DNA मराठी

Aaditya Thackeray

aaditya thackeray

Aaditya Thackeray: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरे भडकले

Aaditya Thackeray: मुंबईच्या रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आता थेट मुंबईकरांच्या खिशालाच ‘ब्रेक’ लावण्याचे नियोजन सुरू आहे का? असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेकडे ‘कंजेश्चन टॅक्स’ (गर्दी शुल्क) आकारण्याची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या या ‘टॅक्स बॉम्ब’वर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे. ​आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या या प्रस्तावाचा समाचार घेताना विचारले की, मुंबईकडून देशाच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा जातो, मग बदल्यात मुंबईकरांना नवीन करांचा बोजा का? “एकीकडे मुंबईतील उद्योग आणि रोजगार राज्याबाहेर घालवायचे आणि दुसरीकडे इथल्या सामान्य जनतेला नवीन करांच्या जाळ्यात ओढायचे, हा भाजपचा दुहेरी डाव आहे,” असे ठाकरे म्हणाले. याआधीही रस्ते आणि सुशोभीकरणाच्या कामात घोटाळे करून मुंबईची तिजोरी रिकामी करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ​मकरंद नार्वेकर यांनी मांडलेला हा प्रस्ताव म्हणजे भाजपची अधिकृत भूमिका आहे का, असा खडा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. “रस्त्यांची दुरवस्था करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणारी भाजप जनतेला ‘टॅक्स रिफंड’ देणार का? खराब हवामानामुळे आरोग्याचे नुकसान होणाऱ्या मुंबईकरांना भरपाई मिळणार का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपला कोंडीत पकडले. ‘बेस्ट’ बसची संख्या कमी करून खाजगी कंपन्यांचे खिसे भरले जात असताना आता सामान्य वाहनधारकांना लक्ष्य केले जात असल्याने मुंबईत आगामी काळात मोठा राजकीय रणसंग्राम होण्याची शक्यता आहे.

Aaditya Thackeray: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरे भडकले Read More »

img 20250809 wa0001

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व”

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलणे, आमदार फोडणे आणि सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच रचणे हे काही नवीन राहिले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्याला एक वेगळे आणि अधिक धोकादायक दिशा मिळालेली दिसते. शरद पवारांसारख्या थोर राजकारण्यांनीही भूतकाळात पक्ष फोडला, नवा पक्ष उभारला, सत्ता मिळवली. पण त्या काळात पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्याचा फोटो यावर असा थेट दावा कुणी केला नव्हता. तात्पर्य, राजकीय भूक होती, पण तिची एक मर्यादा होती. पण आज ती मर्यादा धूसर होत चालली आहे. “मी निवडून आलोय, म्हणजे माझीच मक्तेदारी,” असा अहंकार काही निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या वागण्यात दिसतो. जनतेने मतदान पेटीतून ज्यांना विश्वासाने निवडलं, तेच प्रतिनिधी निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षांनाच कमी लेखतात. हीच का लोकशाही असा प्रश्न पडतो? या सगळ्या घडामोडींचा एक सकारात्मक पैलूही आहे. आज या अस्थिर आणि अस्वस्थ राजकारणात दोन तरुण नेते उभे राहताना दिसतात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे. या दोघांनीही आपल्या राजकीय प्रवासात पक्ष फोडणे, दबाव तंत्र, आमदारांची खरेदी-विक्री, विश्वासघात, एकनाथ शिंदें व अजित पवारांसारखे बंड आणि सत्तापालट यांचे साक्षीदार झाले आहेत. हे राजकारण त्यांनी बाहेरून पाहिलं नाही अनुभवलं आहे. आज हे दोघंही नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना, पक्ष रचनेचा गाभा कसा मजबूत करायचा, कार्यकर्त्यांशी नातं कसं टिकवायचं, जनतेचा विश्वास कसा जपायचा, आणि राजकारणात नैतिकता जिवंत कशी ठेवायची याचा धडा घेऊन पुढे येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांचा वारसा आणि ठाकरे बाणा जपण्याचा प्रयत्न केला. तर रोहित पवार यांनी शरद पवारांच्या परंपरेचा अभ्यास केला, तरुणाचे प्रश्न कसे हाताळायची आणि ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क कास रहायचं “शरद पवार जसे आज बहुतांशी गाडीने प्रवास करताय. असं रोहित पण काकांचा वारसा जपतानी दिसतंय, ग्रामीण भागात नाळ जुळून घेण्याचे त्याचे कौशल्य त्यांच्यात दिसते. हे दोघेही आज सत्तेच्या खेळात नाहीत, पण राजकारणाच्या अभ्यासातून आणि प्रत्यक्ष संघर्षातून त्यांनी आपले राजकीय स्थान मजबूत केले आहेत. म्हणूनच भविष्यकाळाकडे पाहताना वाटते आजच्या फोडाफोडीच्या राजकारणातूनच उद्याचं ठाम आणि विचारधारेशी बांधिल नेतृत्व उगम पावू शकतं आणि या बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे ही नावं नजरेआड करणं अशक्य आहे.

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व” Read More »

Uddhav-Raj -उद्धव-राज युतीचा महायुतीवर ‘ठसा’: कोण उरेल? कोण पडेल?

