DNA मराठी

Acid Attack Victim

fb img 1775543598086

Aditi Tatkare : ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Aditi Tatkare : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या अत्यंत निंदनीय घटनेतील पीडित मुलीच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे आणि तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, तिचे वय लहान असून त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. डॉक्टर व प्रशासन तिची पूर्ण काळजी घेत आहेत. मुलीचे विशेष समुपदेशकाकडून समुपदेशन करण्यात आले असून, स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे समुपदेशन पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, या उपचारांचा कोणताही आर्थिक भार पीडितेच्या कुटुंबावर पडू दिला जाणार नाही. पीडितेस महिला व बालविकास विभागाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य तात्काळ देण्यात येईल. यासोबतच, न्याय विभागाच्या ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम २०२२’ अंतर्गत तिच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून ३ लाख रुपये आधीच देण्यात आले आहेत. घटनेच्या दिवसापासूनच आपण पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या, स्थानिक आमदारांनीही हा मुद्दा सभागृहात मांडला होता. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. कुटुंबाकडे काही अतिरिक्त माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, तसेच त्यांच्या काही अपेक्षा असल्यास त्या सांगाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. या सांत्वनपर भेटीदरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबातील तिची आई, मावशी व मामा उपस्थित होते. तसेच, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम हेही याप्रसंगी उपस्थित होते.

Aditi Tatkare : ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा Read More »

acid attack

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेच्या अनुषंगाने “पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना, २०२२” अंतर्गत पीडितेला ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या निर्देशानुसार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी संबंधित समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पीडितेच्या आईच्या बँक खात्यात तात्काळ १ लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली. त्यानंतर दिनांक २४ मार्च २०२६ रोजी समितीची पुढील बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिवीक्षा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या गृह चौकशी अहवालाचे परीक्षण करून पीडितेच्या आईच्या खात्यात अतिरिक्त २ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे या प्रकरणात पीडितेला एकूण ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करून वितरित करण्यात आले.

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर Read More »