DNA मराठी

Ahilyanagar today

img 20250724 wa0013

Sawedi land scam सावेडी प्रकरण : ‘फेरफार’ की ‘फसवणूक’ जबाबदार कोण?

प्रशासनातील लाठी सर्कल, दस्तावेज विभाग, महसूल अधिकारी आणि निबंधक कार्यालय यांच्यातील एकंदर यंत्रणा अपयशी ठरत आहे. परिणामी, जमीनप्रकरणात निर्माण होणारे तणाव, वाद, हाणामाऱ्या आणि अगदी खूनाच्या घटना याला जबाबदार कोण? Sawedi Land Scam: जमिनीच्या मालकीच्या वादातून भांडण, हाणामाऱ्या, न्यायालयीन चढाओढ, आणि अखेर अनिश्चिततेत अडकलेली गुंतवणूक हे चित्र आज महाराष्ट्रात दुर्मीळ नाही, तर सामान्य झालं आहे. ग्रामीण भागांपासून ते शहराच्या उपनगरांपर्यंत ही विषवल्ली पसरलेली आहे आणि ही परिस्थिती केवळ भूमाफियांमुळे नव्हे, तर त्या भूमाफियांना पाठीशी घालणाऱ्या, वेळकाढूपणा करणाऱ्या आणि संशयास्पद भूमिका घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांमुळे निर्माण झालेली आहे. सावेडी प्रकरण हे त्याचं भेदक उदाहरण आहे. सावेडीतील सर्वे नं. २४५/ब२ या मिळकतीच्या फेरफार क्रमांक ७३१०७ संदर्भात सध्या सखोल चौकशी सुरू आहे. अजीज डायाभाई व साजीद डायाभाई यांच्यातर्फे रमाकांत सोनवणे यांनी या फेरफारास विरोध केला असून, तो रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांचा स्पष्ट आरोप असा की, १९९१ मधील खरेदी व्यवहार हा कुळकायद्याच्या नियमांचा भंग करून आणि भ्रष्ट मार्गांनी पार पडला आहे. इतकंच नव्हे, तर त्यावर फेरफार मंजूर करून दिला गेला ती प्रक्रिया हीच शंकास्पद आहे. खरे तर कोणतीही मिळकत ‘फेरफार’ साठी पात्र आहे की नाही, हे ठरवताना संबंधित नोंदवही, दस्तावेज, कायदेशीर अटी आणि पार्श्वभूमी तपासणे हे अधिकारी वर्गाचं प्राथमिक कर्तव्य. मात्र इथे नेमकं याच प्रक्रियेकडे कानाडोळा करण्यात आला. कोणाच्या सांगण्यावरून? कुणाच्या दबावाखाली? हे प्रश्न अधिक गडद होत आहेत. या सगळ्यात गंभीर बाब म्हणजे प्रशासकीय समन्वयाचा पूर्णत: अभाव. प्रांताधिकारी, तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांच्यात कुठलाही संपर्क दिसून येत नाही. इतक्या महत्त्वाच्या विषयातही ‘प्रत्येक जण दुसऱ्यावर बोट दाखवतोय’ अशी परिस्थिती आहे आणि त्याच दरम्यान काहीजण व्यवहार पूर्ण करत आहेत. यामध्ये केवळ निष्काळजीपणा आहे की हेतुपुरस्सर दुर्लक्ष, हा मुख्य मुद्दा आहे. सावेडी परिसरात सध्या चर्चांचा बाजार तापलेला आहे. “फेरफार मंजूर होऊ द्या, व्यवहार पूर्ण होऊ द्या, मग चौकशी करू” अशी एक ‘नियोजित शांतता’ जाणवत आहे आणि हीच शांतता घातक आहे. या प्रकरणातून बाहेर पडणाऱ्या महत्त्वाच्या बाबी अशा दस्तावेज सार्वजनिकपणे उपलब्ध असूनही कारवाई होत नाही, यावरून काही अधिकारी जबाबदारीपासून पळ काढत आहेत की हेतुपुरस्सर टाळाटाळ करत आहेत, हा संशय बळावतोय. प्रशासनातील लाठी सर्कल, दस्तावेज विभाग, महसूल अधिकारी आणि निबंधक कार्यालय यांच्यातील एकंदर यंत्रणा अपयशी ठरत आहे. परिणामी, जमीनप्रकरणात निर्माण होणारे तणाव, वाद, हाणामाऱ्या आणि अगदी खूनाच्या घटना याला जबाबदार कोण? हे केवळ वाद करणारे पक्ष नाहीत, तर त्यामागे उभ्या राहिलेल्या उदासीन यंत्रणाही तितक्याच दोषी आहेत. आज सर्वसामान्य माणूस अगदी थेट सवाल विचारतोय “जमिनीच्या वादाला प्रशासन खतपाणी घालतंय का?” “ज्यांनी तक्रारींच्या कागदपत्रांसह अर्ज दिला, त्यांचं ऐकून घेतलं जात नाही, उलट दुर्लक्ष केलं जातं, यामागे कोणत्या सत्तेचा प्रभाव आहे?” शेवटी, जमीन ही केवळ आर्थिक व्यवहार नाही, तर ती भावनिक आणि सामाजिक गुंतवणूक आहे. जमीन सुरक्षित नसेल, तर गुंतवणुकीवरचा विश्वासच उडतो. त्यामुळे सावेडीतील प्रकरणातून केवळ चौकशी करून हात झटकणे पुरेसे नाही. फेरफार मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर स्पष्ट आणि कठोर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. यंत्रणेत दोष असणाऱ्या लूपहोल्स बंद करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पातळीवर ठोस पावलं उचलली पाहिजेत. कारण फेरफाराच्या नावाखाली जर फसवणूक होत असेल, तर ती केवळ जमिनीपुरती मर्यादित राहत नाही ती कायद्यावरचा विश्वास गमावते आणि हीच लोकशाहीसाठी सर्वात मोठी शोकांतिका ठरते.

