DNA मराठी

AIMIM

AIMIM News : … तर नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या, परवेज अशरफींचा मुख्यमंत्र्यांना पत्र

AIMIM News :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकारण चांगलंच तापला आहे.  सध्या या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली. यातच अहमदनगर एआयएमआयएम जिल्हाप्रमुख  डॉ. परवेज अशरफी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महायुती सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे हस्ते डिसेंबर २०२३   राजकोट, मालवण येथे उभारला आणि त्याचे श्रेय लाटले. परंतु सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक वर्ष ही टिकला नाही.  महाराष्ट्रातील रयतेचे राजे ज्यांनी १८ पगड जाती आणि १२  बलुतेदार यांना एकत्र घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आठ महिन्यातच पाडला. यावरून स्पष्ट दिसते की महायुती सरकार आणि त्यांनी दिलेला ठेकेदार हे सर्वांनी भ्रष्टाचार करण्यात महाराजांनाही सोडलं नाही. पुतळा उभारण्यात ज्या ज्या बाबींची दक्षता घेणे आवशक होते त्या बाबींचा सरकारने विचार केलेला दिसत नाही. अवघ्या दोन महिन्यात सरकारने महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देऊन इतका मोठा पुतळा उभारण्याचा ज्याला काहीही अनुभव नाही अश्या व्यक्तीची शिफारस करून काम दिले.   मागील १० वर्षात मोदी सरकार यांनी बांधलेले पूल पैकी बहुतांश कोसळले, भव्य प्रभू रामाचे मंदिर सुधा गळायला लागले, नवीन संसद गळायला लागले, प्रभू राम मंदिर जवळील नवीन झालेले रस्त्यात मोठ मोठे खड्डे झाले,  ज्यावेळेस पुतळा उभारण्यात आला होता. तेव्हा काही शिवप्रेमींनी शंका व्यक्त केली होती की सदर महाराजांचा पुतळा याचा दर्जा टिकण्या सारखे नसून चहेऱ्यावरचे  हावभाव महाराजांचे नाही परंतु त्या विषयाला महायुती सरकारने दुर्लक्ष केले.  महाराजांचे नावाने  राजकारण करतात त्याच महाराजांचे पुतळ्यात महायुती सरकारात भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे. पुतळा कोसळल्यावर मुख्यमंत्री यांनी पत्रकारांना सांगितले की वारे जोराने वाहत होते त्यामुळे पुतळा कोसडला. यावरून असे दिसते की मुख्यमंत्री यांना घटनेचा कोणताही गांभीर्य नव्हता किंवा त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतलेला नाही. प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेची माफी मागितली. परंतु सदर माफी ही फक्त ढोंग  किंवा राजकीय नुकसान वाचवण्याचे हेतूने मागितली आहे. म्हणजेच  मागितलेली माफी ही फक्त जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा टोला डॉ परवेज अशरफी यांनी लावला. खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आणि सन्मान असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळी जाऊन नाक रगडून माफी मागावी आणि कोणताही विलंब न करता आपले पदाचे राजीनामे द्यावे असा सल्ला डॉ परवेज अशरफी यांनी दिला. महाराजांचा पुतळा उभारण्यात जी सरकार भ्रष्टाचार करत असेल तर महाराजांच्या जनतेला न्याय कुठून देणार? असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

AIMIM News : … तर नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या, परवेज अशरफींचा मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा

Ahmednagar News: शहरातील रामवाडी परिसरात 18 जून रोजी झालेल्या   वादाला जाणून बुजून धार्मिक रंग देऊन शहरात मोठी दंगल घडून आण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपींवर कारवाई झाली नाही तर जन आंदोलन उभारू असं देखील अशरफी म्हणाले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रामवाडी भागात स्थानिक नागरिकांत 18 जुन 2024 रोजी किरकोळ वाद झाले होते मात्र ते मिटून घेण्यात आली होती.  मात्र तरही बजरंग दल आणि काही जातीवादी संघटनेचे  पदअधिकारी यांनी 40-50 गुंड हत्यारे, दांडके घेऊन रामवाडीत आले होते त्यावरून या लोकांना शहरात दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करत होते हे दिसून येत आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कते मुळे या गुंड्यांचा डाव फसला असं अशरफी यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गुंड्यांचा डाव फसल्याने त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी शहराचा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.  या सगळ्या घेटने मागील  मास्टर माईंड बजरंग दलाचा पदाधिकारी असल्याने 4 दिवसात या आरोपीला अटक करावी   नाहीत तर कोणतीही पूर्व सूचना न देता पुणे औरंगाबाद महामार्गावर आम्ही समस्त भारतीय संविधान प्रेमी समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करणार असा इशारा अशरफी यांनी दिला आहे.

