Ahilyanagar News: नगर शहरात 6 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि शांततेत रामनवमी निमित्त शोभा यात्रा काढण्यात आली होती मात्र यावेळी काही समाजकंटकांकडून मुस्लीम समाजाचे धार्मिक स्थळाची विटंबना करणारे काही फ्लेक्स झळकवण्यात आल्याने आता पुन्हा एकदा शहरात नवीन वादाला तोंड फुटले आहे.
या प्रकरणात समस्त मुस्लीम समाज अहमदनगरच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून आरोपींवर आणि यामागील मास्टरमाईंडवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगर मध्ये मिरवणुक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये काही समाजकंटक यांनी महाराष्ट्राचे वातावरण दुषित होवुन दंगल व्हावी या उददेशाने मुस्लीम समाजाचे जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मक्का-मदिना शरिफ याचे फलक झळकवुन जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मक्का व मदिना यांची विटंबना केली. त्या फलकावर हिंदू देवतांचे फोटो सोबत मक्का-मदिना शरिफ येथील फोटो लावुन मुस्लीम समजाला हिनवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं या निवेदनात म्हटले आहे.
तसेच काही समाजकंटकानी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटोही झळकवले त्यावर लांडो का सिर कटेगा, कुत्तों में बटेगा आ जा किसमे है दम हिंदु है हम असा मजकुर होता त्याबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे फोटोसोबत संसदेत पारित झालेला वक्फ कायदा संबधी अरे मुल्लो बसा आता गप्प देशात वक्फचं प्रकरण झालं थप्प असा मजकुर लिहीण्यात आलेला होता.
तसेच मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी मुस्लीम समाजाला उचकवण्यासाठी दंगल घडविण्याचे हेतुने घोषणा बाजी केली हे प्रकरण संपत नाही तर मॅक्स-प्रथम-491 इन्स्टा आयडी वरुन प्रथम भाऊ पवार याने त्याचे ईन्स्टा अंकाऊट स्टोरी लावुन समस्त मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असं या निवेदनात म्हणण्यात आले आहे.