Sawedi land scam सावेडी प्रकरण : ‘फेरफार’ की ‘फसवणूक’ जबाबदार कोण? Read More »

kiran kale

Kiran Kale : मोठी बातमी! महिला अत्याचार प्रकरणी किरण काळेंना अटक

Kiran Kale : अहिल्यानगर शहरातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांना महिला अत्याचार प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या बाबत कर्जत तालुक्यातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. काही दिवसापूर्वी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर 350 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत किरण काळे राज्यातील राजकारणात चर्चेत आले होते. फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित महिला व तिचा पती यांच्यातील वैवाहिक वाद मिटविण्यासाठी पीडित महिला किरण काळे यांच्या संपर्कात आली होती. महिलाला विश्वासात घेत मदतीचे आश्वासन देत 2023 ते 2024 या दरम्यान काळे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात वारंवार अत्याचार केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेबाबत कुणाला काही सांगितले तर जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी किरण काळे याला अटक केली आहे.

Kiran Kale : मोठी बातमी! महिला अत्याचार प्रकरणी किरण काळेंना अटक Read More »

मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २७ जुलै २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

35 वर्षांनंतर नोंद; सावेडी जमीन प्रकरणामुळे प्रशासनावर संशयाची सावली

Ahilyanagar News : सावेडी परिसरातील तब्बल 35 वर्षांपूर्वीचा जमीन व्यवहार सध्या संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. सर्वे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीची नोंद इतक्या वर्षांनी तलाठी कार्यालयात झाली असून, त्यामुळे भू-माफिया, शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि राजकीय वरदहस्ताचे धागेदोरे समोर येत आहेत. ही जमीन मूळत: अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता – झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य मुंबई) यांच्या नावावर होती. 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना ही जमीन खरेदीखताद्वारे विकली गेली होती. मात्र इतक्या वर्षांनंतर अचानक नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस दिली न गेल्याने आणि मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंदणी झाल्याने प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे बाहेरगावी गेलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनी हडप करण्याचा डाव अधिकाऱ्यांच्या संगनमताने रचला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यात लाखोंच्या उलाढाली, अधिकाऱ्यांना मिळणारे मोठे आर्थिक फायदे आणि वरून मिळणारे राजकीय संरक्षण यामुळे असे प्रकार सर्रास घडत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासकीय यंत्रणेतील अशा भ्रष्ट कारभाराला लगाम घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. सावेडी जमीन व्यवहार : 35 वर्षांनंतर नोंदणीचा गोंधळ जमिनीचा तपशील सर्वे नं. : 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) सर्वे नं. : 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) एकूण क्षेत्रफळ: 1 हेक्टर 35 आर मूळ मालक : अब्दुल अजीज डायाभाई (सध्या मुंबईत वास्तव्य) खरेदीदार : पारसमल मश्रीमल शहा खरेदीखत दिनांक : 15 ऑक्टोबर 1991 संशयास्पद बाबी तब्बल 35 वर्षांनंतर नोंदणी मूळ मालकास नोटीस न देता नोंद मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंद तलाठी कार्यालयाच्या कारभारावर संशय

