्त आणि नियोजन सारखे महत्त्वाचे खाते त्यांना देण्यात आले नाही. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी 62 वर्षीय सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार सध्या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्य नाहीत, परंतु असे मानले जाते की त्या बारामती विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवू शकतात, ज्याचे प्रतिनिधित्व पूर्वी अजित पवार करत होते.

Ajit Pawar Memorial : मोठी घोषणा, राज्यात ‘या’ ठिकाणी बांधले जाणार अजित अजित पवारांचे स्मारक Read More »