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा Read More »

Maharashtra News: MIM मुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढल्या

Maharashtra News: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रणांगणात गुरवारी नवा बिडू दाखल झाला आहे. एमआयएम तर्फे डॉ. परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. अशरफी निवडणुकीच्या मैदानात आल्याने अल्पसंख्यांक मतांवर डोळा ठेऊन असलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. डॉ. अशरफीच्या रुपाने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.  दक्षिण नगर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना त्यात आता एमआयएम ने उडी घेतल्याने या निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आधीच महविकास आघाडीवर कुरघोडी करत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नसल्याने आयता उमेदवार घेऊन निलेश लंके यांना मैदानात उतरविले. पण तोवर वेळ निघून गेली होती. कारण डॉ. सुजय विखे यांनी तोवर संपुर्ण मतदार संघ पातांक्रित करत मतदारांच्या गाठी भेटी वाढवत आपले वातावरण तयार केले आहे. यामुळे महाविकास आघाडीने मतदार संघातील अल्पसंख्याक समाजावर आपले लक्ष केंद्रीत करत त्यांना आपल्या गळाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. पण आता खुद्द एमआयएम ने आपला गडी रिगंणात दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेची लाट पसरली आहे.  एम आय एम ने दिलेले उमेदवार डॉ. परवेश अशरफी हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. महाविकास आघाडीने केवळ अल्पसंख्यांक मतांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला असून राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही. यामुळे अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी  आपण ही निवडणूक लढवत असल्याचे डॉ. अशरफी यांनी सांगितले. त्यांना जनता आता किती साथ देणार हे तर ४ जूनला समोर येईल. पण दक्षिण  लोकसभा मतदार संघात एमआयएम दाखल झाल्याने तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

Maharashtra News: MIM मुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढल्या Read More »

AIMIM ने केली ‘इतक्या’ लोकसभा उमेदवारांची घोषणा; कोणाचा खेळ बिघडवणार ?

AIMIM Lok Sabha Candidate: ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने लोकसभा निवडणूक 2024 तीन लोकसभा उमेदवारांची घोषणा केली. तर येत्या काही दिवसात आणखी काही उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे.  पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी माहिती देत सागितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी  औरंगाबादमधून इम्तियाज जलील आणि किशनगंजमधून अख्तरुल इमान हे एआयएमआयएमचे उमेदवार असतील. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी स्वतः तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.  त्यांनी सांगितले की, लवकरच बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये उमेदवार जाहीर केले जातील. AIMIM महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार एआयएमआयएम पक्ष बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात किती जागा लढवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. ही वेगळी बाब आहे की पक्षाचे नेते सय्यद इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रात 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धुळे आणि विदर्भातील एका मतदारसंघाचा समावेश आहे. AIMIM बिहारमध्ये 11 जागांवर निवडणूक लढवू शकते एआयएमआयएम बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील पक्षाध्यक्षांशी चर्चा करत आहे. लवकरच येथेही उमेदवार जाहीर केले जातील. बिहारमध्ये पक्ष 11 जागा लढवण्याची शक्यता आहे. याशिवाय पक्ष यावेळी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवणार आहे.  काँग्रेस, समाजवादी  आणि राजद यांचं टेन्शन वाढणार ? एआयएमआयएमने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे केल्यास निश्चितच नुकसान होईल. कारण AIMIM चा मतांचा आधार मुस्लिम आहे.  समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि राजद यांचाही हा आधार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील औरंगाबादमधून विजयी झाले होते, तर ओवेसी हैदराबादमधून खासदार आहेत. अख्तरुल इमान हे बिहार विधानसभेचे आमदार आहेत.

AIMIM ने केली ‘इतक्या’ लोकसभा उमेदवारांची घोषणा; कोणाचा खेळ बिघडवणार ? Read More »

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक

Asaduddin Owaisi: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या प्रत्येक राजकीय पक्षाने तयारी पूर्ण केली आहे. सर्व पक्ष आपल्या ताकदीनुसार लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. देशात सध्या ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ युतीमध्ये थेट लढत होणार असून राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.  राज्यातील 48 पैकी 45 जागांवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगा प्लान तयार केला आहे तर MVA ने देखील जवळपास जागा वाटपाचा फॉर्मुला तयार केला आहे.   तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) देखील निवडणूक लढवणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एआयएमआयएम राज्यातील पाच लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे.  भिवंडीत पत्रकारांशी बोलताना एआयएमआयएम महाराष्ट्र युनिटचे कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफार कादरी म्हणाले की, राज्यातील उत्तर मुंबई, धुळे, नांदेड, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे. कादरी म्हणाले की, एआयएमआयएम निवडणुकीची प्रभावी रणनीती बनवण्यासाठी या जागांवर सर्वेक्षण करत आहे.   महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा आणि अविभाजित शिवसेनेने 23 जागा लढवल्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले. काँग्रेसला एक तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. AIMIM चे एकमेव औरंगाबादचे उमेदवार इम्तियाज जलील सय्यद विजयी झाले होते.

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक Read More »