35 वर्षांनंतर नोंद; सावेडी जमीन प्रकरणामुळे प्रशासनावर संशयाची सावली Read More »

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू

Ahilyanagar News : शहरातील माणिक चौक या ठिकाणी असलेले पक्के अतिक्रमण महानगरपालिकेच्या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व्यापारी शहर प्रमुख विशाल वालकर यांनी आज महानगरपालिकेच्या समोर प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषण सुरू केले. महानगरपालिकेच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली असताना देखील सुद्धा कारवाई केली नाही उलट अनेक ठिकाणी मोजक्या कारवाई करून वेळ मारून देण्याचा प्रकार घडलेला आहे असेच उदाहरण शहरातील माणिक चौक भागांमध्ये पाहायला मिळालेले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिक ठिकाणी रस्त्याची, ड्रेनेजची कामे चालू आहेत. त्यापैकी एकमुखी दत्त मंदीर चौक, सोपानराव वडेवाला समोर, माणिक चौक येथे आशा टॉकीज चौक ते कापड बाजार येथे चालु असलेल्या ड्रेनेज लाईन व काँक्रीटीकरणचे कामाच्या रस्त्यात अडथळा निर्माण करणारे ओटे, पत्रा शेड इ. अतिक्रमण हटवुन काम पुर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर मालमत्ता सि.स.नं. ३६१८/२ या ठिकाणी सन २०१९ पासून अशोक छल्लानी व भागीदार यांनी या मालमत्तेमध्य बेकायदेशीर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कुठलीही परवानगी न घेता विनापरवाना बांधकाम करुन गाळे बांधून महानगरपालिकेच्या जागेमध्ये १० फुटाचा ओटा, पत्र्याची शेड बांधून मोठे अतिक्रमण केले आहे. तसेच अशोक छल्लानी व इतर भागीदार यांनी त्या बेकायदेशीर बांधकाम केलेल्या गाळ्यांमध्ये भाडेकरी टाकले असुन सदर जागेवर डी.एस.पी. फुटवेअर व फुटी फुटवेअर व इतर दुकाने या दोन दुकानदारांनी दुकानासमोर महापालिकेच्या जागेमध्ये वीजेचा खांब पत्रा शेडच्या आत घेऊन रस्त्यावर १० फुट X २० फुट ओटा व पत्राशेड बांधुन मोठे अतिक्रमण केले आहे. तरीपण संबंधीत मालमत्ताधारक हा महानगरपालिकेला न जुमानता वारंवार अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमणाबाबत वालकर यांनी मनपास दिनांक ३० मे २०२५ रोजी आयुक्त रितसर तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जाकडे महापालिका, अतिक्रमण विभाग व प्रभाग समिती नं. २ या विभागांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून तक्रारीचे निरसन करण्याची विनंती केली होती. परंतु सदर सर्व विभागांनी याकडे दुर्लक्ष केलेले होते.त्यामुळे दि.१३ रोजी उपोषणाला बसण्याचे आवाहन केले होते, त्या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाने मला दिनांक ०9 रोजी पत्र देऊन अश्वासन दिले की, नगर रचना विभागामार्फत माकींग करुन अहवाल सादर झाला की, उचित कारवाई करण्यात येईल असे पत्र देवून संबोधले होते, या करीता मी उपोषण स्थगित केले होते. प्रभाग समिती क्र. २ ने नगर रचना विभागाला रितसर अभिप्राय मिळावा या करीता मागणी केली होती, त्या मागणीचा रोड मार्कीग करुन अतिक्रमण केलेला अभिप्राय त्यांना दि. ९ रोजी प्राप्त झालेला आहे. तरी देखील आज पर्यंत महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अद्याप केलेली नाही व रोडचे काम पुर्णत्वाकडे जात आहे. दरम्यान, वालकर यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज सकाळी महानगरपालिकेने त्या ठिकाणी जाऊन फक्त पत्राची शेड बाजूला केली मात्र पक्के बांधकाम तसेच ठेवले आहे. त्यामुळे आज पासून माणिक चौक येथील अतिक्रमण कारवाईच्या संदर्भात प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे वालकर यांनी उपोषण सुरू केले आहे.