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वळण घेत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav-Raj) यांच्या एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण आणि त्यांच्या दोन्ही वारसदारांनी घेतलेल्या वेगवेगळ्या वाटा… या पार्श्वभूमीवर जर हे दोन ठाकरे पुन्हा एकत्र आले, तर महायुतीचं गणित पूर्णपणे ढासळण्याची चिन्हं आहेत. राजकारणात ‘कधी कोण मित्र होईल आणि शत्रू होईल’ हे सांगता येत नाही, हे पुन्हा सिद्ध होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या मनसेची (Uddhav-Raj) युती झाली, तर ठाणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरांमध्ये भाजप-शिंदे गटाला जबर झटका बसू शकतो. कारण या भागांमध्ये दोन्ही पक्षांचे मिळून एक भक्कम मराठी मतदार संघ आहे. शिंदे गटाची अडचण वाढणार? एकनाथ शिंदे यांची शिवसेना मराठी मतांच्या जोरावरच उभी आहे. मात्र, हे मतबळ मूळ शिवसेनेचे आहे, हे नाकारता येणार नाही. राज आणि उद्धव जर एकत्र आले, तर शिंदे गटाकडे उरलेली मराठी ओळख धूसर होण्याची शक्यता आहे. परिणामी, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणे कठीण होऊ शकते. भाजपचं गणित कोलमडेल का? भाजपने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात एक मजबूत युती उभी केली होती — शिंदे ( SHIANDE) गट, अजित पवारांची राष्ट्रवादी, आणि स्वतःचा मजबूत संघटनात्मक पाया. मात्र, राज आणि उद्धव एकत्र आल्यास, भाजपच्या मतांच्या वाटणीत मोठा फेरफार होऊ शकतो. विशेषतः शहरी आणि उपनगरी भागांतील मराठी मतदार भाजपपासून दूर जाऊ शकतात. शिवाय, विरोधकांकडून ‘मराठी अस्मिता’चा नवा नारा भाजपला अडचणीत आणू शकतो. अजित पवार यांना झटका? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे परंपरागत मतदार हे ग्रामीण भागात अधिक आहेत, परंतु काही ठिकाणी मुस्लिम आणि आघाडी समर्थक वर्गाचे मत मिळवण्यासाठी अजितदादांना जोर द्यावा लागतो. ठाकरे-राज एकत्र आले, तर विरोधकांची एकत्रित ताकद अजित पवार यांच्यासाठी देखील आव्हान उभी करू शकते. राजकारणात काहीही होऊ शकतं सध्याच्या घडामोडी पाहता, 2028 च्या निवडणुकांपूर्वी राज्यात अनेक समीकरणं बदलू शकतात. उद्धव आणि राज ठाकरे यांची भेट, चर्चा, आणि त्यातून उद्भवणाऱ्या शक्यता – या सगळ्यांकडे राज्यातील राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.

Uddhav-Raj -उद्धव-राज युतीचा महायुतीवर ‘ठसा’: कोण उरेल? कोण पडेल? Read More »

दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? संजय निरुपमांचा मोठा दावा

Sanjay Nirupam On Disha Salian: दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. असा धक्कादायक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दिशा सालियन हत्याकांडात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे आहेत, लवकरच आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल होईल आणि ते हत्यादी ठाकरे बनतील, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. निरुपम म्हणाले की, नुकताच वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे दिशा सालियन प्रकरणात तक्रार केली आहे. या तक्रारीत उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही तक्रार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर करण्यासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती निरुपम यांनी दिली दिशा सालियनची ८ जून २०२० मध्ये हत्या झाली. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची दिशा सालियन मॅनेजर होती. दिशा सालियनची हत्या संशयास्पद झाली होती. या दिवशी दिशा सालियनच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये सर्वजण उपस्थित होते, अशी चर्चा त्या दिवशी झाली होती, असे निरुपम म्हणाले. राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली असून त्याकडून चौकशी सुरु आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल तीन दिवस उशीराने प्राप्त झाला. तिचा मृतदेह हा इमारतीपासून २५ फूट लांब आढळून आली. तिच्या शरिरावर कोणत्याही जखमा नव्हत्या आणि नग्नावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असून त्याची नव्याने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे निरुपम म्हणाले. सरकार विरोधी पक्षांचा बदला घेण्यासाठी दिशा सालियन प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असा आदित्य ठाकरे यांचा आरोप खोटा आहे, असे निरुपम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरेने सुप्रीम कोर्टात सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा नाही तर सुशांत सिंग हत्येचा तपास केला होता. आदित्य यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्रावर देखील कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले. या प्रकरणी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डी नो मोरिया आणि इतरांवर संशय आहे. हे सर्व ड्रग्ज रॅकेटशी संबधित असून त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या समीर खान याने नार्कोटिस ब्युरोकडे कबुली दिली होती. आदित्य ठाकरे ड्रग्ज घेतो, असे समीर खानने चौकशीत म्हटले होते. त्यामुळे दिशा सालियनच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार, मुंबई पोलीस कटिबद्ध असल्याचे निरुपम म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर उबाठा गटाने कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे जाणुनबुजून व्हायरल करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवर कुणाल कामरावर निश्चित कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले.

दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? संजय निरुपमांचा मोठा दावा Read More »