DNA मराठी

Ajit Pawar news

Ajit Pawar : मोठी बातमी! ‘या’ दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार बाबा सिद्दीकी

Ajit Pawar :  महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका देत गुरुवारी काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.  तर आता समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाबा सिद्दीकी प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.” 11 फेब्रुवारीला आणखी काही लोक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही पवार म्हणाले. मुंबईत काँग्रेसला दुहेरी झटका! माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच मुंबईतील आणखी एक मोठे नेते सिद्दीकी यांनी काँग्रेसला झटका दिला.  वांद्रे येथे 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोण आहेत बाबा सिद्दीकी? सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 1999 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. यानंतर 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. 2004 ते 2008 या काळात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषवले.  आमदार होण्यापूर्वी ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. बाबा सिद्दीकी हे 1992 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेचे (BMC) नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1997 च्या बीएमसी निवडणुकीतही त्यांना यश मिळाले. राष्ट्रवादीला कसा फायदा होईल? सिद्दीकी हा मुंबईतील काँग्रेसचा प्रमुख अल्पसंख्याक चेहरा होता. वांद्रे, मुंबई आणि आजूबाजूला अल्पसंख्याक समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात, ज्यांमध्ये सिद्दीकी यांचा खोलवर प्रभाव आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी सध्या मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून काँग्रेसचा आमदार आहे. 66 वर्षीय सिद्दिकी म्हणाले की, जीशान स्वतःची राजकीय वाटचाल ठरवतील. सिद्दीकी म्हणाले की, आपण शनिवारी रॅली काढणार असून त्यात नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य सहभागी होणार आहेत.

Ajit Pawar : मोठी बातमी! ‘या’ दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार बाबा सिद्दीकी Read More »

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्षांना दिलासा! आता ‘या’ दिवशी येणार निकाल

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेबाबत  सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत या प्रकरणात मुदत वाढवली आहे. काही दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात सुनावणीस आणखी वेळ लागेल यामुळे सर्वोच्च न्यायालयात  मुदत वाढवण्याची विनंती केली होती. जी आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.  तर आता या प्रकरणात निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत लागू शकते. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत आपल्यासमोर प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर अंतिम आदेश देण्यास  अध्यक्षांना सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांविरोधात याचिका दाखल केली असून अजितदादांच्या सोबत असलेल्या पक्षाच्या आमदारांना तातडीने अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. या आमदारांवर पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत शरद पवार गटाने त्यांचे विधानसभा सदस्यत्व लवकरात लवकर रद्द करण्यासाठी सभापतींकडे याचिका दाखल केली आहे. गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रतेच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने  अध्यक्षांना फटकारले होते आणि अनुक्रमे 31 डिसेंबर आणि 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. पुढील निवडणुकीपर्यंत हे प्रकरण पुढे ढकलले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.  मात्र, शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी वेळेत पूर्ण झाली नसल्याचे सांगत नार्वेकर यांनी डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण करण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली, जेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि इतर 8 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार सध्या शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार त्यांच्या गटात आहेत.

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्षांना दिलासा! आता ‘या’ दिवशी येणार निकाल Read More »