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू Read More »

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…”

Ahilyanagar News : बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील जमीन क्रमांक 34/3 च्या विक्री व्यवहारात कृषीच्या आडून अकृषिक जमीन विकण्याचा प्रकार समोर आला आहे. हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून सत्ताधारी वरदहस्त आणि स्थानिक प्रशासनातील हलगर्जीपणा यांचा थेट पुरावा म्हणावा लागेल. मिलिंद बाबासाहेब कोरडे यांनी संबंधित व्यवहारात फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर तहसील कार्यालयाने नियमांची पुस्तके उघडून विविध शाखांना अहवाल मागवले कुळकायदा संकलन, गौणखनिज विभाग, महसूल खाते… सर्वांनी आपले कर्तव्य निभावल्याचे दाखवत पत्रव्यवहारांचा ढिगारा तयार केला. पण थेट कारवाई शून्य. विशेष म्हणजे, ड्रेनेज, रस्ते, गटारीसाठी वापरलेल्या गौणखनिजांची चलने सादर करण्यास सांगण्यात आलेले असतानाही संबंधितांनी ती सादर केली नाहीत. तलाठ्यांमार्फत नोटीस बजावली गेली, तरीही दुर्लक्ष. महाखनिज प्रणालीवरही परवानगी नोंदली गेल्याचा ग ना बाबद नोंदी आढळून येत नाही. हे सर्व घडत असतानाही प्रशासन ‘बघ्याची भूमिका’ घेत आहे. खरा प्रश्न असा आहे की, जेव्हा स्पष्ट पुरावे, अहवाल आणि नियमभंग समोर आहे, तेव्हा कारवाई टाळण्यामागे नेमकं कोण आहे? स्थानिक पातळीवरील काही कर्मचाऱ्यांना ‘सिस्टिम’चा आधार वाटतो कारण त्यांच्या पाठिशी उभे असतात वरिष्ठ अधिकारी वा राजकीय हात. इथेही तसाच प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. लोकांनी कायद्याचा आधार घेतला, पण कायदा प्रशासनाच्या फाईलमधून बाहेरच पडलेला नाही. हे चित्र धोक्याचं आहे. कारण जेव्हा कायदा दुर्लक्षित होतो, तेव्हा लोकशाही कमकुवत होते.

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…” Read More »